ऑनलाइन सातबारा बघणे | महाराष्ट्र भूमी अभिलेख 2023

7/12 उतारा

सातबारा-satbara

(7/12 उतारा) म्हणजे काय? (सात बारा उतारा ऑनलाईन 2023)

सातबारा म्हणजे काय?

7/12 हा एक शेतीबद्दल एक दस्तऐवज आहे. जो की महाराष्ट्र व गुजरात सरकारच्या महसूल विभागाने भारतातील राज्यांच्या भूसंपत्ती नोंदणीतून काढलेला आराखडा आहे. वास्तविक नमुना नंबर 7 हा अधिकार अभिलेख आहे, तर नमुना नंबर 12 पीकपेरे दर्शवितो. हे दोन्ही मिळून 7/12 तयार होतो.

त्यालाच 7/12( सात-बारा उतारा) असे म्हणतात. त्या 7/12 मधून जमीनीचे सर्वेक्षण क्रमांक, जमीन मालकाचे नाव व त्याच्या लागवडीचे नाव, त्या जागेचे क्षेत्रफळ, लागवडीचा प्रकार – सिंचनात असो वा पाऊसा वरील पीक असो त्या सर्वांचा लेखाजोखा त्यामध्ये असतो.

महाभूलेख महाराष्ट्र भूमि अभिलेख: महाराष्ट्र शासनाने सर्व शेतकर्‍यांना व राज्यातील इतर नागरिकांना त्यांच्या शेती व जमीनीशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी अधिकृत वेबसाइट सुरू केली आहे.

ज्याचे नाव आहे. महाभुलेख ( Maha Bhulekh- Maharashtra Bhumi Abhilekh) या पोर्टलद्वारे सर्व शेतकरी आणि इतर नागरिक त्यांच्या जमिनीशी संबंधित माहिती पाहू शकतात – जसे महाराष्ट्र भूमी अभिलेख नकाशा खसरा-खतौनी रेकॉर्ड ऑनलाइन.

महाभुलेख महाराष्ट्राच्या या पोर्टलमध्ये राज्यातील कोणत्याही नागरिकाला त्याच्या आवश्यकतेनुसार माहिती मिळू शकते. या पोर्टलवर माहिती सामायिक करण्यासाठी पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकण आणि अमरावती ही सहा मुख्य ठिकाणे आहेत.

महाराष्ट्र राज्यातील सर्व 358 तालुक्यांतील 7/12 उतारा डिजिटायझेशन करण्यात आले आहे.महाराष्ट्रातील भूमी अभिलेख, शिलालेख, खसरा-खतौनीची प्रत आणि महाराष्ट्र भूमी नकाशाची सर्व माहिती इथे मिळू शकते.

Read This :- डिजिटल साइन (डिजिटल हस्ताक्षरात) सात बारा डाउनलोड करण्याकरिता इथे क्लिक करा.!

या सर्व माहितीसाठी आता महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची काही आवश्यकता नाही. आपल्या भूमीशी संबंधित सर्व माहिती महाभूलेख वेबसाईट तुम्हाला एकाच ठिकाणी देते.

महाभूलेखच्या माध्यमातून आपल्या घरी राहून आपल्या जमीनीशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकते. यासाठी आपल्याकडे इंटरनेट असणे आवश्यक आहे.

7/12 ऑनलाईन कसा शोधायचा?

१) महाराष्ट्र राज्य भूलेख यांची अधिकृत वेबसाइट “bhulekh.mahabhumi.gov.in” या संकेतस्थळ वर जा.

२) वेबसाइटच्या स्क्रिन वर तुम्हाला “अमरावती”, “पुणे” “नाशिक”,”औरंगाबाद”,”नागपूर” किंवा “कोकण” या सहा विभागातील तुमचा विभाग निवडावा लागेल.

satbara1

३) मग “गो” पर्यायावर क्लिक करा. आणि आपल्या स्क्रीनवर एक नवीन वेबपृष्ठ येईल जिथे तुम्हाला “7/12” किंवा “8 ए” निवडावे लागेल.

४) त्यानंतर तुमचा जिल्हा (District), तालुका (Taluka), व गाव (village) निवडा.

7/12 उतारा महाराष्ट्र राज्य

satbara2

ऑनलाइन सातबारा बघणे

५) त्यानंतर तुमचा सर्व्हे (Sarvey No.) टाका. आणि search बटण वर क्लिक करा.

६) नंतर तुमचा मोबाईल नंबर टाका. नंतर तुम्हाला तेथे Captcha दिसेल. तो जशास तसा तेथे टाका. आणि ok बटण वर क्लिक करा.

७) तुम्हाला तुमचा 7/12 उतारा स्क्रिन वर दिसेल.

Mahabhulekh satbara online 2023

satbara4

अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.
धन्यवाद…

  • सागर राऊत

हे वाचलंत का? –

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share