पेपर बॅग व्यवसाय कसा करावा?

Paper-Bag-Business

जेव्हा पासून सरकार ने प्लास्टिक बंदी लागू केली आहे, तेव्हा पासून पेपर बॅग चे चांगले दिवस आले आहेत. याच सोबत या व्यवसायाला सुद्धा जीवनदान मिळाले आहे. पेपर बॅग बनवायचा व्यवसाय हा असा व्यवसाय आहे. जो कमी खर्चात चालू होऊन जास्त नफा कमावून देऊ शकतो. तुम्ही हा व्यवसाय खूपच कमी गुंतवणूक करून सुरू करू शकता आणि चांगला नफा मिळवू शकता. 

हा व्यवसाय असा आहे, ज्याला शिक्षणाची काही अडचण नाही. कोणीही हा व्यवसाय करू शकतो. तुम्ही शिकत असताना; पण हा व्यवसाय करू शकता.

प्लास्टिक बंदी नंतर पेपर बॅग चा वापर आता छोट्या दुकानदारान पासून ते मोठ्या मॉल पर्यंत जसे कपड्यांचे दुकान, ज्वेलरी शॉप, मोठी पुस्तकालये या सारख्या दुकानात होत आहे. या बॅग सामान पॅक करायला तर चांगल्या आहेतच; सोबत तुम्ही यावर तुमच्या दुकानाची जाहिरात पण करू शकता. याची सर्वात मोठा फायदा हा आहे की यामुळे प्रदूषण होत नाही.

पेपर बॅग च मार्केट आपल्या कडे मोठे होत आहे, तुम्ही हा व्यवसाय लहान प्रमाणात सुरू करून त्याला हळू हळू मोठा करू शकता. हा व्यवसाय सुरू करायला तुम्हाला जास्त पैशाची गरज भासत नाही.  चला तर मग आपण जाणून घेऊया..!

हे वाचलंत का? –
* ३०+ व्यवसाय आयडिया
* व्यवसाय कसा सुरू करावा?

पेपर बॅग व्यवसायसाठी लायसन्स आणि रजिस्ट्रेशन कसे करावे?

जर तुम्ही हा व्यवसाय छोट्या प्रमाणात सुरू करणार असाल, तर तुम्हाला यासाठी तुमच्या महानगरपालिके मधून ट्रेड लायसन्स ची गरज आहे. तुम्ही फक्त ट्रेड लायसन्स घेऊन याची सुरुवात करू शकता. 

आम्ही तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो की, तुम्ही या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करून घ्या. यामुळे तुम्हाला बँक कर्ज घेण्यात व टॅक्स ची बचत करण्यात मदत होईल. सोबतच आपल्या सरकार द्वारे व्यवसायसाठी वेग-वेगळ्या योजना चालू राहतात. 

तुम्ही त्याचा पण उपयोग घेऊ शकता. या करिता तुमचा व्यवसायाचे रजिस्ट्रेशन असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करायचा आहे तर या करिता तुम्हाला एक कंपनी तयार करावी लागेल व तिचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला ROC म्हणजेच Registar of Companies मध्ये रजिस्ट्रेशन करावे लागते.

याच सोबत तुम्हाला आणखी काही रजिस्ट्रेशन करावे लागतील. जसे GST रजिस्ट्रेशन आणि तुम्ही जर शॉप लावून बॅग विकणार असणार तर Shop act रजिस्ट्रेशन सुद्धा करावे लागेल. रेजिस्ट्रेशन करणे ऐकायला खूपच मोठे काम वाटते परंतु या खूप लवकर होणाऱ्या गोष्टी आहेत.

तुम्ही जर महाराष्ट्र व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या राज्यात बॅग चा व्यवसाय करत असाल, तर तिथं आणखी काही कागद लागतील, तर तुम्ही तिथल्या CA चा सल्ला घेऊन बाकीचे रजिस्ट्रेशन आणि लायसन्स काढून घेऊ शकता.


Paper Bag व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च लागतो?

हा व्यवसाय एक लघु उद्योग आहे. यामध्ये तुम्हाला सर्वात मोठा खर्च हा paper bag making machine वरच करायचा आहे. दुसरं म्हणजे त्यासाठी लागणारी जमीन व मजूर याचा खर्च तुम्ही तुमच्या क्षमते नुसार करू शकता.

आपण कोणता पण व्यवसाय करत असाल, तर त्यासाठी महत्वाचे आहे. त्याला लागणारा खर्च, तुमच्याकडे पुरेसे भांडवल नसेल, तर थांबून जा. कमी भांडवल मध्ये हा व्यवसाय करण्याची घाई करू नका. मार्केट चा पूर्ण अभ्यास करून हा व्यवसाय सुरू करा.


Paper bag machine ची माहिती

पेपर बॅग बनवण्याकरिता दोन प्रकारच्या machine येतात. Semi Automatic आणि Fully Automatic आपण या दोन्ही Machine ची माहिती घेऊ. एक गोष्ट लक्षात घ्या. आज मार्केट मध्ये कस्टम बॅग ची डिमांड वाढत आहे. आज कोणता पण दुकानदार तुम्हाला म्हणेल की, मला माझा बॅग वर माझा व्यवसायाचा लोगो पाहिजे.

अश्या वेळी तुम्हाला विचार करायची वेळ येईल, की आता काय करावे? तर याची आपण अधीच खबर घेतलेली बर. तर या करिता अशी machine घ्या, की जे तुम्हाला Logo सोबत काहीही प्रिंट करून देईल. जर तुम्ही प्रिंटिंग केलेल्या customize बॅग विकाल. तर तुम्हाला जास्त फायदा होईल.

एक पूर्ण आटोमॅटिक मशीन 4 पासून ते 10 लाख रुपयांची होईल. या मशीन ची किंमत तिच्या उत्पादन क्षमते वर अवलंबून आहे. एक पूर्ण आटोमॅटिक मशीन एका तासाला जवळ जवळ 14000 बॅग तयार करू शकते. तुमचे भांडवल जास्त असेल व तुम्ही मोठ्या प्राणावर हा व्यवसाय करत असाल तर ही मशीन तुमच्या फायद्याची ठरेल.

तुम्ही जर हा व्यवसाय छोट्या प्रमाणात करणार आहात तर तुम्हाला सेमी आटोमॅटिक मशीन पुरेशी आहे. जिची किंमत 2 ते 4 लाख पर्यंत आहे. तेच तुम्ही जर मॅन्युअल पेपर बॅग व्यवसाय करीत असाल, तर तुम्ही तो 50 ते 1 लाख रुपयांत सुरू करू शकता. यामध्ये तुम्हाला बॅग तयार करण्यासाठी मजुरांची आवश्यकता राहील.

paper bag making machine

Image source:- indiamart.com


Paper bag making मशीन कुठून विकत घ्यावी?

Paper bag making machine ऑनलाईन सुध्दा उपलब्ध आहे. या करिता तुम्हाला indiamart या संकेतस्थळवर जावे लागेल. तिथं गेल्यावर तुम्हाला search करायचं आहे. paper bag machine नंतर तुम्हाला तिथं machine आणि तिच्या विक्रेत्यांची सर्व माहिती मिळेल.

या संकेतस्थळवर विक्रेत्याचे मोबाईल नंबर उपलब्ध आहेत. त्यावर संपर्क करून तुम्ही मशीन ची सर्व माहिती घेऊ शकता व तुम्ही या संकेतस्थळा वरूनच payment करून machine खरेदी करू शकता. 

लक्ष्यात घ्या या संकेतस्थळा व्यतिरिक्त तुम्ही दुसरे कुठून payment करीत असाल, तर कुठल्याही फ्राड ला तुम्ही स्वतः जबाबदार राहणार.


पेपर बॅग व्यवसाय करीता लागणारे सामान

1) बॅग ला लागणारे हँडल :- 

तुमचे ग्राहक जर तुम्हाला म्हणेल, की त्यांना हँडल असलेली बॅग पाहिजे. तर तुम्हाला ते हँडल मार्केट मधून विकत घ्यावे लागतील. जे 1रु. ची जोडी मिळतात.

2) प्रिंट कराण्यासाठी श्याही :- 

तुम्ही जर प्रिंट बॅग तयार करत असाल, तर तुम्हाला श्याही ची आवश्यकता भासेल. तुम्ही ज्या ही कलर ची प्रिंट करणार आहे. तो कलर तुम्ही विकत घेऊ शकता. हा कलर तुम्हाला 150 रु. किलो मिळून जाईल.

3) बॅग ला चिपकवण्यासाठी लागणार गोंद :-

या बॅग कागदाच्या असल्यामुळे याला गोंदनी चिपकाव्या लागतात. त्याकरिता तुम्हाला गोंद ची आवश्यकता असेल. हा गोंद मार्केट मध्ये तुम्हाला 100 ते 200 रु किलो नी मिळून जाईल.

4) पेपर बॅग साठी लागणारा कागद :-

पेपर बॅग तयार करण्यासाठी सर्वात महत्वाचं असतो कच्चा माल तो म्हणजे कागद, या करिता तुम्हाला पूर्ण पेपर रोल विकत घ्यावा लागेल. या रोलची किंमत त्याचा क्वालिटी नुसार आहे. तुम्ही जेवढी क्वालिटी चांगली घ्याल तेवढा महाग हा रोल येईल.

हा रोल तुम्हाला 25 ते 50 रु किलो ला मार्केट मध्ये आरामात मिळून जातो. या पेपर मध्ये सुद्धा खूप प्रकार येतात. जे तुम्हाला मार्केट च्या demand नुसार घ्यायचा आहे.


पेपर बॅग मेकिंग या व्यवसायाला लागणारी जागा

हा व्यवसाय Manufacturing चा असल्याने यासाठी तुम्हाला मोठी जागा लागेलच. सोबतच या जागेवर जायला चांगला रस्ता व यामध्ये आपली मशीन ही इलेक्ट्रिक वरची असल्यामुळे सर्वात महत्वाचं इथं ऊर्जेची सोया असणे गरजेचे आहे.

जागा अशी निवडा जिथं आजू बाजूने कुणाला आपला त्रास वर त्यांचा आपल्याला त्रास व्हायला नको. या करिता तुम्हाला कमीत कमी 300 फूट जागा लागेल. ज्या मध्ये तुमची मशीन व इतर गोष्टी आरामात राहतील.


मशीन मध्ये पेपर बॅग कशी तयार केली जाते?

पेपर बॅग तयार करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला मशीन मध्ये तुम्ही जो कागदाचा रोल घेतला आहे तो लावला लागतो. त्या नंतर मशीन मध्ये गोंद आणि श्याही टाकली जाते. ज्या मुळे बॅग चिपकवलि जाते व ती प्रिंट केली जाते.

या नंतर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बॅग पाहिजे, ती सेटिंग केली जाते. ज्यामध्ये बॅग ची संख्या किती असेल, तिची साइज, हे सर्व सेट झाल्यावरच मशीन चालू होते. तुम्ही मशीन ला दिलेल्या कमांड नुसार ती मशीन काम करून तुमच्या पेपर बॅग तयार होतात व त्यावर प्रिंटिंग होते. आणि मशीन मधून पूर्ण बॅग तयार होऊन येते.


मार्केट मध्ये कोणत्या साइज च्या बॅग ची मागणी आहे?

मार्केट मध्ये कोणत्याही साईझ च्या बॅग चालत नाही. काही ठराविक ठरलेल्या साईझ आहेत. ज्या मार्केट मध्ये जास्त चालतात. त्यामुळे तुम्ही अश्या साईझ च्या बॅग तयार करा. ज्यांची मार्केट मध्ये डिमांड आहे. मार्केट मध्ये डिमांड असलेले प्रोडक्ट आपण तयार करत असाल, तर त्याची मार्केटींग करायला सोपी जाते. त्यासाठी मार्केट चा सर्वे करा.

तुमच्या माहितीसाठी बॅग च्या साईझ खाली दिल्या आहेत.

  • 4.25×6
  • 5.25×7.5
  • 6.75×8.5
  • 8.25×10
  • 9.75×12.75
  • 10.5×16

Paper bag business मार्केटिंग कशी करावी?

हा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालावा व लवकर मोठा व्ह्यावा, याकरिता तुम्ही ज्या बॅग तयार करीत आहे. त्या क्रिएटिव्ह, दिसायला सुंदर आणि आकर्षक असायला हव्या. तुम्ही याकरिता ग्राफिक्स डिजाईनर ची मदत घेऊ शकता.जो तुमच्या कंपनीसाठी एक वेगळी डिजाईन तयार करेल, जी तुमच्या प्रॉडक्ट च्या ब्रॅण्डिंग च्या कामात येईल.

तुम्हाला हा व्यापार मार्केट मध्ये लवकर मोठा करायचा असेल, तर तुम्हाला मार्केटिंग करावी लागेल. तुम्हाला छोट्या मोठया सर्व शॉप मध्ये जाऊन भेट द्यावी लागेल. त्यांना तुमच्या प्रोडक्ट बद्दल माहिती द्यावी लागेल. इतरांच्या तुलनेत तुम्ही काय जास्त देत आहे. तुमचे प्रोडक्ट कसे चांगले आहे. हे सांगावे लगेल.

या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील न्युज पेपर मध्ये जाहिरात करू शकता. याच सोबत कंप्पणीची एक वेबसाईट तयार करून डिजिटल मार्केटींग सुद्धा करू शकता.

वरील माहिती ही व्यवसाय बद्दल आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचे Promotin करणे हेतू नाही. तुम्हाला या माहिती संदर्भात काही प्रश्न असल्यास तुम्ही कंमेंट मध्ये विचारू शकता. आम्ही उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली. आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. अश्याच छान छान माहितीसाठी माहिती लेक ला अवश्य भेट देत राहा..!

  • धिरज तायडे

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *