ऍश गार्ड म्हणजे काय?
Ash Gourd: ऍश गार्ड हा फळ आणि भाजीचा प्रकार आहे. ऍश गार्ड ला अनेक नावांनी ओळखले जाते, जसे कि पांढरा भोपळा, कोहळा, राख गार्ड, वॅक्स गार्ड, कुमरा, विंटप टरबूज आणि चालकुमरा म्हणून ओळखले जाते.
ऍश गार्ड चा आकार गोलाकार व उभा असतो. ऍश गार्ड चा वेल असतो आणि हे गोलाकार आकारात टरबूजा प्रमाणे दिसते आणि उभ्या आकारात बाटली प्रमाणे दिसते. ऍश गार्ड चा रंग बाहेरून हिरवी तसेच आतून पांढरी दिसते.
ऍश गार्ड हा भाजी बनवायला वापरला जातो तसेच, भाजीव्यतिरिक्त ज्यूस, सॅलड आणि डेझर्ट बनवून सेवन करता येते. आग्राच्या पेठा हा जगप्रसिद्ध आहे. हा पेठा ऍश गार्ड पासून बनवला जातो. ऍश गार्ड चे जुस बनवून सेवन करणे फायदेशीर मानले जाते.
ऍश गार्ड हा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. हे शरीराला डिटॉक्स होण्यास मदत करते,आणि अनेक आजारांपासून वाचवते.
ऍश गार्ड चा वापर हा भारत आणि चीनमध्ये अधिक प्रमाणात केला जातो. भारतातील ऋषी-मुनी हे प्राचीन काळी ऍश गार्ड चा औषध बनवण्यासाठी वापर करत असत, तसेच आयुर्वेदातही ऍश गार्ड हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितले आहे
ऍश गॉर्ड ची विविध भाषांमधील नावे
- इंग्रजी: White Gourd, Winter Melon, Wax गोरड
- मराठी: कोहळा
- हिंदी: पेठा, भोपळा पेठा
- संस्कृत: कुष्मांडा, मोठे फळ, घोरवया, ग्राम्यकर्ती
- आसामी: कोमोरा
- मणिपुरी: टोरोबोट
- तमिळ: नीर पुस्निकाई
- मल्याळम: कुंबलंगा
- तेलुगु: मित्र गुम्मादिक्कया
- बंगाली: कुमरा, चालकुमरा
- कन्नड : बुडायकुंबलाकाई
ऍश गार्डमधील पौष्टिक घटक
पोषक तत्व | मूल्य प्रति 100 ग्राम |
पानी | 96.1 g |
प्रोटीन | 0.4 g |
कार्बोहाइड्रेट | 3 g |
कैल्शियम | 19 mg |
मैग्नीशियम | 10 mg |
पोटैशियम | 6 mg |
जिंक | 0. 61 mg |
मैंगनीज | 0.058 mg |
विटामिन सी, टोटल एस्कॉर्बिक एसिड | 13 mg |
राइबोफ्लेविन | 0.11 mg |
विटामिन बी 6 | 0. 035 mg |
फैटी एसिड, टोटल सैचुरेटेड | 0.016 g |
फैटी एसिड, टोटल पोलीअनसैचुरेटेड | 0.087 g |
लाइसिन | 0.009 g |
एनर्जी | 13 kcal |
टोटल लिपिड (फैट) | 0. 2 g |
फाइबर | 2. 9 g |
आयरन | 0.4 mg |
फास्फोरस | 19 mg |
सोडियम | 111 mg |
कॉपर | 0.023 mg |
सेलेनियम | 0.2 µg |
थायमिन | 0.04 mg |
नियासिन | 0.4 mg |
फोलेट, टोटल | 5 µg |
फैटी एसिड, टोटल मोनोअनसैचुरेटेड | 0.037 g |
ट्रिप्टोफन | 0.002 g |
मेथियोनीन | 0.003 g |
ऍश गार्डचे फायदे
1) शरीर थंड ठेवन्यास मदत होते
उन्हाळ्या या ऋतूमध्ये शरीर हे गरम असते, शरीराला थंडावा देण्यासाठी ऍश गार्ड हा महत्वाचा आहे. ऍश गार्ड चे सेवन केल्यास शरीरातील अपचन आणि अल्सरला प्रतिबंध करण्यास मदत करते.
2) वजन कमी होण्यास मदत
ऍश गार्ड मध्ये कॅलरीज खूप कमी प्रमाणात असून पाणी भरपूर प्रमाणात असते. यामुळे ऍश गार्ड चे सेवन केल्यास वजन कमी करण्यास मदत होते आणि ऍश गार्ड मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पोट हे जास्त वेळ भरलेले राहते.
3) शरीराची ऊर्जा वाढवण्यास मदत
ऍश गार्ड मध्ये झिंक, कॅल्शियम, थायामिन, रिबोफ्लेविन आणि फॉस्फरस हे जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात. हे जीवनसत्त्वे शरीरातील ऊर्जा वाढवण्याचे तसेच थकवा दूर करण्याचे काम करतात.
4) शरीर डिटॉक्सिफाय होण्यास मदत मिळते
आजच्या धावपळीच्या युगात बहुतेक लोक शरीराकडे कमी लक्ष देतात आणि ते वाईट जीवनशैली जगतात. अशा परिस्थितीत वाईट जीवनशैली हि चांगली ठेवण्यासही ऍश गार्ड चा रस खूप फायदेशीर ठरतो.
हा रस शरीर डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते आणि तसेच हानिकारक, विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते तसेच मूत्राशयाचे कार्य सुधारते.
5) आतडे निरोगी ठेवण्यास मदत होते
ऍश गार्ड मध्ये चांगल्या प्रकारचा बॅक्टेरिया आढळतो, यामुळे पचन, बद्धकोष्ठता तसेच पोटाच्या इतर आजारांवर मात करण्यास मदत करते आणि शरीरातील आतडे स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यास मदत होते.
6) ऍसिडिटीच्या समस्येवर गुणकारी
ऍश गार्ड चा रस काढून पिल्यास ऍसिडिटी सारखी समस्या दूर होते. असे नाही कि फक्त ऍश गार्ड चा रस घेता येतो ऍश गार्ड हा इतर मार्गाने सेवन केल्यास देखील शरीरातील आम्लाची निर्मिती कमी करण्यास मदत होते. जर तुम्हाला नियमित ऍसिडिटी ची समस्या असेल तर तुमच्यासाठी ऍश गार्ड हा गुणकारी ठरेल.
7) अनेमिया ची समस्या दूर करण्यास मदत
ऍश गार्ड मध्ये लोहाचं प्रमाण अधिक असते,यामुळे लोहा हा चांगला स्रोत मानला जातो. म्हणून ऍश गार्ड चे सेवन हे शरीरातील रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करते. यामुळे अनिमियासारख्या समस्यांशी लढण्यास ऍश गार्ड हा मदत करतो.
8) शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत
ऍश गार्ड मध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात आढळतात. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
ऍश गार्ड चा रस हा रोज पिल्यास शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. याच्या मदतीने अनेक आजार आणि संक्रमणां या पासून सुरक्षित राहण्यास मदत होते.
9) त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त
ऍश गार्ड हा आरोग्यासाठी गुणकारी आहेच त्याच बरोबर,त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. ऍश गार्ड मधील आढळले जाणारे जीवनसत्त्वे आणि खनिजे त्वचेला निरोगी ठेवण्याचे काम करते. ऍश गार्ड च्या रसाचे सेवन नियमितपणे केल्याने त्वचा चमकदार बनते. तसेच त्वचेवरील पिंपल्स कमी होतात, आणि त्वचा हि दीर्घकाळ तरूण आणि चमकदार दिसते.
त्वचेप्रमाणेच ऍश गार्ड हे केसांसाठीही खूप फायदेशीर असते, केसांवर ऍश गार्ड चे जेल बनवून वापरल्यास कोंड्याच्या समस्या दूर होऊन, केस चमकदार बनतात.
10) मधुमेह नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त
ऍश गार्ड हा मधुमेहासारख्या गंभीर रोगासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. ऍश गार्ड मध्ये कार्बोहायड्रेट आणि साखरेचे प्रमाण नसल्यासारखेच आहे. ऍश गार्ड चे सेवन केल्याने शरीरातील नको, असलेले पदार्थ काढून टाकले जाते.
अनेक संशोधनांमध्ये ऍश गार्ड हे मधुमेहासाठी खूप उपयुक्त मानले गेले आहे. मधुमेहा चा आजार कमी करण्यासाठी आहारात आणि जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे.
ऍश गार्ड चे नुकसान
कोणतीही गोष्टीत दोन बाजू असतात, तसेच जिथे फायदा आहे तिथे नुकसान हे असणारच, म्हणून ऍश गार्ड हे आरोग्यासाठी फायदेशीर असले, तरी ऍश गार्ड चे काही नुकसान देखील आहे. ऍश गार्ड चे नुकसान खालीलप्रमाणे आहेत.
- ऍश गार्ड चा प्रभाव हा थंड असल्यामुळे,ज्यांना थंड गोष्टी आवडत नाहीत त्यांनी ऍश गार्ड चे सेवन टाळावे.
- हिवाळ्यातऍश गार्ड चे सेवन केल्याने सर्दीची समस्या उद्भवू शकते, म्हणून हिवाळ्यात ऍश गार्ड चे सेवन कमी करणे चांगले असते.
- मिठाई म्हणून ऍश गार्ड चे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.
- गर्भवती महिलांनी ऍश गार्ड चे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
- ऍश गार्ड चे सेवन हे मर्यादित प्रमाणातच करावे, जास्त प्रमाणात ऍश गार्ड चे सेवन केल्यास शरीराला हानी पोहोचते.
- मोहिनी राऊत
हे वाचलंत का ? –