Chia Seeds Farming in Marathi
Chia seeds in Marathi : चिया हे नाव आपल्या करिता पूर्ण नवीन आहे. खूप लोकांना या बद्दल माहिती नाही. चिया हे मेक्सिको मधील सुपर फूड मानले जाते. आपल्या कडे याची शेती बरेच दिवसा पासून करण्यात येत आहे, परंतु चिया बद्दल लोकांना माहिती नसल्यामुळे याला तेवढं वाव व भाव मिळत नव्हता.
आता याची प्रसिध्दी वाढली आहे. लोकांना चिया सीड्स मधील प्रोटीन्स बद्दल माहिती होत आहे. याचे आरोग्यासाठी फायदे आहेत. हे जसे जसे लोकांना समजत आहे. तस तसे मार्केट मध्ये याचा भाव वाढत आहे.
याची शेती शेतकऱ्याला खूप फायद्याची ठरत आहे, Chia Seeds पांढरा आणि काळ्या रंगाचे छोटे बी असतात. हे बी आपल्या शरीराची प्रोटीन्स ची खूप मोठी आवश्यकता पूर्ण करतात. या मध्ये कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात मिळते. या मुळे याला सुपर फूड म्हंटले जाते.
chia seeds ह्या हृदय विकार आणि कॅन्सर सारख्या बिमाऱ्यान वर उपचार म्हणून वापरले जाते.
चीया सीड्स शेती
- चीया सिड्स ची शेती साठी 8 ते 10 डिग्री तापमानाची आवश्यकता राहते. चीया सिड्स ची शेती कोणत्याही महिन्यात केल्या जावू शकते. या करिता शेती ची चांगल्या प्रकारे नांगरणी करून शेतीला समतोल करून घ्या.
- हे पीक आपल्यासाठी नवीन असल्यामुळे, माती परीक्षण करून आपल्या माती मध्ये कोणती उर्वरक कमी आहेत. त्याची पूर्तता करावी व कृषी वैज्ञानिक जवळून शेती सल्ला घ्यावा.
- पेरणी करत असताना, दोन झाडा मधील अंतर 25 ते 30 सेंटिमीटर आणि दोन पट्यान मधील अंतर 40 सेंटिमीटर असायला हवे.
- चीया ची शेती आपल्या कडे जून, जुलै मध्ये केली जाते आणि उन्हाळा मध्ये ऑक्टोंबर ते मे पर्यंत केली जाते. या करिता लागणारे बी हे एक एकराला दोन किलो बी लागते.
- पेरणी नंतर हे पीक 120 दिवसा मध्ये कापणीला येवून जाते. आणि प्रति एक्कर 5 ते 6 क्विंटल याचे उत्पादन होते.
- शेतकरी मित्रांनो, या प्रकारे तुम्ही चीया ची शेती करून वर्षाला लाखो रुपये कमवू शकता. कारण याचे आरोग्यासाठी जेवढे फायदे आहेत, त्यामुळे याची बाजारात मागणी दिवसेदिवस वाढतच चालली आहे.
हे वाचलंत का ? –