गॅस सब्सिडी आणि नवीन कनेक्शन (Gas Subsidy in Maharashtra)

my lpg

LPG

एलपीजी म्हणजे काय? | LPG full form in marathi

एल पी जी (LPG) म्हणजे लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (Liquefied petroleum gas / LPG)

ज्या घटकामध्ये प्रोपेन आणि ब्यूटेन आहेत, ते ज्वलनशील हायड्रोकार्बन इंधन वायू आहेत. एलपीजी (LPG) हे ज्वलनशील हायड्रोकार्बन वायूंचे मिश्रण आहे. ज्यात तीन एलपीजी वायूंचे मिश्रणाचा समावेश आहे. जसे की प्रोपेन, ब्युटेन, आइसोब्युटेन.

घरगुती गॅस हे एलपीजी म्हणून अधिक लोकप्रिय आहे. हे अक्षरशः अनेक हायड्रोकार्बन वायूंचे मिश्रण आहे. हे स्वयंपाक, गरम करणारे उपकरणे आणि काही वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरले जाते. आजकाल, हे क्लोरोफ्लोरोकार्बनच्या जागी रेफ्रिजरंट म्हणून अधिक प्रमाणात वापरले जाते. कारण यामुळे ओझोन थरला कोणतेही नुकसान होत नाही.

एलपीजी गॅस तेल आणि वायू विहिरींमधून येते, कारण हे सर्व जीवाश्म इंधन आहेत. एलपीजी गॅस उत्पादन प्रक्रियेत नैसर्गिक गॅस प्रक्रिया आणि क्रूड ऑइल रिफायनरी प्रक्रियेचा समावेश असतो.

एलपीजी हे प्रेशरेशन्सद्वारे लिक्विड केलेले, नैसर्गिक वायू प्रक्रिया आणि तेल शुद्धीकरणातून येते.

वेगवेगळ्या देशांमध्ये पुरविल्या जाणार्‍या एलपीजी हीटिंग इंधन वायू मध्ये प्रोपेन, ब्युटेन किंवा प्रोपेन-ब्युटेन मिश्रण असू शकतात.

हे वाचलंत का? –
* रेशन कार्ड धान्य वाटप माहिती
* पंतप्रधान किसान योजना यादी आणि संपूर्ण सविस्तर माहिती

एलपीजी गॅस कुठून येतो ?

एलपीजी गॅस हा ड्रिलिंग ऑइल आणि गॅस वेल्समधून येतो. हे एक जीवाश्म इंधन आहे. एलपीजी उत्पादने हे नैसर्गिकरित्या इतर हायड्रोकार्बन इंधन सह संयोजन मध्ये आढळतात. विशेषत: कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू.

एलपीजी नैसर्गिक वायूच्या प्रसंगादरम्यान आणि तेल रिफायनिंग दरम्यान तयार केले जाते.

क्रूड (crude) ऑइल ला रिफायनरी फॅक्टरी मध्ये आणून त्यावर हिटिंग प्रक्रिया केल्यानंतर, त्यामधून एलपीजी वेगळा केला जातो.


नवीन एलपीजी कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया (LPG Online Booking- गॅस सिलेंडर बुकिंग)

१) सर्व प्रथम, एलपीजी कनेक्शनसाठी आपल्याला पाहिजे असलेल्या कोणत्याही गॅस सेवेच्या संबंधित वेबसाइटवर जा.

२) गॅस सर्व्हिस वेबसाइटच्या पेज वर आपल्याला एलपीजी कनेक्शन किंवा नवीन ग्राहकांसाठी(New registration) रजिस्टरचा पर्याय दिसेल.

३) यानंतर, कनेक्शनसाठी आपल्याला स्क्रीनवर ऑनलाइन फॉर्म दिसेल.

४) या फॉर्ममध्ये आपली माहिती, राज्य, शहराचे नाव, पत्ता, जवळच्या वितरकाची (Distributor) माहिती देखील विचारली जाईल. ती माहिती व्यवस्थित भरावी.

४) या फॉर्मसह आपल्याला आपला आयडी प्रूफ, पत्ता पुरावा आणि फोटा जोडावा लागेल.
जसे की,

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • PAN कार्ड
  • ड्राइविंग लाइसेंस

५) फॉर्म पूर्ण भरताच आपल्याला एक कंफर्मेशन मैसेज आणि मेल मिळेल. हा मैसेज तुमचा फॉर्म पूर्ण भरल्या गेल्याचा संदेश असेल.

६) तर त्याच स्क्रीनवर, आपण आपला अप्‍लीकेशन नंबर(Application No.) बघू शकाल.

७) यानंतर, भरलेल्या फॉर्मचे एक प्रिंट आउट घ्या.

८) अर्जाच्या मंजुरीनंतर तुम्हाला फॉर्मसह (Distributor) वितरकाकडे आयडी प्रूफ, अ‍ॅड्रेस प्रूफ कॉपी व फोटो सोबत नेण्याची आवश्यकता असेल.

९) कनेक्शननुसार आपल्याला काही रक्कम द्यावी लागेल आणि सर्व कागदाच्या मंजुरीनंतर एलपीजी गॅस सिलिंडर तुमच्या पर्यंत पोहोचविला जाईल.


एलपीजी गॅस सब्सिडी कशी तपासावी? (LPG Gas Subsidy)

१) सर्वात आधी Mylpg.in वेबसाइटवर जा.

२) वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर तीन एलपीजी सिलेंडर कंपन्यांचा टॅब (फोटोसह) असेल.

३) आपली कंपनी (ज्याचे शिलेंडर आहे ते) सेलेक्शन करणे आवश्यक आहे.

४) जर इंडियन गॅस चे सिलेंडर असल्यास त्या टॅबवर क्लिक करा.

५) सब्सिडी आली किंवा नाही हे तपासण्यासाठी एक नवीन इंटरफेस उघळेल.

६) त्याच्या बार मॅन्यू मध्ये जाऊन ‘Give your feedback online’ वर क्लिक करा.

७) नंतर त्यामध्ये आपला मोबाइल नंबर, एलपीजी कंज्यूमर आयडी, राज्य नाव, डिस्ट्रिबटरची माहिती भरा.

८) त्यानंतर ‘Feedback Type’ वर क्लिक करा.

९) ‘Complaint’ हे पर्याय निवळून ‘Next’ च्या बटणावर क्लिक करा.

१०) नवीन इंटरफेसमध्ये तुमच्या बँक माहिती दिसेल. त्यावर दिसेल खात्यात सब्सिडी ची रकम आली किंवा नाही.


एलपीजी सिलेंडर च्या नवीन किमती (गॅस सिलेंडर चे आजचे भाव) – PRICE/14.2 kg

शहर नवीन किमती

अमरावती Rs.- 1,086.50
अकोलाRs.- 1,073
औरंगाबादRs.- 1,061.50
बीडRs.- 1,078.50
जळगावRs.- 1,058.50
जालनाRs.- 1,061.50
कोल्हापूरRs.- 1,055.50
लातूरRs.- 1,077.50
मुंबईRs.- 1,052.50
नागपूरRs.- 1,104.50

जाणून घ्या तुमच्या शहरातील सध्याचे नवीन दर….खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://cx.indianoil.in/webcenter/portal/Customer/pages_productprice


महत्वाच्या सूचना :-

  • जर तुम्ही शासकीय गॅस कनेक्शन घेतले असेल तर तुम्हाला एका वर्षामध्ये सहा सिलिंडरवर अनुदान मिळते. आपण यापेक्षा जास्त सिलिंडर घेतल्यास आपल्या नियमित फी आकारल्या जातील.
  • घरासाठी फक्त एक एलपीजी कनेक्शन चा नियम आहे, म्हणून आपण नवीन कनेक्शनसाठी अर्ज करत असाल तर जुने कनेक्शन बंद करा.
  • सिलेंडर घेतांना नेहमीच सिलेंडर सील आणि सेफ्टी कॅप तपासा.

सेफ्टी कॅप काढा आणि व्हॉल्व्हमधून काही गळती आहे, का ते तपासा.


एल.पी.जी. सिलेंडर चे वजन किती असते (LPG Cylinder weight )

गॅस सिलिंडरचे वजन १५ किलो ते १७ किलो इतके असते. हे प्रत्येक सिलिंडरच्या वरच्या भागावर लिहिलेले असते. तसेच स्क्रॅचिंगद्वारे देखील लिहिलेले असते.

ज्यामध्ये एलपीजी गॅस १४ किलो २०० ग्रॅम भरलेला असतो. जर रिकाम्या सिलेंडरचे वजन १६ किलो असेल, तर आपल्या भरलेल्या सिलेंडरचे वजन ३० किलो २०० ग्रॅम असेल.

आणि जर सिलिंडरचे वजन यापेक्षा कमी असेल, तर नाप-तौल विभागात तक्रार करा. याशिवाय साध्या कागदावर अर्ज करून ग्राहक फोरममध्ये तक्रार देखील नोंदवू शकतात.


Helpline Number

ग्राहकांना त्यांच्या तक्रारी / शंका नोंदविण्यास सोयीचा, सोपा टोल फ्री क्रमांक 18002333555 कार्यरत आहे.

अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.

धन्यवाद..!

  • सागर राऊत

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share