वर्धमान महावीर यांची माहिती
महावीर जयंती
वर्धमान महावीर यांची माहिती
महावीर जयंती दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी जैन धर्माचे लोक 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती साजरी करतात.
यावर्षी हा उत्सव 4 एप्रिल २०२३ रोजी म्हणजेच उदयाला साजरा होणार आहे. भगवान महावीरांचा जन्म इ.स.पूर्व ५९९ च्या सुमारास बिहारमधील कुंडलपूरच्या राजघराण्यात झाला असे म्हटले जाते.
भगवान महावीर हे जैन धर्माचे २४ वे आणि शेवटचे तीर्थंकर होते. या दिवशी जैन धर्माचे लोक भगवान महावीरांच्या 5 मौल्यवान तत्त्वांचे पालन करण्याचे व्रत घेतात.
आजच्या आर्टिकल मध्ये आपण जाणून घेऊया, महावीरजींची कोणती 5 तत्त्वे आहेत, ज्यामध्ये दडलेले आहे यशाचे रहस्य. भगवान महावीरांनी संपूर्ण समाजाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला.
जैन धर्मीय समाज हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करतात.
महावीरजींची पाच तत्त्वे
भगवान महावीर हे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर आहेत. मानवाच्या कल्याणासाठी आणि जीवनात यश मिळवण्यासाठी त्यांनी हि पाच तत्त्वे सांगितली आहेत. या तत्वांना पंचशील तत्त्वे असे म्हणतात. भगवान महावीर यांचा असा विश्वास होता की, ज्या मनुष्याने या 5 तत्वांचा अवलंब केले. तर त्याला प्रत्येक पायरीवर यश मिळते आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो.
महावीरजींची पाच तत्त्वे पुढीलप्रमाणे
1) सत्य
भगवान महावीरांचे हे तत्व आपल्याला योग्य मार्गावर जाण्यास शिकवते. ज्या मार्गात सत्याचा पाया घातला जातो. त्या मार्गात काही अडथळे नक्कीच येतात, पण सत्याचा हात धरलात, तर खडकाळ मार्गही पार होतो.
शेवटी विजय सत्याचाच होणार हे नक्की आहे. सत्य हे एकमेव खरे तत्व आहे.
2) अहिंसा
अहिंसा हे जैन धर्मातील मूलभूत तत्व आहे. भगवान महावीर यांच्या मते ‘अहिंसा हाच परम धर्म आहे’. हे तत्व मानवाला असे शिकवतात कि, या जगातील सर्व मानव आणि प्राण्यांवर हिंसा करू नये.
त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देऊ नये, कोणाबद्दल वाईट विचार करू नये. अहिंसा या तत्वाचा अवलंब करणारे सर्वत्र यशस्वी होतात.
3) अपरिग्रह
अपरिग्रह म्हणजे कोणत्याही वस्तू किंवा प्राण्याशी अत्याधिक आसक्ती बाळगणे. भगवान महावीर हा सिद्धांत सांगतो, की सजीव किंवा निर्जीव वस्तूंची आसक्ती हे माणसाच्या दु:खाचे सर्वात मोठे कारण आहे.
भगवान महावीर म्हणतात, की वस्तूंची उपलब्धता असणे किंवा नसणे या दोन्ही स्थितींमध्ये समान वृत्ती असली पाहिजे. वस्तू आणि माणसांशी जास्त आसक्ती माणसाला ध्येयापासून विचलित करते.
4) अस्तेय (चोरी न करणे)
याचा अर्थ असा आहे कि, इतरांच्या वस्तू त्यांच्या परवानगी शिवाय घेणे किंवा चोरणे असा आहे. येथे चोरीचा अर्थ केवळ भौतिक वस्तूंची चोरी नाही, तर इतरांबद्दल वाईट विचार असणे देखील आहे.
‘मी’ हा भाव कधीही ठेवू नका. ‘मी’ हा भाव ठेवणारे व्यक्ती हे स्वतःसाठी विचार करणारे असतात. अशा व्यक्तींना स्वतःचे काम काढून घ्यायचे असते.
आणि ‘आपण’ ही भावना असलेली व्यक्ती उंचीवर पोहोचतात आणि देवही अशा लोकांना मदत करतो.
5) ब्रह्मचर्य
भगवान महावीर यांच्या मते ब्रह्मचर्य या तत्त्वाचा अर्थ मानवाने अविवाहित राहू नये असा आहे. म्हणजे माणसाने स्वतःमध्ये दडलेले ब्रह्म ओळखले पाहिजे.
ब्रह्म ओळखण्यासाठी स्वत:साठी वेळ देणे आवश्यक आहे. भगवान महावीर यांच्या मते ब्रह्मचर्य हे उत्तम तप, नियम, ज्ञान, तत्त्वज्ञान, चारित्र्य, आत्मसंयम आणि नम्रता यांचे मूळ आहे.
हे वाचलंत का ? –