High Cholesterol Warning Sign : जेव्हा आपल्या व्यस्त जीवनात आपण व्यायामासाठी वेळ काढू शकत नाही, तसेच आपण जास्त तेलकट पदार्थ खात असल्यास,आपल्या रक्तातील खराब कोलेस्टेरॉल पातळी वाढते. त्यालाच इंग्रजीमध्ये बॅड कोलेस्टेरॉल असे म्हणतात.
कोलेस्टेरॉल वाढल्याने उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, ट्रिपल वेसल डिसीज आणि कोरोनरी आर्टरी यासारख्या डिसीजचा धोका निर्माण होतो.
तसे बघितले तर, शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे पातळी हि केवळ रक्त तपासणीच्या माध्यमातूनच माहिती केले जाऊ शकते, परंतु खूप वेळा आपल्या शरीरात अशा समस्या वाढू लागतात. ज्यामुळे आपल्याला याआधीच धोकादायक परिस्तिथीचे इंडिकेशन मिळतात.
जेव्हा कोलेस्टेरॉल वाढू लागते, तेव्हा आपल्या पायातील वेदना वाढते आणि हि शरीराने दिलेली वॉर्निंग ओळखणे फार महत्वाचे आहे, कारण नंतर त्याचे प्रमाण खूप मोठे होतात. या आर्टिकल मध्ये आपण पायापासून मिलमर्या संकेतांच्या माध्यमातून कोलेस्टेरॉल वाढले कि नाही त्याबद्दल जाणून घेऊया.!
१) जसे की आपण सर्वानाच माहिती आहे कि, हाई कोलेस्ट्रॉलच्या स्थितीत आपल्या शरीरातील नसा ब्लॉक होऊ लागतात. हीच कंडिशन पायांच्या नसांची देखील होते, ज्यामुळे शरीराच्या सर्वात खालच्या भागात ऑक्सिजन पोहोचत नाही आणि ते तीव्र वेदनांचे कारण बनते.
२) जेव्हा शरीरात बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढू लागते, तेव्हा त्या व्यक्तीच्या पायात पेटके (वात) येतो, खूपदा रात्री झोपताना पायात तीव्र वेदना होतात, परंतु थोडावेळ उभे राहिल्यानंतर रक्तप्रवाह सुरळीत होतो. आणि वेदना निघून जातात.
३) वाढत्या कोलेस्टेरॉलच्या सर्वात वाईट लक्षणांपैकी एक म्हणजे पाय आणि नखे यांचा रंग बदलणे, अनेकदा पाय आणि पायाची नखे पिवळे होऊ लागतात. त्याचे कारण कि, पायांना रक्तपुरवठा योग्य प्रकारे होत नसल्याने असे घडते.
४) हिवाळ्यात पाय गार होणे ही नॉर्मल गोष्ट आहे, परंतु उन्हाळ्यात किंवा साधारण तापमानातही पाय अचानक थंड होत असतील, तर हे धोक्याचे लक्षण आहे असे समजून तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
(सूचना- हे आर्टिकल माहिती देण्याकरिता आहे. माहिती लेक या बद्दल कुठलीहि जबाबदारी घेत नाही. आरोग्यासाठी कुठलाही निर्णय घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.!)
हे वाचलंत का ? –