वस्तूवर किंमत ₹९९ अशी का ठेवली जाते?

वस्तूंची किंमत एक रुपया कमी का?

  • किंमत ९९/-, ४९९/-, ९९९/- अशीच का बरं ठेवली जाते…?
  • एक रुपया आपला वाचवून त्यांना नेमकं काय मिळत असेल बर….?

या मागे एक तथ्य आहे. कुठलीही गोष्ट अशीच नसते. त्यामागे काही कारणे असतातच. या मागे पण दोन महत्वाची कारणे आहे !


१) Psychological Marketing Strategy (सायकॉलॉजीकल मार्केटिंग रणनीती) –

जेव्हा आपण एखादी वस्तू विकत घ्यायला जातो. तेव्हा एक आपल्या डोक्यात बजेट असत.
की आपण ४००/- रुपया पर्यंत शर्ट घायच. नेमके तेथे गेल्यावर आपल्याला शर्ट वर टॅग दिसतो, ४९९/-रुपये.

आत्ता मुद्दा असा आहे की, आपण किंमत डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे वाचतो. सुरुवातीची किंमत ४ हे तर आपण लक्षात ठेवतो पण मागची नाही.

ही माणसाची प्रवृत्ती (tendency) आहे. आणि आपण ती वस्तू घेऊन पण घेतो. आणि सगळी कडे सांगत फिरतो ४००/- रुपयाला मिळाली.


२) marketing Strategy (मार्केटिंग रणनीती) –

ही तर खास strategy आहे, यामध्ये तर कंपनीला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो.

उदा.- आपण ते ४९९/- रुपयाचं शर्ट विकत घेतलं. आपण ?५००/- रुपये काउंटर वर दिले तर आपण त्याच्या कडून१/-रुपया वापस नाही घेत. कारण आपल्या आजूबाजूला लोक असतातना. मग त्याच्या समोर आपली इज्जत कमी होईल. म्हणून तो १/-रुपया आपण नाही घेत. तोच का असे बरेचसे लोक नाही घेत. त्यात मी पण आहे.

एखाद्या गरजू व्यक्तीला आपण १/- रुपया नाही देणार. पण असे पैसे वाया घालवणार ही आजकाल सर्वांची विचार सारणी झालेली आहे.

याच गोष्टीचा ते शॉपवाले( कंपनी) आपला फायदा घेतात. नाही त्या १रुपयांची एन्ट्री कुठे असते . नाही तो आपण त्याला कशाला दिला हे माहीत असते. म्हणजे तो १रुपया ब्लॅक मनी झाला. असा किती तरी ब्लॅक मनी शॉप किपीर कडे जमा होतो.

उदा.- १०० रिटेलर आहेत.
१०० ग्राहक / रिटेलर

म्हणजे १०० रिटेलर * १०० ग्राहक * १ महिना(३० दिवस)
= ३०००००/-रुपये.

म्हणजे आपला एक एक रुपया जमा करून हे लाखो बनवतात. आणि आपलाच एक रुपया आपल्याला मागायला लाज वाटते.

ब्लॅक मनी वाढवण्यात आपलाच हात आहे. यावर एक उपाय आहे. क्रेडिट कार्ड किव्हा डेबिट कार्ड चा वापर करा, म्हणजे जितकी किंमत असेल तितकेच पैसे द्यावे लागतील व लोकांच्या समोर तुमची अजून इज्जत वाढेल. हा कार्ड वापरतो म्हणून.(तुमच्या नजरेत)

अजून एक उपाय आहे. इ- कॉमर्स (E-commerce) म्हणजे ऑनलाइन शॉपिंग करा. त्यात जितकी किंमत आहे तितकेच पैसे आपल्याला द्यावं लागतात.

तेथे ब्लॅक मनीचा प्रश्नच उद्भवत नाही. पण त्यात psychological marketing strategy भरपूर प्रमाणात चालतो( ९९/-, ४९९/-, ९९९/-, ४९९९/-इत्यादी)
आत्ता थोडा विचार करा. एक एक रुपयाला किती किंमत आहे ते. ह्या दोन कारणामुळे वस्तूची किंमत अशी ठेवली जाते.

अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.

धन्यवाद….

  • सागर राऊत

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.


Leave a Comment