डेंगू सविस्तर माहिती (Dengue Symptoms in Marathi)

dengue in marathi

dengue symptoms in marathi

dengue symptoms in marathi


डेंग्यूचा ताप म्हणजे का? (डेंगू विषयी माहिती)

डेंग्यू हा संसर्गजन्य गंभीर आजार आहे, जो एडीस एजिप्टी (Aedes egypti) या प्रजातीच्या डासांद्वारे पसरतो. जेव्हा एखादा डास डेंग्यू तापाने ग्रस्त रूग्णाला चावतो आणि नंतर तोच डास एखाद्या निरोगी व्यक्तीला चावतो, तेव्हा हा विषाणू निरोगी व्यक्तीच्या रक्तात पोहोचतो.

यामुळे निरोगी व्यक्तीलाही डेंग्यूचा ताप येतो. डासाच्या एकदा चावल्यामुळे देखील डेंग्यू होण्याची शक्यता असते. डेंग्यूमुळे दर वर्षी बर्‍याच लोकांचा मृत्यू होतो.

हा रोग प्रामुख्याने जगातील उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय भागात आढळतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते, दरवर्षी अंदाजे 500,000 लोकांना डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल (ऍडमिट) करण्यात येतात.

जगातील उष्णकटिबंधीय प्रदेशात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळतात आणि त्यापैकी बहुतेक लोक भारतीय उपखंड, दक्षिणपूर्व आशिया, मेक्सिको, आफ्रिका, मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागांत तापाने ग्रस्त आढळतात.

डेंग्यू आजार हा चार विषाणूंमुळे होतो, जो खालीलप्रमाणे आहे – (dengue symptoms in marathi)
डीईएनव्ही -1, डीईएनव्ही -2, डीईएनव्ही -3 आणि डीईएनव्ही -4.

वर सांगितल्याप्रमाणे जेव्हा डास आधीपासूनच संक्रमित व्यक्तीला चावतो तेव्हा विषाणू डासांच्या शरीरात प्रवेश करतो. आणि जेव्हा डास एखाद्या निरोगी व्यक्तीला चावतो तेव्हा हा विषाणू त्या व्यक्तीच्या रक्तप्रवाहात पसरतो.

डेंग्यू विषाणूची लागण झाल्यानंतर केवळ 3 ते 14 दिवसांनंतर एखाद्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसतात. मुख्यतः 4 किंवा 7 दिवसांनंतर लक्षणे दिसू लागतात. डेंगू आजार तुम्हाला झाला असल्यास, खालील दिलेले डेंग्यू तापाची लक्षणे आढळतात.

हे वाचलंत का? –
* क्षयरोग म्हणजे काय?
* यूरिन इन्फेक्शन बद्दल माहिती

डेंग्यू तापाची लक्षणे – Dengue symptoms in marathi

 • डेंग्यूचा विषाणू रक्तामध्ये पसरल्यानंतर एका तासाच्या आत सांध्यामध्ये वेदना सुरू होते आणि त्या व्यक्तीला 104 डिग्री पर्यंत ताप देखील होतो.
 • डोकेदुखी, भूक न लागणे, थंडी वाजून ताप येणे, ह्या सर्व गोष्टींपासून डेंग्यूची सुरुवात होते.
 • ब्लड प्रेशरची जलद गतीने कमी होणे.
 • डोळे मध्ये लालसरपणा आणि डोळे जळजळ होणे.
 • चेहऱ्यावर गुलाबी रंगाचे पुरळ / चट्टे येणे हे डेंग्यूचे लक्षण आहे.
 • खाल्लेले पचत नसल्याकारणाने उलट्या होतात.
 • डेंग्यू तापामध्ये तुमचे हात पाय, सांधे देखील दुखू लागतात.
 • डेंग्यूमध्ये शरीराचे वाढते तापमान कमी होते आणि घाम येणे सुरू होते. यावेळी, शरीराचे तापमान सामान्य होते आणि रुग्णाला बरे वाटू लागते, परंतु ते एका दिवसापेक्षा जास्त काळ सामान्य जाणवत नाही.
 • नंतर डेंग्यूमध्ये, शरीराचे तापमान पूर्वीपेक्षा जास्त वाढू लागते आणि संपूर्ण शरीरावर लाल पुरळ दिसू लागते.
 • डेंग्यूमध्ये पांढऱ्या पेशींची संख्या कमी होते.

डेंगू वर नैसर्गिक उपाय (डेंगू वर उपाय मराठी)

डेंग्यू वर घरगुती उपचार

कडुलिंबाच्या पानांचा रस

कडुलिंबाच्या पानांचा रस पिल्याने प्लेटलेट्स आणि पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. म्हणूनच डेंग्यूच्या उपचारादरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कडुलिंबाचा रस घ्या.

गुळवेल काढा

गुळवेल हे डेंग्यू तापासाठी एक महत्वाची औषधी वनस्पती आहे. हे रोग प्रतिकारशक्ती वाढवते तसेच शरीराचे संक्रमण कमी करते. गुळवेलच्या मुळांना उकळून त्याचा काढा तयार करून प्यावा. यामुळे डेंग्यूची लक्षणे प्रभावीपणे कमी होतात.

तुळशीची पाने

डेंग्यू तापामध्ये तुळशीची पाने खूप फायदेशीर ठरतात. हे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. ५ ते ७ तुळशीची पाने पाण्यात उकळून त्याचा काढा बनवा आणि त्यात एक चिमूटभर काळी मिरची टाकून प्या.

नारळ पाणी

डेंग्यूच्या उपचारात नारळ पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्स यासारख्या घटकांमध्ये असलेले आवश्यक पोषक शरीर मजबूत बनवते.

एलोवेराचा (कोरफड) रस

दररोज २ ते ३ चमचे एलोवेराचा (कोरफड) रस पाण्यात मिसळा. यातून बर्‍याच आजारांना टाळता येऊ शकते. एलोवेराच्या रसामुळे डेंग्यू तापामध्ये आराम मिळतो.


डेंग्यू दरम्यान आहार

डेंग्यूमधील अन्न आणि जीवनशैली अशी असावी यावर आपण थोडं लक्ष टाकूया.

 • डेंगू झाला असल्यास जास्तीत जास्त पाणी प्यावे.
 • डेंग्यू झाला असल्यास खूप ताप येतो, तसेच पोटाचा त्रास देखील होतो. या परिस्थितीत, हलका आणि पचण्याजोगा आहार घ्यावा.
 • लिंबूपाणी बनवून प्यावे. लिंबाचा रस मूत्रमार्फत शरीरातील घाण काढून शरीर निरोगी बनवतो.
 • हर्बल टीमुळे ताप कमी होतो. त्यात आले आणि वेलची घाला.
 • डेंग्यूमध्ये रुग्णाचे तोंड व घसा कोरडे होते. म्हणूनच, त्या व्यक्तीने ताजे सूप, रस आणि नारळ पाण्याचे सेवन करावे.
 • डेंग्यूच्या रुग्णांना भरपूर प्रथिन्यांची आवश्यक असतात. म्हणूनच, रुग्णाला दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देणे आवश्यक आहे.

आम्ही आशा करतो कि, डेंग्यू तापाची लक्षणे बद्दल ची हि माहिती तुम्हाला नक्की आवळली असेल. अश्याच छान-छान माहिती साठी माहितीलेक ला अवश्य भेट द्या.


नागरिकांना सूचना

डोकेदुखी असो वा असो हिवताप,
दुर्लक्ष करू नका, असेल हा डेंग्यूचा प्रताप!
घराघरात स्वछता ठेवूया, डेंग्यूचा नायनाट करूया!

डेंग्यू या रोगाला प्रतिबंध करा..!

डांसा मार्फत पसरणाऱ्या रोगांपैकी डेंग्यू ताप हा विषाणूपासून होणारा रोग ए.डी.ज. इजिप्ती या नावाच्या डांसा मार्फत इतरांमध्ये पसरतो.


डेंगू ची लक्षणे

 • १) तीव्र डोकेदुखी
 • २) थंडी वाजून ताप येणे
 • ३) सांधे, स्नायू व पाठ दुखणे
 • ४) अंगावर लाल चट्टे येणे
 • ५) नाक,दात, लघवी, संडास द्वारे रक्तस्राव होणे

वरीलप्रमाणे लक्षणे आढळल्यास रुग्णांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डेंगू ची लक्षणे आणि उपाय

dengue-fever-symptoms-in-marathi

डेंग्यू रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी खालील प्रमाणे दक्षता घ्यावी.

डेंग्यू ताप पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती ही साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच होते. उदा.- माठ, फुलदाण्या, रांजण, कुलर, पिंप, टाक्या, हौद इत्यादी.

या डासांची अंडी टायर्समध्ये साचलेले पाणी, फुटलेल्या बाटल्या, फ्लॉवर पॉट, पाण्याच्या टाक्या, पाण्याची भांडी, कुलर्स इत्यादी मध्ये वाढतात. म्हणून वरील वस्तूमध्ये पाणी साठू देऊ नये.

आठवड्यात एक दिवस कोरडा पाळा

१) आठवड्यातून एकवेळा पाण्याची भांडी स्वच्छ करावी. त्यामुळे डासांवर नियंत्रण ठेवता येते.

२) साठविलेले पाणी आठवड्यातून एकदा तरी बदलून कोरडे करा आणि स्वच्छ पाणी भरा.

३) घराच्या फुलदानीतील पाणी आठवड्यातून एकदा तरी बदला.

४) साठणाऱ्या पाण्याची जागा नेहमी कोरडी ठेवा.

५) टाकाऊ वस्तू, जुने टायर्स, नारळाच्या करवंट्या, रिकाम्या बाटल्या इत्यादी चा विल्हेवाट लावा.

६) पाण्याच्या सर्व टाक्यांची झाकणे. एकसंघ घडीव लोखंडाची घट्ट बसणारी असावीत, टाकीला छिद्रे नसावी.

७) डासांपासून रक्षण करण्यासाठी मच्छरदाणी, कोईल, मॅट, मलम, इत्यादींचा उपयोग करा.

८) झोपतांना शरीर कापडाने संपूर्ण झाकलेले राहील याची दक्षता घ्यावी, तसेच लहान मुलांची डासांपासून रक्षण होण्याच्या दृष्टीने त्यांना पांघरूणात ठेवावे.

९) प्राचार्य, मुख्याध्यापक, अधिक्षक, व्यवस्थापक, यांनी आपले महाविद्यालय, शाळा, वसतिगृह, मंगलकार्यालय, हॉटेल इतर ठिकाणी पाणी साठवणुकीची संपूर्ण साधने नियमितपणे स्वच्छ धुऊन व पुसून भरावी.

१०) आपल्या इमारतीचे माडीवर टाकाऊ वस्तू मध्ये पाणी साठून राहणार नाही याबाबत ची खबरदारी घ्यावी.

११) डास साधारणतः सकाळी व सायंकाळी ५ ते ७ दरम्यान बाहेर निघतात. अशावेळी शक्यतो. घराचे दरवाजे खिडक्या बंद ठेवाव्यात. हवा येणाऱ्या खिडक्यांना जाळ्या लावाव्यात.

१२) महानगरपालिका तर्फे घराघरातून कचरा गोळा करण्यासाठी घंटी कटले तसेच कंटेनर व कुंड्याची व्यवस्था केली आहे. आपला कचरा त्यात टाकावा.

 • सागर राऊत

( महत्वाची सूचना – हे आर्टिकल तुम्हाला डेंग्यू बद्दल माहिती देणे असल्याकारणाने या संबंधित उपचारासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा आहे. इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल. धन्यवाद… 😊 )

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment