कोथिंबीर खाण्याचे फायदे |Coriander In Marathi

coriander leaf

Coriander In Marathi

Coriander Seeds in Marathi

Coriander In Marathi : कोथिंबीर ही वनस्पतीपासून मिळणारी एक औषधी वनस्पती आहे, ज्याची पाने आणि बिया अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी तसेच स्वयंपाकातील जेवणाची रुची वाढवण्यासाठी वापरले जाते. यालाच धणे असे सुद्धा म्हणतात.

कोथिंबीर स्वयंपाकात अनेक पदार्थांना विशेष सुगंध आणि चव देण्यासाठी वापरले जाते. कोथिंबिरीचे अनेक आरोग्यजनक फायदे आहेत म्हणूनच धणे (कोथिंबीर) याचा उपयोग अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो.

आयुर्वेदा व्यतिरिक्त अनेक प्राचीन औषध पद्धतींमध्ये कोथिंबीर ची ताजी पाने आणि देठांचा वापर विविध प्रकारची औषधे बनवण्यासाठी केला जातो.

अन्नामध्ये कोथिंबीरीचा वापर प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. लोक याचा वापर सलाद, सूप, करी आणि कढ़ी इत्यादींमध्ये करतात. इतकंच नाही, तर आजकाल तंबाखू, साबण आणि इतर कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये सुगंध आणि चव वाढवण्यासाठी धनेचा वापर केला जातो.

या आर्टिकल मध्ये आम्ही कोथिंबीरशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती दिलेली आहे, तसेच त्याच्या वापराचे फायदे इर्त्यादिचा समावेश करण्यात आलेला आहे. चला तर बघूया.!

कोथिंबीर पोषक तत्व

पोषक तत्वप्रमाण (100 ग्रॅम)
पाणी (Water)92.2 ग्रॅम
ऊर्जा (Energy)23 किलोकॅलरी
कर्बोदके (Carbohydrates)3.67 ग्रॅम
चरबी (Fat)0.52 ग्रॅम
साखर (Sugar)0.87 ग्रॅम
लोह (Iron)1.77 मिग्रॅ
कॅल्शियम (calcium)67 मिग्रॅ
मॅग्नेशियम (magnesium)26 मिग्रॅ
पोटॅशियम (Potassium)521 मिग्रॅ
फॉस्फरस (Phosphorus)48 मिग्रॅ
तांबे (Copper)0.225 मिग्रॅ
झिंक (Zinc)0.5 मिग्रॅ
मॅंगनीज (Manganese)0.426 मिग्रॅ
सोडियम (sodium)46 मिग्रॅ
व्हिटॅमिन सी (Vitamin C)27 मिग्रॅ
राइबोफ्लेविन (riboflavin)0.162 मिग्रॅ
फोलेट (folate)62 माइक्रोग्राम
थायमिन (Thiamine)0.067 मिग्रॅ
नियासिन (Niacin)1.11 मिग्रॅ
व्हिटॅमिन बी 6 (Vitamin B6)0.149 मिग्रॅ

कोथिंबीर शरीरासाठी का आवश्यक आहे?

हिरवी धणे ही एक औषधी वनस्पती आहे. हे विविध आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. यात एंटी-माइक्रोबियल व एंटी इंफ्लेमेटरी(सूज कमी करणे), अँटी-डिस्लिपिडेमिक (रक्तातील लिपिड्स कमी करणे), अँटी-हायपरटेन्सिव्ह (रक्तदाब कमी करणे), न्यूरोप्रोटेक्टिव्ह (मज्जातंतू संरक्षण करणे) आणि मूत्रवर्धक सारखे गुणधर्म आहेत.

तसेच, ते मधुमेह, मिर्गी, चिंता आणि नैराश्यावर उपचार करण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ स्वच्छ करण्यात मदत करू शकते. याशिवाय कोथिंबीरचे फायदे यकृताचे आजार आणि कर्करोगाच्या उपचारातही मदत करतात.

कोथिंबीरमध्ये इथेनॉल अर्क (CSE) देखील असतो, जो सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेला संरक्षण देऊ शकतो. अशा स्थितीत या गुणधर्मांकडे पाहता कोथिंबीरचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

कोथिंबीर खाण्याचे फायदे (Coriander Benefits)

1) कोथिंबीर संसर्गाशी लढण्यास मदत करते.

कोथिंबीरमध्ये सूक्ष्मरोधी गुणधर्म असतात, जे पोटाच्या संसर्गाशी लढतात आणि अनेक अन्न-जनित रोगांना प्रतिबंधित करतात. कोथिंबीरमध्ये डोडेसेनल नावाचे विशेष संयुग आढळतात, जे साल्मोनेला सारख्या हानिकारक जीवाणूंशी देखील लढू शकते.

2) कोथिंबीर त्वचा सुरक्षित ठेवते.

कोथिंबीरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट पेशींना नष्ट होण्यापासून वाचवतात. कोथिंबीरचे नियमित सेवन केल्याने, त्वचेवर पुरळ आणि त्वचारोग यांसारखे आजार दूर राहतात. कोथिंबीरीचे पान त्वचेवर लावल्याने पिंपल्स, कोरडेपणा आणि क्रस्टिंग यांसारख्या समस्याही कमी होतात.

3) कोथिंबीर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांसाठी कोथिंबीरचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. काही अभ्यासांनुसार, असे आढळून लाल कि, धणे हे शरीरातील एन्झाइमची क्रिया वाढवते, ज्यामुळे रक्तातील साखर काढून टाकण्यास सुरुवात करते आणि शरीरातील साखर कमी होऊ लागते.

4) कोथिंबीर रोग प्रतिकारशक्ती वाढवते.

ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे. त्यांनी कोथिंबीर खावे. कारण कोथिंबिरीच्या बिया, देठ आणि पानांमध्ये टेरपीनेन, क्वेर्सेटिन आणि टोकोफेरॉल सारखे अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

या अँटीऑक्सिडंट्समध्ये सूज आणि लालसरपणाविरोधी गुणधर्म देखील असतात, जे रोगप्रतिकारक शक्तीला वाढवण्यास मदत करतात.

5) हृदय निरोगी ठेवण्यासाठी धणे प्रभावी आहे.

कोथिंबीरीचा रस तुमच्या शरीरात लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून काम करू शकतो, ज्यामुळे शरीरातून अतिरिक्त सोडियम आणि पाणी बाहेर पडते.

यासोबतच कोथिंबीरचे नियमित सेवन केल्यास उच्च रक्तदाब आणि LDL (खराब कोलेस्टेरॉल) पातळी कमी राहते, ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

कोथिंबीरचे दुष्परिणाम

योग्य प्रमाणात आणि सर्व नियमांचे पालन केल्यास धणे जवळजवळ प्रत्येकासाठी सुरक्षितच मानले जाते. परंतु, जास्त प्रमाणात सेवन केल्यास उलट्या, मळमळ आणि छातीत जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच, काही लोकांना कोथिंबिरीची ऍलर्जी असू शकते आणि त्याचे सेवन केल्याने दमा आणि श्वसनमार्गामध्ये जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.


  • सागर राऊत

हे वाचलंत का ? –

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻