आता घर बसल्या करा! शेतजमिनीची मोजणी आणि मिळवा मोबाईल वर शेतीचा नकाशा.!
नमस्कार शेतकरी मित्रांनो….! आपल्या करिता शेतीविषयक महत्वाची बातमी आहे. आपण बघणार आहोत कि, मोबाईल वर आपले शेत कसे मोजायचे व जमिनीचा नकाशा कसा काढायचा.
बऱ्याच काळा पासून आपले शेतीच्या धुऱ्या करिता किंवा रस्त्या करिता भांडण होत आली आहे आणि या भानगडी मुळे बऱ्याच वेळी लोकांनी जीव सुद्धा गमावले आहे.
शेतीच्या भानगडी होतात, त्या शेतातील रस्त्यामुळे किंवा शेत कमी जास्त असल्यामुळे.! आपला शेजारी शेत वाला म्हणतो, “माझे शेत जास्त आहे, तुझ्या शेतात माझे शेत आहे किंवा हा रस्ता तुझ्या शेतातून आहे”.
अश्या वेळी बरेचदा भांडण होतात किंवा आपण शेतीची मोजणी करतो. जे करण्यासाठी आपल्याला पैसे लागतात, आता आपल्याला पीक होत नाही आहे आणि मोजणी चा खरचं म्हटल म्हणजे थोड अवघडच होत, आणि काही वेळ मोजणी करून सुद्धा भांडणे मिटत नाहीत.
या सर्व भानगडी वर आम्ही तुमच्यासाठी एक स्वस्त उपाय घेवून आलो आहे, तो म्हणजे (online land record app) ऑनलाईन मोजणी करणे आपल्या जमिनीचा नकाशा पाहणे असे काम आपण या App च्या मदतीने घरी बसल्या करू शकता. व तुमच्या बाजूच्या शेतकऱ्याला सांगू शकता माझी जमीन व्यवस्थित आहे. आणि या ॲप च्या सहायाने त्यांची पण जमीन मोजू शकता.
चला पाहूया या ॲप द्वारे शेतीचा नकाशा कसा पहावा आणि जमीन कशी मोजावी.
- तुम्हाला खाली एक लिंक दिलेली आहे, सर्वात आधी त्या लिंक वे क्लिक करायचं.
- खाली दिलेल्या बॅटन वर क्लिक केलं की एक ॲप दिसेल, ते ॲप डाउनलोड करून घ्या. (फ्री अँप)
- ॲप डाऊनलोड झालं की ते उघडा.
- आता ॲप मध्ये तुम्हाला एक सातबारा असे नाव दिसेल त्यावर क्लिक करा.
- नंतर तुमच्या समोर दुसरं पेज येईल आता स्थान यावर क्लिक करा.
- नंतर आणखी एक पेज उघडेल तेथे गाव वर क्लिक करा.
- आता तुमचा सातबारा सर्वे क्रमांक टाका.
- यानंतर आपल्या राज्याचे नाव, आपला जिल्हा, गावाचे नाव आणि महत्वाचं तहसील तिथ टाकायचं आहे. हे सर्व भरल्यावर तुम्हाला तुमच्या जमिनीचा नकाशा पाहता येणार आहे.
हे वाचलंत का ? –