सरकार भरपूर प्रमाणात पैसे का छापत नाही?

हा प्रश्न तर सर्वांच्या मनामध्ये आलेला असेलच, मला पण यायचा. की सरकार कडे पैसे छापायची मशीन असल्यावर भरपूर प्रमाणात का पैसे छापत नाही.

सर्व गरीब जनतेला पैसे वाटून त्यांना श्रीमंत का करीत नाही?
कोणी पैशासाठी लाचार नाही दिसणार, कोणी उपाशी नाही झोपणार, कोणी पैशासाठी मारामारी, चोऱ्या वैगरे नाही करणार. सर्व काही सुरळीत होईल… हो ना…. तर….त्याच उत्तर आहे नाही…

का बरं नाही…?

तर या आधी अशी चूक दोन देशांनी केलेली आहे. एक आहे जर्मनी तर दुसरा देश आहे झिम्बाब्वे.

जर्मनी वर युद्ध झाल्यावर त्याच्यावर भरपूर प्रमाणात कर्ज होते. ते कर्ज काढून टाकण्यासाठी त्या देशातील सरकारने भरपूर प्रमाणात पैसे छापलेत आणि तशेच झिम्बाब्वे ने देशाची गरिबी दूर करण्यासाठी भरपूर पैसे छापून गरिबांना वाटून दिलेत. तर त्याचा परिणाम असा झाला की, एखाद ब्रेड च पाकीट जरी त्यांना विकत घ्यायचं असल्यास, बॅग भरून पैसे द्यावे लागत होते.

rupees-mahitilake

ते कसे तर त्यासाठी एक उदाहरण सांगतो. खूप काळ आधी आपल्या देशात एखादी वस्तू खरेदी करायचं असल्यास मी दुसऱ्या वेक्तीला माझ्याकडे जी वस्तू आहे, ती त्या वेक्तीला देणार आणि त्याकडची मी घेणार…म्हणजेच वस्तूची फेरबदल करायची पद्धत होती.
उदा.- (माझ्या जवळचे गहू देणार आणि त्याच्या कळून भाजी घेणार)

त्या नंतर सरकारने त्या वस्तूची एक विशिष्ट अशी किंमत ठेवली. ही किंमत यानुसार असायची की, जितका माल (वस्तू) बाजारात उपलब्ध आहे, त्यावर त्याची किंमत. ही पद्धत म्हणजे आत्ता चालू असलेली.

तर झिम्बाब्वे आणि जर्मनी ने भरपूर प्रमाणात पैसे तर छापले आणि ते सर्वांना वाटून दिलेत. मग बाजारात त्या वस्तूचे प्रमाण असायचे कमी आणि पैसे तर सर्वांच्या कडे असायचे त्यामुळे त्या वस्तूची किंमत वाढून जायची. म्हणजे आधी सांगितल्यानुसार एक ब्रेड पाकीट घेण्यासाठी त्यांना बॅग भरून पैसे द्यावे लागत होते…त्या देशात खूप महागाई वाढली होती.

त्या परिस्तिथी ला त्या देशातील सरकार कारणीभूत होत. नंतर त्या देशातील सरकारने परिस्तिथी ला कंट्रोल मध्ये यावी म्हणून त्या नोटा जाळून टाकायला सांगीतल्या. काही काळानंतर त्या देशातील महागाई आटोक्यात आली.
सोप्प्या भाषेत सांगायचं झाल्यास…….

farmers-market-1329008_1280-1

जितका माल देशात उपलब्ध आहे, त्यानुसारच पैसे छापले जातात. तस नसत तर कोणी पण श्रीमंत झाल असत. आणि कोणी काम तरी केलं असत का..?शेतकऱ्याने शेती करणे बंद केले असते. उद्योजकानी उद्योग मग कुठलीच वस्तू तयार झाली नसती…फक्त मागणी(डिमांड) वाढली असती आणि वस्तू नसेल आणि डिमांड जास्त असेल तर महागाई आपोआप वाढलेच.

म्हणूनच तर सरकार भरपूर पैसे छापत नाहीत. त्यावर RBI आणि GDP चे नियंत्रण आहे. म्हणजे एका वर्षात किती वस्तू तयार झाल्यात त्यावर अवलंबून असते की, किती पैसे छापायचे.
जितका माल तितके पैसे…..

अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.

धन्यवाद…

  • सागर राऊत

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.


Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment