Marathi motivational | Marathi motivational speech
लोक तुमचा अपमान करत असेल तेव्हा..त्यांना अशी वागणूक द्या.
मित्र, लोक, किव्हा नातेवाईक तुमचा वारंवार अपमान करत असेल, तेव्हा काय करायला पाहिजे?
शांत राहून सर्व सहन करायला पाहिजे? की त्यांना जागच्या जागी उत्तर द्यायला पाहिजे?
हा विचार खूपदा तुमच्या डोक्यात आलेला असेल.
जेव्हा तुम्ही वारंवार अपमान सहन करता. तेव्हा तुम्ही स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स गमावून बसता.
समोरचा व्यक्ती जे शब्द वापरतो, तसे तुम्ही नसताना दुखील स्वतःला ते समजून बसता.
कदाचित तो व्यक्ती तुम्हाला म्हणत असेल की, तू काम चोर आहे, सेल्फीश आहेस, किव्हा काही कारण नसताना ते तुम्हाला त्रास देत असतील किव्हा तुमचा अपमान करत असतील.
तेव्हा तुमचा स्वाभिमान दुखवणारच. त्यावेळेला स्वतःच्या स्वाभिमानाची रक्षा स्वतःच करावे लागेल.
जेव्हा असा अपमान होतो, तेव्हा काहींना वाईट वाटत, काही लगेच उलट उत्तर देतात, तर काही शांतपणे सहन करतात.
यामधलं आपण काय करायला हव. शांत राहायला हवं की लगेच त्यावर प्रतिक्रिया द्यायला हवी. हा सर्वात मोठा प्रश्न.
अश्या वेळेस जर आपण शांत बसलो, तर चाणक्य नीती प्रमाणे आपण मूर्ख आहोत.
चाणक्य असे म्हणतात की, जर एखादा व्यक्ती एक वेळ अपमान सहन करत असेल, तर तो व्यक्ती समजदार असतो.
दोन वेळा अपमान सहन करणारा व्यक्ती हा महान असतो. परंतु वारंवार अपमान सहन करणारा व्यक्ती हा मूर्ख असतो.
परंतु सहनशीलता आणि मूर्ख पणात खूप अंतर आहे.
कोणी तुमचा अपमान करत असेल, त्या परिस्थितीत समजून घ्या की, त्या व्यक्तीचा इगो वाढला. त्याला पैश्याचा, किव्हा सत्तेचा माज आलेला आहे.
कोणी कोणी स्वतःचा शो ऑफ करण्यासाठी दुसऱ्याच अपमान करतात. तर कुणाचा अपमान करणे हा एखाद्याचा छंदच असतो. तर कोणी चार चौघात असे दाखवतो की मी खूप श्रेष्ठ.
तुमचा जेव्हा अपमान होत असेल, त्यावेळेला एक smile करा आणि त्यावर काहीच react करू नका. तसेच त्या गोष्टीला इग्नोर करा.
तुम्ही रिअकॅशन न दिल्याकारणाने त्याच व्यक्तीचा उलट अपमान होतो.
तुम्हाला वाटत असेल, हा किती सहज म्हणत आहे, अपमान सहन करा. परंतु मला माहिती आहे.
त्यांच्या अश्या अपमानास्पद वागणुकीमूळ तुम्हाला त्यावेळेला जाम राग आलेला असणार.
तुम्हाला वाट असेल की, लगेच त्याला उत्तर देऊन मोकळे व्हावे.
परंतु तसे न करता. आपल्या अपमानाच्या त्या आगेला दुसरीकडे डायव्हर्ट करा.
तुम्ही त्यावेळेला हत्ती प्रमाणे वागले पाहिजे. हत्ती जर चालत जात असेल आणि त्यावर कुत्रे भुंकत असेल, तर हत्ती त्यांच्या कडे ढुंकूनही पाहत नाही. तो सरळ ताठ मानेने समोर चालतच जातो.
ही हिंदी मध्ये एक फेमस म्हणच आहे म्हणजेच काहवत आहे – हाती चले बाजार, कुर्ते भोके हजार
ज्याचं प्रमाणे त्यांच्या कडे लक्ष न देता. आपल्या कामावर फोकस करा. आपलं एक ध्येय निश्चित करून त्यावर सतत काम करा.
काही दिवसांनी जेव्हा तुम्ही तुमचं ध्येय गाठाल. तेव्हा तुमचे यशच आपोआप त्या अपमानाचा बदल घेईल.
तुमचे यशच त्या अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या कानाखाली जाळ काढेल हे नक्की.
आणि हो… हे लक्षात असू द्या. जो पर्यंत तुम्ही स्वतःला या जगासमोर सिद्ध करणार नाही. तो पर्यंत लोक, नातेवाईक हे तुमचा अपमान करतच राहणार.
म्हणून स्वतःच एक ध्येय निश्चित करा आणि त्यावर सतत काम करत राहा.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली कंमेंट करून नक्की कळवा. या आर्टिकल चा इतरांना फायदा व्हावा असे वाटत असल्यास मित्र आणि प्रियजनांन मध्ये नक्की शेअर करायला विसरू नका. तसेच अश्याच प्रकारच्या माहिती वाचण्यासाठी या वेबसाईट ला आवश्य भेट द्या. परत भेटूया एका नवीन विषयावर…धन्यवाद
- सागर राऊत
हे वाचलंत का ? –