महिन्याच्या पहिल्या दिवशी आनंदाची बातमी, गॅस सिलिंडर किमतीत कपात

LPG Gas Cylinder Price Today : ऑगस्ट महिन्यातील पहिल्याच तारखेला गॅस सिलेंडर स्वस्त झाल्याची खुश खबर मिळालेली आहे. जुलै महिन्यातील गॅस महागाई नंतर आत्ता थोडी किंमत कमी झालेली आहे. ऑइल मार्केटिंग कंपनी ने १ ऑगस्ट च्या सकाळ पासून १०० रुपयांनी कमर्श‍ियल स‍िलेंडर चे भाव कमी केलेले आहे.

१९ किलोग्रॅम सिलेंडर साठी आता १६८० रुपये द्यावे लागेल. या आधी सिलेंडर साठी १७८० रुपये द्यावे लागायचे. परंतु सध्या घरगुती सिलेंडर किमतीवर काहीच बदल पाहायला मिळाले नाही.

नवीन किमती १ ऑगस्ट पासून लागू

सध्या कमर्श‍ियल गॅस स‍िलेंडर वरील दर कमी करण्यात आलेले असून घरगुती गॅस सिलेंडर वरील दर आधी प्रमाणेच आहेत. आधी प्रमाणेच दिल्लीमध्ये गॅस सिलेंडर साठी ११०३ रुपये द्यावे लागतील. परंतु कमर्श‍ियल गॅस स‍िलेंडर चे भाव १७८० वरून १६८० रुपये करण्यात आलेले आहे.

याच प्रकारे मुंबई मध्ये आधी १७33. ५० रुपये सिलेंडर होते तर आत्ता त्यासाठी तुम्हाला १६४०.५० रुपये द्यावे लागतील.

सिलिंडरच्या दरात २७ दिवसांनी कपात करण्यात आली.

तेल कंपन्यांनी 27 दिवसांनी कमर्श‍ियल गॅस सिलिंडरच्या दरात कमतरता केली आहे. आधी ४ जुलै रोजी कंपन्यांकडून सिलेंडर मागे ७ रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यानंतर जुलै, मार्च, एप्रिल, मे आणि जून मध्ये सिलिंडर किमती कमी झालेल्या होत्या.

१ मार्च २०२३ रोजी सिलिंडरची किंमत २११९.५० रुपये होती. त्यानंतर एप्रिल मध्ये ते २०२८ रुपये, इतकी झाली. त्यानंतर मे मध्ये १८५६.५० रुपये तर १ जून रोजी १७७३ रुपये किंमत झाली.


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment