डोमेन नेम बद्दल सरळ व सोप्पी माहिती

domain meaning in marathi

domain-kse-ghyayche-mahitilake

domain meaning

डोमेन नेम म्हणजे काय?।Domain meaning in marathi

तुम्ही कधी पण एखादी वेबसाईट सर्च केली असेल, तेव्हा तुम्हाला www.websitename.com दिसले असेल, त्यालाच डोमेन नेम असे म्हणतात. थोडक्यात तुम्हाला domain name ची ओळख झाली असेल.

आपण कसे Domain Name च्या मदतीने एक वेबसाईट इंटरनेट वर शोधू शकतो. हा प्रश्न तुम्हाला पण कधी पडला असेलच. Domain Name ला आपण एक पत्ता पण म्हणू शकतो. तुम्हाला त्या वेबसाईट पर्यंत पोहचण्यासाठी एक पत्ता दिला जातो. त्याला आपण Domain name म्हणू शकतो.

डोमेन नेम काय आहे? याची थोडी माहिती तुम्हाला असेलच. पण आज मी तुम्हाला domain name बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे आणि ते काम कसे करते हे पण सांगणार आहे.

डोमेन नेम काय आहे?

Domain name हे एका वेबसाइटला दिलेले नाव असते. ज्याचा मदतीने आपण कोणत्या पण वेबसाइट ला इंटरनेट वर शोधू किंवा ओळखू शकतो. वेबसाईट ची गोष्ट जर करायची झाली, तर सर्व वेबसाइट ह्या बॅकग्राऊंड मध्ये कोणत्या न कोणत्या IP अड्ड्रेस सोबत जुळलेल्या असतात.

IP address【internet Protocol Address】

हा एक numerical ऍड्रेस आहे. जो तुमच्या मोबाईल मधील browser ला सांगतो की इंटरनेट वर ही वेबसाइट कुठं आहे.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, जसे मनुष्याला नाव असते. तसेच प्रत्येक वेबसाईट ला पण एक नाव असते. जस तुमच्या मोबाइल मधील Browser ला ती वेबसाईट शोधण्या करीता IP address असतो.

तसेच मनुष्याला ती वेबसाईट शोधन्याकरीता domain name असते.
Domain name च्या मदतीने आपण एक किंवा त्यापेक्षा अधिक IP ऍड्रेस ना पण शोधू शकतो. उदा. Domain name google.com किती तरी IP ऍड्रेस ना refer करतो. डोमेन नेम चा उपयोग page URL मध्ये पण केला जातो. Particular webpage शोधण्याकरिता.

डोमेन नेम कसे काम करतो?

सर्व वेबसाईट ह्या एक सर्व्हर वर होस्ट असतात. म्हणजेच store केल्या असतात. आणि domain name ला त्या सर्व्हर च्या IP वर पॉईंट केले असते.

कधीही तुम्ही कोणत्या पण वेबसाईट चे नाव आपल्या browser मध्ये टाकता. तेव्हा ते त्या domain name च्या मदतीने तुमच्या सर्व्हर च्या IP ला पॉईंट करते. त्यामुळे तुम्ही शोधलेली वेबसाईट पाहू शकता.

डोमेन नेम चे प्रकार (Types of Domain)

CcTLD country code top level domain.

या प्रकारच्या domain चा वापर हा सामान्य पणे कोणत्या एखाद्या देशाचा विचार करून केला जातो. हे कोणत्या पण देशाच्या two letter ISD CODE च्या आधारावर नाव ठेवली आहेत.
● .us 【United state】
● .in 【India】
● .ch 【china】
● .ru 【Russia】
● .br 【Brazil】

【TLD】Top level domain.

TLD ला internet domain extension च्या नावाने पण ओळखले जाते. जो शेवटचा भाग राहतो जिथे domain name संपत. डॉट च्या नंतरचा भाग याला सर्वात आधी तयार केले होते. या domain च्या मदतीने तुम्ही तुमच्या वेबसाईट ला लवकर गुगल वर रँक करू शकता. हे domain seo friendly पण आहे.

Example.
● .com 【Commercial 】
● .org 【organization】
● .net 【Network】
● .gov 【government】
● .edu 【education】
● .name 【name】
● .biz 【business】
● .info 【information】

सब-डोमेन नेम काय आहे?

तुम्हाला आता हे तर समजले असेल की, domain name काय असतो. आता पाहू subdomain काय आहे.
Subdomain हे तुमच्या main domain चाच भाग असतो. subdomain हे विकत घेता येत नाही. जर तुम्ही top-level domain विकत घेतल असाल, तर तुम्ही त्याला दोन भागामध्ये divide करू शकता.

जसे mahitilake.com आहे. हे TLD NAME आहे.

आणि marathi.mahitilake.com आणि english.mahitilake.com मध्ये divide करू शकतो, हे अगदी फ्री आहे. तुम्हाला त्याचा कोणत्याच प्रकारचा चार्ज द्यावा लागणार नाही.

– धीरज तायडे


🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

हे वाचलंत का? –

Share