राईस ब्रान ऑईल रुग्णांसाठी आवश्यक?

राईस ब्रान ऑईल

तांदूळ कोंडा तेलाचे फायदे, यावरून तुम्हाला माहीत झालेच असेल, की हे तेल तांदुळापासुन तयार केले जात असेल.

स्पष्टपणे सांगायचे झाले, तर हे तेल तांदुळाच्या कोंड्यापासून काढले जाते. आधी तांदुळाच्या कोंड्याचा वापर हा जनावरांना खायला देण्यासाठी होत असे, परंतु जेव्हा पासून या Rice bran oil benefits लोकांना माहीत झाले आहेत.

तेव्हा पासून सर्वीकडे या तेलाचा वापर वाढला आहे. मार्केट मध्ये तसे तर तेलाचे खूप प्रकार उपलब्ध आहेत. जसे बदाम तेल, तीळ तेल, सूर्यफूल तेल, इत्यादी या सर्व तेलांचा आपला एक वेगळाच स्वाद आहे. यासर्व तेलांचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत.

या पोस्ट मधून आपण Rice bran oil पासून होणारे फायदे, त्यातील पौष्टिक तत्व आणि त्याचे नुकसान या बद्दल माहिती घेणार आहोत.

हे वाचलंत का? –
* कमी पाणी पितात त्यांना लवकर मृत्यू होण्याचा धोका.!
* ऑलिव्ह तेलाचे फायदे

राईस ब्रान ऑईल म्हणजे काय? – Rice bran oil in marathi

rice bran oil meaning in marathi

rice bran oil in marathi

Image Source – drweil.com

डॉक्टर्स व डाइट एक्सपर्ट्स च्या अभ्यासानुसार Rice bran oil हे शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल कमी करते. Diet Plan तयार करून देणारे एक्सपर्ट्स उच्च रक्त दाब च्या पेशन्ट ला Rice bran oil खाण्याचा सल्ला देतात.

Rice bran oil आशिया मध्ये सर्वात जास्त जापान आणि चीन मध्ये वापरले जात आहे. कारण या देशात तांदुळाचा वापर जास्त केला जातो. आणि यांच्या खाण्यात पण तांदूळ हे प्रमुख आहे.

याचा आरोग्यासाठी असणाऱ्या लाभामुळे व त्याचा असलेल्या कमी किमतीमुळे जगातल्या बाकी देशात पण याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

चांगले तेल आपल्या आहारामध्ये असणे. एक स्वस्थ आणि निरोगी आयुष्यासाठी खूप गरजेचे आहे. मागील काही वर्षांमध्ये लोकांनी रिफाईंड तेल खाणे कमी केले आहे.

कारण त्यांची असलेली अनियमित दिनचर्या आणि वेग-वेगळ्या प्रकारचे तेल खाल्ल्यामुळे लोकांन मध्ये कोलेस्टेरॉल चे प्रमाण वाढत चाललेले आहे. त्यामुळे हृदय रोगाची बिमारी पण वाढत आहे. याच कारणामुळे लोकांनी बाकी तेला पेक्षा Rice bran oil ला आपली पसंती दर्शवली आहे. आणि खाण्यामध्ये सुद्धा वापरणे सुरु केले आहे.

राइस ब्रान ऑइल चे फायदे (Benefits of rice bran oil in marathi)

1) वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डायटिंग करत असाल आणि तुम्ही विचार करीत असाल की वजन कमी करण्यासाठी जेवणामध्ये कोणतं तेल वापरावं, ज्यामुळे तुमचे वजन कमी करण्यास मदत होईल.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या करिता Rise bran oil हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. तुम्ही तुमच्या Diet Plan मध्ये जे पण खात आहात. ते या तेलापासून तयार करा. Rise bran oil हे मेंटबॉलिजम ला सुरळीत ठेवण्यात मदत करतो. ज्यामुळे तुमचा फॅट कमी होण्यास मदत होते.

2) व्हिटॅमिन इ हे शरीरासाठी फायदेशीर

व्हिटॅमिन इ हे एक अँटीऑक्सिडेंट आहे. जे मोठ्या-मोठ्या बिमाऱ्यांन पासून तुमचा बचाव करते. व्हिटॅमिन इ ला रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पण ओळखले जाते. व्हिटॅमिन इ तुम्ही चांगल्या प्रकारे घेतल्यास तुमचे बिमार राहण्याचे प्रमाण कमी होऊन जाते.

3) कॅन्सर होण्यापासून वाचवतो

Rice bran oil मध्ये टोकॅफेरोल्स आणि टॉकटरिनोल्स नावाचे दोन घटक आहेत. जे फ्री रैडिकल्स पासून होणाऱ्या कॅन्सर ला रोखण्यास मदत करतात. जर तुम्हाला कॅन्सर सांगितला असेल तर हे तेल तुम्ही वापरू शकता. (कॅन्सर पेशन्टनी डॉक्टर चा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

4) डायबेटिस मध्ये तेलाचे फायदे

ज्यांना डायबेटिस आहे. त्यांना Rice bran oil चे फायदे मिळतात. काही अध्ययनामध्ये असे लक्षात आले आहे, कि डायबेटिस मध्ये Rice bran oil खाल्यामुळे 30℅ रक्तातील ग्लुकोज कमी होते जे कि Diabetes साठी चांगलं आहे. तरी पण ज्यांना Diabetes आहे त्यांनी डॉक्टर ची सल्ला घेऊनच याचा वापर करावा.

5) केसांच्या आरोग्यासाठी फायदे

Rice bran oil मध्ये असलेले फेरीलीक ऍसिड आणि एस्टर जे केसाच्या विकासात मदत करतात. या तेलात अँटीऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन इ हे घटक मोठ्या प्रमाणात आहेत. जे केसांना वाढण्यास मदत करते. त्याच सोबत यात ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिड असते. जे अवेळी पांढरे होणारे केस रोखण्यासाठी मदत करते.

6) निरोगी त्वचेसाठी फायदेशीर

तांदूळ कोंडा हे तेल त्वचेसाठी सुद्धा खूप लाभदायक आहे. तुम्हाला जर त्वचे संबंधी कोणती ऍलर्जी असेल, तर हे तेल तुम्ही डायरेक्ट त्वचे वर लावू शकता. यामुळे तुमची ऍलर्जी कमी होण्यास थोडी मदत मिळते. ऍलर्जी जास्त असेल तर डॉक्टर चा सल्ला नक्की घ्या.

7) हृदयासाठी फायदेशीर

या तेलामध्ये Oryzanol हा घटक असतो. यामुळेच मुख्य Rice bran oil चे फायदे आहेत. हे तेल तुम्ही जर प्रमाणात खात असाल, तर तुमचे कोलेस्ट्रॉल लेवल यामुळे कंट्रोल ठेवण्यात मदत होते. आणि तूमचे हृदय स्वस्थ राहते व हृदया संबंधी कोणती बिमारी होण्याची शक्यता कमी होऊन जाते.

राइस ब्रान तेलाचे दुष्परिणाम

जसे की आपल्याला माहीत आहे. ज्या गोष्टी चे फायदे असतात, तसेच त्या गोष्टीचे काही दुष्परिणाम पण असतात. तसेच Rice bran oil चे खूप साऱ्या फायद्यानसोबत काही दुष्परिणाम सुध्दा आहेत. Rice bran oil चे तसे तर खूप फायदे आहेत परंतु याच्या जास्त वापरामुळे तुमच्या शरीराला याचे नुकसान सोसावे लागू शकतात.

  • Rice bran oil फक्त भाजी मध्ये वापरा याला कच्च खाऊ नका. हे तेल कच्चे खाणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
  • तुम्हाला पोटा संबंधित जुनी कोणती बिमारी असेल तर तुम्ही rice bran oil न वापरने चांगलं राहील.

सारांश :- Rice bran ऑइल चे फायदे

मार्केट मध्ये वेग वेगळ्या प्रकारचे तेल उपलब्ध आहेत . त्यामधून आपल्यासाठी कोणते चांगले आहे हे निवडणे आपले काम आहे. आपण आधी हे पाहायला पाहिजे, की आपल्याला त्या तेलामधून काही फायदे व्हायला हवे. त्या नुसार आपण तेलाची निवड करायची आहे. तांदुळाच्या कोंड्याचे तेल हे तुमच्या केसानसाठी, त्वचेसाठी, आणिशरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

प्रश्न १ – Rice bran oil चे काही दुष्परिणाम आहेत का?

उत्तर – हो जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात हे तेल खात असाल. तर याचे दुष्परिणाम आहेत. तुम्हाला जर पोटाचा काही त्रास असेल, तर हे तेल खाणे टाळणेच तुमच्या आरोग्यासाठी चांगले राहील. प्रेग्नन्सी मध्ये rice bran ऑइल खाण्यासाठी हे डॉक्टर चा सल्ला घेणे आवश्यक आहे. तुम्ही जर हे तेल त्वचे साठी वापरात असाल, तर आधी थोडा हाताला लावून बघा जर जळजळ होत असेल तर लावू नका.

प्रश्न २ – सोयाबिन तेला पेक्षा तांदुळाच्या कोंड्याचे तेल चांगले आहे का?

उत्तर – हो काही कारण आहेत त्यामुळे rice bran oil हे चांगले आहे. कारण यामध्ये व्हिटॅमिन इ आहे. जे तुमची शूगर कंट्रोल मध्ये ठेवते. सोबतच कोलेस्ट्रॉल लेवल पण कमी करते. जे तुमच्या हृदया साठी चांगले आहे. म्हणून सोया तेला पेक्षा rice bran oil चांगले आहे.

प्रश्न ३ – स्वयंपाक मध्ये हे ऑइल कसे फायद्याचे आहे ?

उत्तर – तेल विकत घेतांना आपण खूप गोष्टीचा विचार करतो व ही एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेत नाही. ते म्हणजे हाई स्पोकींग पॉइंट असलेले तेल वापरने. हाई स्पोकींग ऑइल म्हणजे जेव्हा आपण तेल गरम करतो, तेव्हा त्या तेलातील पौष्टीक तत्व नाहीसे होत नाहीत. आणि आपण जे काही करत आहे त्यामध्ये कमी तेल लागते. या तेलाचा स्पोकींग पॉइंट हाई असल्यामुळे हे भाजी व इतर गोष्टीमध्ये वापरण्यासाठी एक उत्तम तेल मानले जाते.

rice bran oil in marathi हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. अश्याच छान छान माहितीसाठी माहिती लेक ला अवश्य भेट देत राहा..!

  • सागर राऊत

📢 ( महत्वाची सूचना – हे आर्टिकल तुम्हाला Rice bran oil बद्दल माहिती देणे असल्याकारणाने Rice bran oil चा वापर करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा आहे. इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल. धन्यवाद… 😊 )

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share