शेतकऱ्यांनो जमूनापारी बकरी पालन करून व्हा, लवकर श्रीमंत

jamuna pari marathi

नमस्कार शेतकरी मित्रांनो.., आज आपण या लेख मध्ये जमुनापरी बकरी पालन बद्दल माहिती पाहणार आहोत. आपण या विशेष जातीचे पालन करून श्रीमंत होवू शकतो. आणि कसे लोक या जातीचे पालन करून आपला बकरी पालनाचा व्यवसाय यशस्वी रित्या मोठा करून पैसे कमावत आहेत.? 

जमुणापरी बकऱ्या ह्या दूध व्यवसायसाठी जगभऱ्यात प्रसिद्ध आहेत. या बकऱ्या चे पालन करून तुम्ही त्यांच्या दुधाचा व्यवसाय करू शकता. मोठ्या प्रमाणात दूध देण्या करिता ह्या बकऱ्या प्रसिद्ध आहेत.

ज्या शेतकऱ्यांना बकरी पालनाची आवड आहे. त्यांच्यासाठी ही एक पाळण्यासाठी चांगली जात आहे. या जातीचे पालन खूप जास्त कठीण नसून, याच्या पालनाचे व्यवस्थित व्यवस्थापन केल्याने या व्यवसायामध्ये आपण चांगला नफा मिळवू शकता.

जमुनपरी बकरी ची जात कशी ओळखावी?

  • या बकरीचे कान थोडे लांब असतात आणि तिची मान ही आपल्या सामान्य बकरी पेक्षा खूप मोठी असते. 
  • जमूनापरी बकरी ही दुधासाठी आपल्या भारतात खूप प्रसिद्ध आहे. ही बकरी दिवसाला 2 ते 3 कीलोग्राम दूध देते. या बकरीच्या दूध मध्ये प्रोटीन खूप मोठ्या प्रमाणात मिळते.
  • जे दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थ साठी अती उपयुक्त मानले जाते. 
  • या बकऱ्या गरम प्रदेशात राहण्याकरिता बनल्या आहेत. आणि या बकऱ्या ना विविध प्रकारच्या चाऱ्या वर आपण जागवू शकतो. 

जमुनपरी बकरीचे पालन करण्यासाठी आवश्यक गोष्टी?

  • या बकऱ्यांना नेहमी चांगल्या चाऱ्याची आवश्यक असल्यामुळे, तुम्हाला बकऱ्या विकत घेण्याआधी चाऱ्याची व्यवस्था करावी लागेल.
  • या बकऱ्या एका जागी ठेवून आपण बंदिस्त शेळी पालन करू शकणार नाही. कारण त्यांचे आरोग्य हे बिघडू शकते.
  • या बकऱ्यांना पाण्याची व्यवस्था ही चांगली असावी. रोज त्यांना स्वच्छ पाण्याची आवश्यकता असते. 
  • बकऱ्यांची चाऱ्याची समस्या मार्गी लागल्या नंतर आपल्याला याच्या राहण्याची सोय करावी लागणार, याकरिता तुम्हाला तुमच्या शेतात एक चांगली जागा पाहून एक शेड तयार करावे लागणार, ज्यामुळे बाकऱ्यांना वातावरणात होणाऱ्या बदला पासून आपण वाचवू शकणार. 
  • बकरी पालन करण्याकरिता ज्या बकऱ्या काही दिवसात प्रजनन करणार आहेत, अश्या बकऱ्या घेवू शकता किंवा यांचे छोटे पिल्ल विकत घेवून त्यांना पाळून मोठ करू शकता.
  • पिल्ल्यांचे पालन करत असताना, खूप काळजी घ्यावी लागते. त्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेवून त्या पिल्ल्याना तुम्ही एक वयस्क बनवू शकता व त्यांना विकून चांगले पैसे कमवू शकता. 
  • त्यांच्या करिता बांधलेले शेड हे मजबूत असावे व जंगली प्राण्यान पासून त्यांचा बचाव करणारे असावे. 
  • जमुणपरी बकऱ्याना स्वस्थ ठेवून एक चांगले शेळी पालन कशे तयार करावे. या करिता त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था कशी करावी हे जाणून घेणे महत्वाचे ठरते.
  • या बकऱ्या मुक्त संचार करणारी जात आहे. त्यामुळे यांना मोकळे ठेवून त्यांना चांगले पत्ते खायला द्यावे या बकऱ्या झाडाच्या छोट्या डांगा आवडीने खातात. 
  • त्यांच्या चांगल्या आरोग्य साठी व बकरी चांगल्या प्रकारे मोठी होण्याकरिता तुम्ही विकत असलेले फीड त्यांना देवू शकता. 

जमुनापरि बकऱ्यांचा व्यवसाय कश्या प्रकारे करावा?

  • एक गोष्ट लक्षात घ्या. या बकऱ्या आपण कशा करिता पालन करत आहे. तुम्ही दूध व्यवसाय करण्याकरिता पाळत आहात की मास व्यवसाय करिता. 
  • पैसे वाचवण्या करिता आपण नेहमी कमी खर्चात चांगली गोष्ट झाली पाहिजे, या नादात स्वतःचा घाटा करून बसतो यामुळे थोडा खर्च जास्त लागेल.
  • पण शेड हे चांगले तयार करा. त्यामुळे वातावरणाचा जास्त प्रभाव याच्यावर होणार नाही. 
  • बकऱ्या विकत घेतांना चांगल्या त्यामधील माहिती असलेल्या व्यक्ती ला सोबत न्या व निरोगी बकऱ्या खरेदी करा. आणि विकत घेतल्या नंतर लगेच त्यांना ज्या injections चि आवश्यकता आहे. ते लावून घ्या व कृमिनाशक औषधी डॉक्टर कडून लावून घ्या. 
  • बकऱ्याची खूप नाजूक जात असल्यामुळे, त्यांच्या वर वेळोवेळी लक्ष ठेवा बकरी थोडी बिमार वाटल्यास डॉक्टर चा सल्ला घ्या किंवा डॉक्टर ला दाखवून द्या.
  • बकऱ्यांना viral इन्फेक्शन पासून वाचवण्यासाठी आपण नियमित प्रमाणे त्यांचे टीकाकरण करून घ्या. 

जमुनापारी बकरी पालन व्यवसाय का करावा?

  • जमुणापरि बकरी पालन व्यवसाय करण्यामागे खूप कारण आहेत. बकरी पालनाचा व्यवसाय करतांना आपल्याला तो दोन प्रकारे करता येतो.
  • एक दूध व्यवसाय व दुसरा मास, जमुनपरि बकरी बरेच दा तीन पिल्याना जन्म देते आणि या बकरीची चांगली गोष्ट ही आहे, की त्यांची रोगप्रतिारकशक्ती खूप चांगली असते. यामुळे बकरी पालन व्यवसाय करिता एक चांगला पर्याय यामुळे तयार होतो.
  • आपण जर या बकरीच्या दुधाचा व्यवसाय करता, तर तो खूप फायद्याचा होवू शकतो. या बकरीच्या दुधाला बाजारात चांगली मागणी आहे. यांचे मास हे चामड्याच्या वस्तू तयार करण्यासाठी खूप मागणी आहे. 
  • या बकऱ्या आपल्या भारतात कमी असल्यामुळे याची मागणी खूप आहे. त्यामुळे शेतकरी शेतीला एक जोड धंदा म्हणून या बाकऱ्यांचे पालन करून चांगला नफा कमावून श्रीमंत होवू शकतो. 
  • या बाकऱ्यांचे पालन करत असताना, एक गोष्ट लक्षात घ्या. बकऱ्या खूप मोठ्या प्रमाणात पाणी पितात त्यामुळे यांना नेहमी स्वच्छ पाणी द्या. 

तुम्हाला ही माहिती कशी वाटली कॉमेंट मध्ये सांगा आणि काही अडचण असल्यास कॉमेंट करा. आणि अश्या प्रकारच्या Upadate करिता आमचा WhatsApp ग्रूप जॉईन करा.!


हे वाचलंत का ? –

Share