Small Business Ideas: दररोज 2000 रुपये कमवा, ₹ 20 हजार पासून मोठ्या ब्रँडचा प्रवास सुरू करा.!

Small Business Ideas: जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल, ज्यामध्ये तुम्ही एक ब्रँड तयार करू शकता आणि ज्यामध्ये इनकम चांगले असेल आणि बाजारात मागणी नेहमीच असेल, तर आजच्या लेखात आम्ही तुमच्यासाठी अशाच व्यवसायाची आयडिया घेऊन आलो आहोत.

तुम्हाला या बिजनेस मध्ये फक्त 20 हजार रुपये गुंतवावे लागतील आणि यामध्ये तुम्ही दररोज 2 हजार रुपये कमवू शकता. यामध्ये तुमचे एकदा तयार झालेले ग्राहक पुन्हा परत येतील. जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर काही वेळात तुम्ही हा व्यवसाय मोठ्या लेवल वर सुरू करू शकता.

जर तुम्ही सर्विस फिल्ड मध्ये व्यवसाय सुरू केला. तर तुमची फॅसिलिटी आणि तुमची वागणूक तुम्हाला एक ब्रँड बनवू शकते. आम्ही घरगुती व्यवसायात कार वॉशिंग सेवेबद्दल बोलत आहोत. हा व्यवसाय खूप काळापासून सुरू असला, तरी अनेक शहरांमध्ये तो चांगला चालत नाही. तुम्ही हा व्यवसाय सुरु करा. या व्यवसायात तुम्ही ग्राहकांच्या गाड्या त्यांच्या घरी स्वच्छ करून द्यावे लागतील. या कामासाठी तुम्ही असिस्टंट नियुक्त करू शकता. तुमचा असिस्टंट तुमच्या ब्रँडेड युनिफॉर्ममध्ये त्यांच्या घरी जाऊन काम करेल.

कार वॉशिंगसाठी लागणारी सर्व उपकरणे 20 हजार रुपयांच्या आसपास येतात. ही सर्व साधने तुम्ही बाइकवर एका बॉक्समध्ये कुठेही नेऊ शकता. लोकांना सुट्टीच्या दिवशी कार धुण्यासाठी रांगेत थांबून स्वतःचा दिवस कोणीही खराब करू इच्छित नाही. त्यामुळे तुमचा व्यवसाय ही समस्या चांगल्या प्रकारे सोडवेल.

लोकांना त्यांच्या घरी त्यांची कार धुण्याची सर्विस आवडेल. ब्रँडेड कंपनीच्या युनिफॉर्ममध्ये कर्मचार्‍याने लोकांच्या गाड्या घरी धुतल्या तर समाजात त्यांचा दर्जाही वाढेल. आणि शेजारी देखील कार धुण्याची सेवा घेतील.

या व्यवसायात सारा खेळ सर्विस चा आहे, जर तुम्ही चांगली सर्विस दिली आणि ग्राहकांशी संवाद चांगला असेल तर तुमचा व्यवसाय चालेल. खूपच कमी वेळामध्ये गाडी स्वच्छ होते. एक वर्कर एका दिवसात 10 ग्राहकांच्या गाड्या धुवू शकतो. ग्राहकांची संख्या वाढल्यास, तुम्ही अधिक वर्कर ठेऊ शकता. काही दिवसातच ही सेवा तुमच्या शहरातील एक ब्रँड बनेल.


हे वाचलंत का ? –

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻