म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी?

mutual fund information in marathi

mutual-fund

Image source-google/image by- moneycontrol

म्युच्युअल फंड म्हणजे काय? (Mutual Fund in marathi)

आजकाल आपण सगळीकडे ऐकतो…!

म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट कर चांगले रिटर्न्स मिळतील…!”
“म्युच्युअल फंड बेस्ट आहे..! त्यात इन्व्हेट कर…! इत्यादी इत्यादी.

पण म्युच्युअल फंड नेमकं आहे तरी काय….? त्याच बद्दल आज आपण जाणून घेऊया.

म्युच्युअल फंड हे शेअर्स मार्केट च्या निगडित आहे. शेअर्स मध्ये पैसे इन्व्हेट करतो, त्याच प्रकारे यामध्ये पण पैसे इन्व्हेट करावे लागतात.

“थांबा… थांबा… घाबरून जाऊ नका…!”

मला माहित आहे, तुम्ही शेअर्स मार्केट ऐकलं तेव्हाच तुमच्या मनात आलं असेल, की यात नक्की पैसे बुडत असणारच….हो ना…? “पण तसं काही नाही…..!”

शेअर्स घ्यायचे असल्यास आपल्याला वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यावे लागतात. आणि आपल्याला त्याबद्दल माहिती नसतांना घेतो सुद्धा मग…काय स्टॉक मार्केट (शेअर मार्केट) हे कधी स्थिर नसत. कधी कमी तर कधी जास्त होत असत. आपण घेतलेल्या शेअर्स पेक्षा मार्केट वर गेलं तर फायदा खाली गेलं तर नुकसान.

म्युच्युअल फंड पण याच आधारावर चालत. पण फरक इतका आहे, की आपले पैसे एका शेअर्स मध्ये न गुंतवता वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतो. आणि जो आपले पैसे गुंतवतो त्याला फंड मॅनेजर असे म्हणतात.

तो आपले पैसे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजेच की, बँक सेक्टर, फार्मा सेक्टर, बॉण्ड्स इत्यादी ठिकाणी थोडेथोडे गुंतवतो. समजा फार्मा सेक्टर मधील मार्केट खाली जरी गेलं तरी बँक आणि इतर सेक्टर वर असू शकतात.

त्यामुळे आपले पैसे बॅलन्स राहतात. आणि मार्केट वर गेलं तर आपलाच फायदा. यात रिस्क खूप कमी असते. म्युच्युअल फंड मध्ये रिटर्न्स पण खूप चांगले मिळतात. फक्त जास्त कालावधी साठी आपले पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात. त्यामुळे तुम्हाला परतावा (रिटर्न्स) पण चांगला मिळतो.

आणि वाटलंच तर आपले पैसे आपण कधीही काढू शकतो. त्यांना अप्लाय केल्यावर ५-६ दिवसात तुमच्या अकाउंट वर पैसे जमा करतात.

तुम्ही ही खालची लाईन खूपदा ऐकली असेल.

“Mutual fund investments are subject to market risks. Please read all scheme-related documents carefully before investing.”

याचा अर्थ असा की…,

“म्युच्युअल फंडाची गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे. कृपया गुंतवणूकीपूर्वी योजनांशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.” त्याच अस आहे की….,

फक्त म्युच्युअल फंड अकाउंट कुठल्या कंपनी मध्ये गुंतवायचे त्याचा थोडं बघावं लागत.
आणि ते पण काही इतकं कठीण नाही. त्यासाठी बऱ्याच वेबसाईट आहेत जसे की,

Mutual funds sahi hai…! इत्यादी इत्यादी

mutual funds meaning in marathi

Mutual-Fund-Sahi-Hai-Banner-1-1024x388

mutual fund mhanje kay

mfuonline

यावर तुम्ही सर्वात जात रिटर्न्स देणारी कंपनी मध्ये म्युच्युअल फंड अकाउंट उघडू शकता. आणि त्यात आपण दोन पद्धतीने पैसे गुंतवू शकता.

1) Lumpsum

2) SIP (systematic investment plan)

*आधी जाणून घेऊया lumpsum म्हणजे काय..?
आपल्याला एकदम मोठी रक्कम काही वर्षां साठी जमा करायची असल्यास त्याला lumpsum पद्धत म्हणतात.

*आणि कमी पैसे असल्यास दर महिन्याला ५००-५०० रुपये करून पण जमा करू शकता त्याला SIP पद्धत असे म्हणतात.

SIP आपण ५०० रुपयांपासून किती पण करू शकतो. ही पद्धत सर्वात बेस्ट आणि सगळ्यांच्या आवडीची आहे. कारण यात दर महिन्याला थोडेथोडे पैसे भरावे लागतात.

मी पण तुम्हाला SIP मधेच इन्व्हेस्ट करायचा सल्ला देईल.

  • सागर राऊत

हे वाचलंत का? –

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment