व्यवसाय व्यवस्थापन /व्यवसाय माहिती
बहुतेक युवा उद्योजकांना नेहमीच पडलेला हा प्रश्न आहे. सर्वच म्हणतात, की व्यवसाय असला पाहिजे. नोकरी वैगरे च काही खरं नाही, बहुतेक युवकांचे स्वप्न असते, की त्याने व्यवसाय करावा. परंतु त्या स्वप्नांना उंच अशी भरारी देणारी संधी काहींच्याच नशिबात असते.
business ideas in marathi
Aspirant series मध्ये सांगण्यात आलेल्या फॉर्म्युल्यानुसार विचार कराल, तर नक्कीच ज्याच्याकडे “प्लॅन-बी” असतो. तो नेहमीच दोन गोष्टी करण्याच्या प्रयत्नात असतो, आणि त्यामुळे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित ठेवणे त्यांच्यासाठी अशक्यच असते.
तसेच व्यवसायाचे असते. तुम्ही सुरक्षित व्यवसाय करू शकता परंतु व्यवसाय सुरू करताना तुम्ही व्यवसायातील सुरक्षितेतचा, भविष्याचा अति विचार न करता फक्त व्यवसाय वाढीच्या विचारावर लक्ष केंद्रत केले पाहिजे.
“अति तिथे माती” या म्हणी नुसार जर आपण फक्त विचारच करत बसलो, तर व्यवसायात प्रगती होत नाही. विचारा सोबत कृती ही करणं गरजेचे असते.
हे वाचलंत का? – * कमी भांडवल मध्ये सुरु करण्यासारखे व्यवसाय * ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग |
व्यवसाय कसा सुरू करावा..?
- व्यवसाय करताना कुठल्याही प्रकारची भीती संकोच मनात ठेवून व्यवसायात उतरले नाही पाहिजे, यामुळे व्यवसायात नुकसान होण्याची संभावना जास्त असते.
- व्यवसायात उतरतांना पूर्व तयारीनिशी उतरले पाहिजे, तसेच व्यवसाय वाढविण्यासाठी विविध कल्पना शक्तींचा तसेच बुध्दिक शक्तीचा वापर केला गेला पाहिजे. पूर्वतयारी करताना काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजे जेणेकरून अडचण निर्माण होत नाही.
पूर्वतयारी साठी चे महत्वाचे मुद्दे
१) व्यवसायाचे स्वरूप-
- व्यवसाय आपण करणार आहोत, त्यामुळे आपल्या आवडीनुसार व्यवसाय निवडला पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या व्यवसायात काम करायला आळस येणार नाही, आणि आपण ते काम करताना आवड असल्यामुळे अधिक व्यवस्थित रित्या करू शकतो.
- आपल्या आवडीनुसार व्यवसाय निवडला की, त्यामध्ये व्यवसाय साठी संधीही सापडतात. ते अनेक प्रकारांनी येता. त्यामुळे संधी किती प्रकारचे आहेत, कशा आहेत, याचा आढावा आणि बाजारपेठेत त्या संधीचा उपयोग कसा करून घेता येईल, या संदर्भातील अभ्यास करून मग व्यवसायात उतरले पाहिजे.
- व्यवसाय करताना माझ्या मित्राने हा केला, त्याला खूप पैसे या व्यवसायात मिळाले. म्हणून मी तो करतो. असं म्हणून व्यवसाय सुरू करू नका..! आपली आवड आहे का? त्या व्यवसायात, हे जाणून घ्या.
- पण आवड ही कालांतराने बदलूही शकते. त्यामुळे काळानुसार आपल्या व्यवसायात काही बदल करणे गरजेचे असतात त्यामुळे ते बदल केले गेले पाहिजेत, ते बदल व्यवस्थित आहेत ना याकडेही लक्ष असले पाहिजे. त्याच बरोबर नेहमी सकारत्मक दृष्टीनी व्यवसायात उतरले पाहिजे.
२) संधी –
- उद्योग करताना त्यात नवीन नवीन संधी कशा भेटतील याची माहिती घेतली पाहिजे, त्याचबरोबर आपल्या उद्योगातून ग्राहकांसाठी काही संधी निर्माण करता येतील का? याचा आढावाही आपण बाजारपेठेतून काढला पाहिजे.
- आपण आपला आवडता व्यवसाय करत असल्यास त्यात आपण नवनवीन संधी निर्माण करू शकतो, संधीचा वापर योग्यरित्या आपल्या व्यवसायासाठी करून घेता आला पाहिजे.
low cost business ideas with high profit
व्यवसाय-व्यवस्थापन
- आपल्याला मीडियावरून अनेक प्लॅटफॉर्म आज मिळतात. त्या संधीचा आपण आपल्या व्यवसाय साठी कसा वापर करतो. यावर आपल्या व्यवसायाची वाढ अवलंबून असते घरबसल्या ॲमेझॉन, फ्लिपकार्ड, मेशो, इंडिया मार्ट इ.अशा अनेक ॲप वरून आपण आपला माल ग्राहकांपर्यंत पोचवू शकतो.
३) व्यवसाय साठी जागा –
- व्यवसाय करताना, सर्वप्रथम आपल्याला कोणता व्यवसाय करायचा आहे. हे ठरल्यानंतर तो व्यवसाय कुठे करायचा, त्यासाठी ची जागा कशी पाहिजे, हे ही तितकाच महत्त्वाचा आहे.
- जागा घ्यायची म्हणून घेऊन कोणताही व्यवसाय केला, तर तो चालत नाही. व्यवसाय कोणता करता, कोणत्या भागात, कुठल्या ठिकाणी करता, ही भवतालची परिस्तिथी समजून घेऊन व्यवसाय करणं खूप महत्त्वाचं असतं.
- काही व्यवसायांसाठी मोकळी जागा असणे आवश्यक असते. तर काहींसाठी मोठे दुकान गोडाऊन अथवा साठवणूक करून ठेवण्यासाठी मोठी जागा असणे गरजेचे असते.
- काही व्यवसाय घरगुती ही केले जातात. त्यामुळे ते व्यवसाय करताना त्याची जागा ठरवताना ती व्यवस्थित रित्या मोकळी असली पाहिजे, जेणेकरून दुकानातल्या गोष्टींचा, सामानाचा पसारा घरात जाता कामा नये. त्यासाठी घराची रचना त्याप्रमाणे करून घेतली पाहिजे.
४) आर्थिक नियोजन –
- उद्योग सुरू करताना लागणारे भांडवल ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण व्यवसायासाठी भांडवल आधीच साठवून ठेवले असेल, तर त्याचा आपल्याला उपयोग होतोच.
- परंतु, साठवून ठेवलं नसेल, तर सध्या आपल्याकडे विविध माध्यमे आहेत. ज्यातून आपण भांडवल घेण्यासाठी पैसे त्या माध्यमातून पैसे घेऊ शकतो.
- जसे की बँके कडून कर्ज घेऊ शकतो, सोने घाण ठेवुन पैसे घेऊन शकतो, उधारीवर काही पैसे घेऊ शकतो, अश्या अनेक पद्धतीनी आपण पैसे घेऊ शकतो.
- तसेच नवीन व्यवसाय साठी गव्हर्मेंट तसेच प्रायव्हेट सेक्टर नेहमीच विविध स्कीम काढतात, त्याचा उपभोग आपण घेऊ शकतो. या सर्व गोष्टींचा वापर आपण तेव्हाच करू शकतो. जेव्हा आपण आर्थिक शिस्त स्वतःला लावून घेऊ. कारण, शिस्त न लावल्यास कर्जबाजारी होण्याची वेळ येते. त्यामुळे शिस्तीने व्यवसाय केला तर तो स्थिरस्थावर होतो.
५) ग्राहकहित –
- स्वतःचा व्यवसायाबरोबरच आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांच्या पसंतीकडे लक्ष दिले गेले पाहिजे,“अतिथी देवो भव” या म्हणीनुसार व्यापारासाठी त्याचे ग्राहक हे त्यांचे अतिथी असतात. त्यामुळे व्यापाऱ्यांनी ग्राहकांच्या पसंतीला सर्वात आधी प्रधान्य दिले पाहिजे.
व्यवसाय मार्गदर्शन आणि प्रशिक्षण
१) व्यवसायाच्या आकारानुसार वर्गीकरण –
- घरगुती व्यवसाय
- लघु उद्योग
- मध्यम प्रमाणावर उत्पादन करणारे व्यवसाय
- मोठ्या प्रमाणावरील व्यवसाय.
२) उत्पादन स्वरूपानुसार वर्गीकरण –
- मूलभूत व्यवसाय, पूरक व्यवसाय, सेवा व्यवसाय, शेती व्यवसाय, इत्यादी प्रकारचे अनेक व्यवसाय असतात. त्यामुळे त्या त्या व्यवसायाची परिपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन हे त्या क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या व्यक्ती कडून घेणे खूप गरजेचे असते.
- त्याच बरोबर त्या व्यवसायतील प्रशिक्षण घेणे ही तितकेच महत्वाचे आहे. व्यवसाय सुरू करताना या सर्वांचा अभ्यास करून घेऊन त्यात उतरले पाहिजे, जेणेकरून व्यवसायात काळजीचे कोणतेही कारण राहत नाही.
– मधुरा जोशी
🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.