Eye Flu Home Remedy : आय फ्लू वर घरगुती आयुर्वेदिक उपाय जाणून घ्या!

पावसाळ्यात, आय फ्लू वाढत्या प्रमाणात लोकांना त्याचा बळी बनवत आहे. अशा परिस्थितीत हे टाळण्यासाठी काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच, डोळ्यांचा फ्लू बरा करण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय आहेत त्याबद्दल जाणून घ्या.

Ayurvedic Remedy For Eye Flu

Eye Flu Symptoms in marathi

Ayurvedic Remedy For Eye Flu : पावसाच्या दिवसांमध्ये लोकांना अनेक प्रकारचे संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका खूप मोठ्या प्रमाणात असतो. यामध्ये डेंग्यू, मलेरिया हा पहिला क्रमांकावर येतो. परंतु, यावेळी खूप लोक डोळ्यांच्या फ्लूला बळी पडत आहेत. आय फ्लू म्हणजे डोळ्यांना संसर्ग होणे होय.

डोळ्यांना होणारे इंफेक्शन, डोळे लाल होणे, डोळ्यांमध्ये जळजळ होणे, डोळे कोरडे होणे आणि खाज सुटणे यासारख्या समस्या आय फ्लू मध्ये होतात. त्यालाच आपल्या मराठी भाषेमध्ये डोळे येणे, असे देखील म्हणतात.

देशभरात डोळ्यांच्या फ्लूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत खूप प्रमाणात लोक डॉक्टरांशी संपर्क साधून औषधे घेत आहेत. परंतु औषधे आणि उपचारांशिवाय हा त्रास टाळायचा असेल, तर आयुर्वेदाचीही मदत घेता येईल.

काही तज्ञ म्हणतात की, डोळ्याच्या फ्लूवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करता येतात. या खात्रीशीर उपायाने डोळ्यांमध्ये पसरलेला संसर्ग मुळापासून नष्ट करता येतो. त्याआधी जाणून घेऊया आय फ्लू कसा होतो.

आय फ्लू कसा होतो?

लोकांचा असा विश्वास आहे की, ज्या व्यक्तीला आय फ्लू झाला आहे. अश्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहिल्यास, दुसर्‍या व्यक्तीला देखील आय फ्लू होऊ शकतो. पण हे खरे नाही. हा निव्वळ गैरसमज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आय फ्लू संक्रमित व्यक्तीच्या डोळ्यात बघून कधीही पसरत नाही. उलट त्याच्या हातांच्या संपर्कात येऊन तोच हात आपल्या डोळ्याला चुकून लागला तर हे घडू शकते.

आय फ्लूवर उपचार कसे करावे?

जर तुम्हाला आय फ्लू झाला असेल, तर डॉक्टरांकडे धाव घेण्याची काही गरज नाही. तुम्ही त्यावर घरी उपचार करू शकता. यासाठी एका ग्लास पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण टाकून उकळा. नंतर मंद आचेवर थोडावेळ उकळू द्या.

आता हे पाणी स्वच्छ कपड्याने गाळून घ्या आणि दिवसातून दोन ते तीन वेळा त्या पाण्याने आपले डोळे सेकुन घ्या. या रेसिपीमुळे तुम्हाला खूप आराम मिळेल. आय फ्लू बरा करण्यासाठी हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे.


हे वाचलंत का ? –

Share