(9 Tips) – चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय

beauty tips in marathi

beauty tips in marathi

चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी घरगुती उपाय

आपली त्वचा चमकदार व्हावी. अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते आणि खरे सांगायचे, तर ते अवघड कामही नाही. फक्त त्यासाठी आपण काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ग्लोइंग स्किन मिळविण्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही, फक्त स्वतःची काळजी घ्या! तसेच काही सौंदर्य टिप्स दैनंदिन जीवनात वापराव्या लागतात.

त्वचा चमकदार आणि सुंदर बनवण्यासाठी आज बाजारात अनेक प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. परंतु त्यामुळं प्रत्येकाच्या त्वचेला फायदा होईलच असे नाही. कारण आपल्याला माहित आहे कि, प्रत्येकाची त्वचा हि वेगवेगळी असते.

चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी आपण घरगुती उपाय करून पाहू शकतो. चमकणाऱ्या चेहऱ्यासाठी काय करावे? चला तर मग ते जाणून घेऊया.!

हे वाचलंत का? –
* साबण किंवा फेस वॉश चेहऱ्यासाठी नुकसानकारक?
* शरीर संबंधित कोरफडीचे फायदे

चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय

चेहरा उजळो आणि सौंदर्य खुलो, ही आजच्या प्रत्येक मुलीची इच्छा असते, मग तिचे वय कितीही असो. घरात आणि स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याच्या मदतीने आपण आपला चेहरा उजळू शकतो. काही चांगल्या सवयी आपल्याला ग्लोइंग स्किन मिळण्यास मदत करते.

1) चांगली झोप घ्या.

दिवसभर काम करणे, रात्री उशिरापर्यंत झोपणे आणि 8 तास पुरेशी झोप न घेणे हे तुमच्या त्वचेसाठी चांगले नाही. त्याचा तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही विपरित परिणाम होतो.

पुरेशी झोप न मिळाल्याने सकाळी तुमचे डोळे फुगतात. जर हे चक्र असे बरेच दिवस चालू राहते, मग तो दिवस दूर नाही, जेव्हा तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसू लागतील. तसेच तुम्हाला थकवा जाणवेल आणि तुमची त्वचा निस्तेज दिसेल. जेव्हा तुम्ही झोपत असता, त्याच वेळी तुमच्या त्वचेच्या पेशींना चालना मिळते.

2) भरपूर पाणी प्या.

मुबलक पाण्यामुळे आपली त्वचा चमकदार होण्यास मदत होते. आपल्या शरीरातील घाण काढून टाकून शरीरातील नवीन पेशी तयार होतात. आपल्याला हवे असल्यास, आपण आपल्या पाण्यात आरोग्यदायी गोष्टी टाकून देखील पिऊ शकता, अशा प्रकारे पाण्याचे फायदेही वाढतील.

सकाळी उकडलेल्या पाण्यात चिमूटभर दालचिनी मिसळून पिऊ शकता. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईलच, शिवाय तुम्हाला ग्लोइंग स्किनही मिळेल. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास स्ट्रॉबेरीचा रस पाण्यात मिसळून पिऊ शकता. याचे नियमित सेवन केल्याने चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात आणि चेहऱ्यावर चमक येते.

3) रोज व्यायाम करा.

व्यायामाचा अर्थ फक्त वजन कमी करणे नाही, तर शरीराला आकार देणे आणि चेहऱ्यावर ग्लो आणणे असा आहे. व्यायामाने चेहऱ्यावर चमक वाढते आणि मनही प्रसन्न होते. इतकेच नाही तर मूडही चांगले राहाते, व्यायामामुळं शरीरला थकवा येतो आणि झोप देखील येते, जे चेहऱ्याच्या त्वचेसाठी खूप महत्वाचे आहे. व त्यामुळे चेहरा सुंदर दिसू लागतो.

सूर्यनमस्कार, चालणे, सायकलिंग, जॉगिंग, स्किपिंग, डान्सिंग यांसारखे व्यायाम त्वचेत चमक आणण्यासाठी उत्तम आहेत. बाकी काही नाही तर किमान रोज एक ब्रिस्क वॉक करा. शिवाय जर तुम्ही रोज चेहऱ्याचा व्यायाम करत असाल तर फक्त 5 मिनिटांसाठी ते व्यायाम करा. एका महिन्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा बदललेला दिसेल.

4) योगाचा सराव

तुमची त्वचा चमकदार होण्यासाठी योगा महत्वाची भूमिका बजावतो. योगामुळे तुमच्या त्वचेचे स्नायू घट्ट होतात आणि ते वाढतात.शारीरिक व्यायामासोबतच तो तुम्हाला मानसिक दृष्ट्या शांत करतो. जोपर्यंत तुम्ही आतून निरोगी होत नाही, तोपर्यंत समाधान आणि शांती मिळणार नाही.

चेहऱ्यावर चमक आणणारे योगासन मुख्य म्हणजे – चक्रासन, सर्वांगासन, हलासन, शिरशासन आणि प्राणायाम इत्यादी आसनांमुळे शरीरातील ऑक्सिजन आणि रक्ताचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते. या योगांमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. ​​यामुळे त्वचेचा निस्तेजपणा कमी होतो आणि चमकदार त्वचा मिळण्यास मदत होते.

5) साबण वापरू नका.

साबण वापरल्याशिवाय तुम्हाला तुमची त्वचा स्वच्छ वाटत नाही. पण तुम्हाला माहित आहे का? की साबणाचा जास्त वापर करणे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी चांगले नाही? साबणांमध्ये काही रसायने असतात. ज्यामुळे त्वचा निर्जीव बनते. इतकेच नाही, तर तुमची त्वचा कोरडी होते, त्वचेतील नैसर्गिक तेल आणि सीबम काढून टाकते आणि आर्द्रता काढून टाकते. त्वचेची पीएच पातळी असंतुलित होते आणि त्वचेला त्रास होऊ लागतो.

तुम्हाला हवे असेल, तर तुम्ही साबणाऐवजी घरगुती वस्तू वापरून तुमच्या चेहऱ्याची त्वचा निरोगी ठेवू शकता. बाजारात काही नैसर्गिक फेसवॉशही उपलब्ध आहेत, जे तुमची त्वचा कोरडी आणि निर्जीव होत नाहीत. तुम्ही कोणतेही फेस प्रोडक्ट वापरता, याची खात्री करा. ते तुमच्या त्वचेच्या प्रकाराला अनुकूल असणे खूप आवश्यक आहे. याकरिता तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

6) तणावात राहू नका.

तणाव हा एक असा आजार आहे, जो वरून दिसत नसला, तरी आतून तुम्हाला खातो. मानसिक पातळीवर त्रास देण्यासोबतच तुमच्या आरोग्यावरही हल्ला करतो. ज्यामुळे त्वचा जास्त प्रमाणात सीबम सोडते, ज्यामुळे छिद्रे बंद होतात. चेहऱ्यावर मुरुम येण्याचे एक कारण म्हणजे तुमचा सततचा ताण.

तणावाच्या स्थितीत शरीराला शांत करण्यासाठी थंड पाण्याची आंघोळ करावी. आंघोळ करताना सुगंधी उत्पादनाचा वापर करा, त्यामुळे तुमच्या तणावग्रस्त मनाला शांती मिळेल. हे बर्‍याच प्रमाणात ताण दूर करण्यात प्रभावी आहे. तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेच्या मज्जातंतूंना आराम मिळावा यासाठी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर बर्फ चोळू शकता.

७) झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा.

चेहऱ्यावरचा मेकअप, बाहेरचे प्रदूषण, धुळीचे कण तुमच्या चेहऱ्यावरील छिद्रांद्वारे आतमध्ये पोहोचतात. या धूळामुळे तुमच्या त्वचेचे किती नुकसान होते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुमची त्वचा रात्रीच्या वेळी दुरुस्त अवस्थेत जाते. त्यामुळे, तुमची त्वचा पूर्णपणे स्वच्छ करून रात्री झोपणे महत्त्वाचे आहे.

सर्वात आधी घरी येताच. चेहऱ्यावरील मेकअप काढून टाका. त्यासाठी तुम्ही क्लिंजिंग मिल्क किंवा मेकअप रिमूव्हर वापरू शकता. तसेच रात्री झोपताना चांगली नाईट क्रीम वापरल्याने चेहऱ्यावर चमक येईल.

8) तुमचे मन सुरक्षित आणि शांत ठेवा.

निराशा आणि राग ही काही कारणे तुमच्या चेहऱ्याची चमक गमावून बसतात. त्यामुळे परिस्थिती कोणतीही असो, तुम्ही तुमचे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. तुमचे मन अशा स्थितीत घ्या की तुम्ही सहजासहजी तुमचा ताण दूर करू शकाल. शांत मन ही अवस्था प्राप्त करण्यासाठी तुम्ही ध्यान करू शकता. यामुळे तुमचे मन शांत राहण्यास मदत होते आणि तुमची त्वचा चमकणे कधीच थांबणार नाही.

9) नैसर्गिक अन्न शैलीचा अवलंब करा.

आपल्या सर्वांना माहित आहे, की आपण जे खातो तसाच परिणाम आपल्या शरीरावर होतो. म्हणूनच आपण आपल्या आहारात ताजी फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश केला पाहिजे. ते आपल्या त्वचेवर जादू करते.

नैसर्गिक अन्नामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे इत्यादी असतात. त्यामुळे आपल्या चेहऱ्याला फायदा होतो. ऋतूत मिळणार्‍या भाज्या आणि फळे नक्कीच खावीत. जसे हिवाळ्यात संत्र्यासारखी फळे आणि पालक, मेथी यांसारख्या हिरव्या भाज्या इत्यादी.

आपली त्वचा आणि शरीर आपल्या सारखेच वेगळे आहेत. माहिती लेक वर आम्ही तुम्हाला अचूक, सुरक्षित माहिती देण्याचा प्रयत्न करतो. परंतु तरीही कोणताही घरगुती उपाय, हॅक किंवा फिटनेस टिप वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.


  • धिरज तायडे

हे वाचलंत का? –

Share