Chiku farming in Maharashtra

Chiku farming in Maharashtra

Chikoo season in India : चिकू हे फळ खायला रुचकर आणि गोड लागत. आपण खूप आवडीने हे फळ खातो. परंतु कधी विचार केलाय, का या फळाची शेती केली तर किती उत्पन्न येईल, आपल्याला हे वाचल्या नंतर तुमच्या मनात प्रश्न आला असेल, याची शेती कशी होते.?

नेमकी आपल्याला हेच बघेच आहे.! तर चला बघूया चिकू ची शेती कशी करायची.? याला जमीन कशी लागते? तसेच पाणी, हवामान कश्या प्रकारचे लागते.? 

मूळ हे फळ तसे मेक्सिको अमेरिके मधील मानले जाते. दक्षिण अमेरिकेत याची शेती खूप वर्षा पासून केली जाते.  तुम्हाला माहीत नसेल, जरी हे फळ विदेशी असेल, परंतु चिकुचे सर्वात जास्त उत्पन्न आपल्या कडेच घेतले जाते.

याचे उत्पादन साधारण महाराष्ट्रात, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशआणि गुजरात मध्ये घेतले जाते. 

आता या येवढ्या मोठ्या राज्यान मध्ये पिकवली जाते म्हटले तर याचे उत्पन्न किती असेल? तर याचे उत्पन्न आहे 5,45,000 टन जे 65000 एकर येवढ्या शेती मधून घेतले जाते. 

चिकू लागवडी साठी जमीन कशी तयार करावी.?

शेतकरी मित्रांनो, आपण कोणत्याही पिकाची शेती करण्यासाठी आपल्या शेतीला चांगल्या प्रकारे नांगरून घेवून तिला रोटवेतर च्या सहायाने समतोल करून घ्या. तसेच चिकू लागवडी साठी हीच प्रक्रिया करा.

बघा आपण ज्या प्रकारे आपल्या कडे संत्रा किंवा मोसंबी च्या कलमा बसवून घेता. तसेच याच्या कलमा सुद्धा दुसऱ्या कडून बसवून घ्या. म्हणजेच जो त्यातील तज्ञ व्यक्ती असेल, त्याकडून बसून घ्या.

चिकू ची शेती खूप प्रकारच्या माती मध्ये केली जावू शकते परंतु या करिता थोडी रेती वर्धक आणि उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन योग्य मानली जाते.

ज्या माती मध्ये जास्त प्रमाणात कॅ्शियम आहे. त्या माती मध्ये चिकू चांगल्या प्रकारे येवू शकत नाही. चिकू ची लागवड करण्याकरिता चांगल्या प्रकारे तयार केलेल्या जमिनीची आवश्यकता असते. 

चिकूच्या झाडांचे पाणी व्यवस्थापन

चिकू च्या झाडांना पाणी देण्याकरिता ठिबक सिंचन या पद्धतीचा वापर केला जातो. कारण या पद्धतीमुळे पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात बचत होते.

पाणी देण्याकरिता ठिबक सिंचन च्या नळीला झाडा पासून 50 सेंटिमीटर दूर ठेवले जाते. झाड चार वर्षांचे झाल्यानंतर पुढील 3 ते 4 वर्ष 1 मीटर येवढ्या अंतरावर ठेवले जाते. 

चिकूच्या झाडाला फळ किती दिवसांनी लागते.?

चिकुची लागवड झाल्या नंतर जवळपास तीन वर्ष नंतर या झाडाला चिकू यायला सुरवात होते. नंतर हळू हळू दर वर्षी जास्त फळ लागतात. आणि आपल्याला आर्थिक दृष्ट्या मजबूत करतात.

चिकूच्या झाडाला इतर झाडं प्रमाणे आधी फुल येतात आणि या फुलाच फळा मध्ये रुपांतर व्हायला चार महिने लागतात. चिकूच्या फळांना म्हणजेच, चिकू तोडणी ही एक तर हाताने केली जाते. 

चिकू पूर्ण पिकल्या नंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात याची तोडणी केली जाते. परंतु या मध्ये ते फळ ठेवले जातात. जे पूर्ण पिकायचे आहेत, जे फळ पूर्ण पाने पिकले आहेत तेच फळ तोडले जातात. 

किती वर्षा मध्ये नफा मिळतो.?

याचे फळ हे आपण विकायला सहाव्या वर्षी काढू शकतो. बाकी सहा वर्ष याला फळ येतील परंतु ते आपल्या काहीच कामाचे नाहीत. हो सहा वर्ष या शेता मध्ये तुम्ही भाजी पाला किंवा अन्य कशाची शेती करू शकता. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून. 

चिकूच्या झाड तुम्हाला त्याच्या वयाच्या 15 वर्षा पर्यंत आठ टन प्रति एकर उत्पादन मिळवून देईल. सुरवातीच्या वर्षाला हे उत्पादन 4 टन प्रति एकर पासून सुरू होईल.


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Knowledge

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *