तुम्हाला सतत झोप येण्याची समस्या आहे का? असेल तर हे उपाय वापरा!

Feeling Sleepy Everytime

Feeling Sleepy Everytime : निरोगी राहण्यासाठी जसे पौष्टिक आहाराची गरज असते, त्याचप्रमाणे आपण सर्वांना पुरेशी झोपही खूप महत्त्वाची असते. प्रत्येक व्यक्तीला किमान 7-8 तास झोप घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

पण खूप लोकांना ही समस्या असते, की रात्री पुरेशी झोप घेतल्यानंतरही त्यांना दिवसभर आळस, थकवा आणि झोप आल्यासारखे जाणवते. म्हणजेच 8 तास झोपल्यानंतरही त्यांना सतत झोप येते राहते.

जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल, ज्यांना 10 ते 12 तास झोपल्यानंतरही थकवा किंवा झोप येत असेल, तर तुम्ही या टिप्स वापरू शकता, जेणे करून तुम्हाला जास्त झोप येणार नाही.

सर्वात आधी, आपल्याला रात्री पुरेशी झोप घेतल्यानंतरही दिवसभर झोप आणि आळस का येतो हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. याची अनेक कारणे असू शकतात. जसे कि,

1) काही कामामुळे रात्री उशिरा झोपल्यास.
2) लवकर झोप न लागण्याची समस्या.
3) जास्त मानसिक ताण.
4) जास्त चहा किंवा कॉफी चे सेवन
5) शारीरिक हालचाली न करणे इ.

रात्री झोपतांना अतिविचार सोडून झोपल्यास तुमची या समस्येतून सुटका होऊ शकते. तसेच, सतत झोप येऊ नये म्हणून या पद्धतींचा अवलंब करावा.

1) तुमची झोपेची वेळ निर्धारित करा.
2) रात्री झोपतांना खोलीत अंधार करून झोपा.
3) खोलीचे तापमान स्वतःनुसार सेट करा.
4) रात्री हलका आहार घ्या.
5) रात्री कधीही उपाशी झोपू नका.
6) रात्री झोपण्यापूर्वी छानसे एखादे पुस्तक वाचा.


हे वाचलंत का ? –

Share