गेल्या काही वर्षांपासून बँका लुटत आहेत, असे वाटत नाही का?

Bank Information in Marathi

Bank Information in Marathi

मी तर म्हणेल नाही !

इतर देशांतील बँकिंग पद्धती आणि शुल्कांबद्दल तुम्हाला कल्पना नाही. म्हणूनच तुम्ही असे म्हणू शकता.!

आपल्या देशाची बँकिंग व्यवस्था सर्वोत्कृष्ट आहे, असे मी म्हणणार नाही, परंतु मी असे म्हणू शकतो की ती जगातील अनेक देशांपेक्षा खूपच चांगली आहे.

चला तर त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया!

१) आपल्या देशात सामान्य कर्जावरील व्याज दर किती असेल? ८-९ टक्के किंवा 10% परंतु इतर देशांमध्ये ते 22% इतके आहे .

२) आपल्या देशात एटीएम कार्डसाठी सामान्य शुल्क आहे. परंतु इतर देशांमध्ये, त्याकरिता मासिक शुल्क द्यावा लागतो.

३) आपल्या देशात एसएमएस मिळवण्याकरिता प्रति तिमाही एक निश्चित शुल्क आकारला जातो! इतर देशांमध्ये प्रति एसएमएस शुल्क लागू आहे. एसएमएस ओटीपीसाठी असो, बॅलन्स चेक करण्यासाठी असो किव्हा डिपॉझिटसाठी असो.

४) आपल्या देशात प्रति व्यवहार म्हणजेच, प्रत्येक ट्रान्सक्शन वर शुल्क आकारले जात नाही. इतर देशांमध्ये, प्रति व्यवहार शुल्क लागू आहे.

५) आपल्या देशामध्ये अकाउंट मेन्टेनन्स वर शुल्क फक्त करंट अकाउंट साठी लागू आहे. इतर देशांमध्ये, हे शुल्क दरमहा व्यवहारांच्या प्रमाणानुसार आकारल्या जातो.

६) आपल्या देशात तुमच्या खात्यात कितीही रक्कम असेल, तुम्हाला त्यावर व्याज मिळते, आणि ते सुद्धा कोणत्याही अडथळ्याशिवाय! इतर देशांमध्ये, जर तुम्ही एका महिन्यात 3 पेक्षा जास्त व्यवहार केले असतील, तर तुम्हाला त्या महिन्याचे व्याज मिळत नाही. खात्यात कितीही पैसे असले तरी देखील!

७) बँका तुम्हाला आपल्या देशात प्रत्येक टप्प्यावर कर्ज देऊन मदत करतात. अति सामान्य कर्मचाऱ्यालाही कर्ज मिळू शकते. इतर देशांमध्ये, उच्च वर्ग वगळता क्रेडिट मिळवणे खूप कठीण आहे.

अजून खूप काही आहे. परंतु सध्या इतकेच बोलून पूर्ण विराम देतो. अश्याच माहिती साठी आमच्या चॅनेल ला नक्की subscribe करा .माहिती लेक मधून मी सागर परत भेटूया एका नवीन माहिती सोबत धन्यवाद!

  • सागर राऊत

हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment