कैलास पर्वतावर कोणी का चढू शकत नाही?

1) आजपर्यंत कोणीही कैलास पर्वतावर चढू शकलेले नाही.!

भगवान शिवाला कैलास पर्वताचे स्वामी मानले जाते. हे तर आपल्या सर्वांनाच माहिती असेलच, तसेच असे मानले जाते, की महादेव आपल्या संपूर्ण कुटुंबासह आणि सर्व गणांसह कैलासात राहतात. पौराणिक कथा अशा अनेक घटनांबद्दल सांगते ज्यामध्ये अनेक वेळा राक्षस आणि आसुरी शक्तींनी कैलास पर्वतावर चढून शिवाकडून हिसकावण्याचा प्रयत्न केला.

परंतु त्यांचा हेतू कधीच पूर्ण होऊ शकला नाही. आजही ही गोष्ट प्राचीन काळी तितकीच खरी आहे. जगभरातील गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट जिंकले असले.

म्हणजेच त्याची चढाई केलेली असेल, परंतु याला कैलाश पर्वत अपवाद आहे. आज पर्यंत कोणालाही कैलास पर्वतावर चढाई करता आलेली नाही. हे असे का होते, आम्ही तुम्हाला याबद्दल काही प्रचातील गोष्टी सांगू. चला तर बघूया..!

2) अजूनही हे एक रहस्य आहे.!

हिंदू धर्मात कैलास पर्वताला खूप महत्त्व आहे, कारण ते भगवान शिवाचे निवासस्थान आहे असे मानले जाते. पण यात विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे आता पर्यंत ७००० हून अधिक लोकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट जिंकले आहे.

ज्याची उंची ८८४८ मीटर आहे, मात्र आजपर्यंत कोणीही कैलास पर्वतावर चढू शकले नाही, तर त्याची उंची एव्हरेस्टपेक्षा जवळजवळ 2000 मीटर कमी उंच. म्हणजे 6638 मीटर. ते रहस्य आजपर्यंत गूढच राहिले आहे.

3) केस आणि नखे वाढू लागतात.

कैलास पर्वताविषयी अशा गोष्टी अनेकदा ऐकायला मिळतात, जसे की, अनेक गिर्यारोहकांनी त्यावर चढाई करण्याचा प्रयत्न केला.

पण या पर्वतावर राहणे अशक्य होते, कारण तिथे शरीराचे केस आणि नखे वेगाने वाढू लागतात. याशिवाय कैलास पर्वत हे अत्यंत किरणोत्सारी भाग आहे.

4) मृत्यूनंतरच कैलाश पर्वतावर जाऊ शकतो.

कैलास पर्वतावर आजवर कोणीही चढू शकले नाही. यामागे अनेक कथा प्रचलित आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे, की भगवान शिव कैलास पर्वतावर राहतात आणि म्हणूनच तेथे कोणताही प्राणी शिखरावर पोहोचू शकत नाही.

मृत्यूनंतर किंवा ज्याने कधीही कोणतेही पाप केले नाही, तोच कैलासावर जाऊ शकतो.

5) माणूस दिशाहीन होतो.

कैलास पर्वतावर थोडेसे वर चढताच, माणूस दिशाहीन होतो, असेही मानले जाते. दिशेशिवाय चढणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे, त्यामुळेच आजपर्यंत कोणीही कैलास पर्वत चढू शकलेला नाही.

6) 1999 मध्ये संशोधन करण्यात आले होते.

1999 मध्ये, रशियन शास्त्रज्ञांची एक टीम एक महिना कैलास पर्वताखाली राहून त्याच्या आकारावर संशोधन केले. शास्त्रज्ञांनी सांगितले की, या पर्वताचे त्रिकोणी शिखर नैसर्गिक नसून बर्फाने झाकलेले पिरॅमिड आहे.

कैलास पर्वताला “शिव पिरॅमिड” असेही म्हणतात. जो कोणी या पर्वतावर चढण्यासाठी गेला तो एकतर मारला गेला किंवा तो चढल्याशिवाय परत आला.

7) चीननेही प्रयत्न केले होता.

चीन सरकारच्या सांगण्यावरून काही गिर्यारोहकांनी कैलास पर्वतावर चढाई करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनाही यश मिळाले नाही तसेच संपूर्ण जगाच्या विरोधाला अलग सामोरे जावे लागले.

अपयश आल्यानंतर चीन सरकारला त्यावर चढाई करणे थांबवावे लागले.

8) चेहऱ्यावर सुरुकुत्या दिसतात.

असे म्हणतात की, जो कोणी या पर्वतावर चढण्याचा प्रयत्न करतो, तो पुढे चढू शकत नाही, त्याचे मन वापस वळायला करत.

त्यांना असा इथल्या हवेत काही वेगळेच आहे असे अनुभवायला लागत. तसेच केस आणि नखे 2 दिवसात तितके वाढतात जितके ते 2 आठवड्यात वाढतात. तसेच शरीर कोमेजायला लागते. चेहऱ्यावर म्हातारपण दिसू लागते.

9) रसिया देखील अयशस्वी झाला.

चीनच नाही, तर रशिया देखील कैलास पुढे नतमस्तक झाले आहे. 2007 मध्ये रशियन गिर्यारोहक सर्गेई सिस्टिकोव्ह यांनी आपल्या टीमसोबत कैलास पर्वतावर चढाई करण्याचा प्रयत्न केला होता.

स्वतःचा अनुभव सांगताना सर्ज म्हणाले, ‘काही अंतर चढून गेल्यावर मला आणि संपूर्ण टीमला प्रचंड डोकेदुखी होऊ लागली. तेव्हा आमच्या पायांनी प्रतिसाद दिला. माझ्या जबड्याचे स्नायू घट्ट झाले आणि माझी जीभ गोठली. तोंडातून आवाज येणे बंद झाले. गिर्यारोहण करताना लक्षात आले की मी हा डोंगर चढण्यास समर्थ नाही. मी लगेच मागे वळून खाली उतरू लागलो, तेव्हाच मला बर वाटल.

10) खूपच अवघड चढण आहे.

29,000 फूट उंचीवर असतानाही एव्हरेस्ट चढणे तांत्रिकदृष्ट्या सोपे असल्याचे सांगितले जाते. पण कैलास पर्वतावर चढण्यासाठी मार्ग नाही. चहुबाजूंनी निखळ चट्टान आणि हिमनगांनी बनलेल्या कैलास पर्वतावर जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही.

अशा कठीण खडकांवर चढाई करण्यासाठी सर्वात मोठे गिर्यारोहक देखील बळी पडतात. दरवर्षी लाखो लोक कैलास पर्वताभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी येतात. वाटेत ते सरोवरालाही भेट देतात, पण कैलास पर्वतावर चढता न आल्याची बाब आजपर्यंत गूढच आहे.


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment