मखाना बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती |Makhana in Marathi

मखाना म्हणजे काय?

Makhana : मखाना हे एक उच्च मूल्याचे नगदी पीक आहे. मखाना याला इंग्रजीमध्ये फॉक्सनट किंवा लोटस सीड्स असे म्हटले जाते. मखानाचे सेवन हे उपवासाच्या वेळी केले जाते. मखाना मध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक तत्वे आढळतात.

मखानाचा उपयोग विविध आजारांच्या औषधी बनवण्यासाठी केला जातो, जसे कि किडनी समस्या, डायरिया, ल्युकोरिया आणि प्लीहाचे हायपोफंक्शन यासह पारंपारिक ओरिएंटल औषधां मध्ये मखानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. मखाना मध्ये आढळले, गेलेले औषधी मूल्ये आणि खनिज सामग्रीमुळे मखाना हे जागतिक स्तरावर सुपरफूड म्हणून उदयास येत आहे.

मखाणामध्ये भरपूर प्रमाणात पोषक आढळतात. हे पोषक मॅंगनीज, पोटॅशियम, मॅग्नेशियम, थायामिन, प्रथिने आणि फॉस्फरसचे शक्तिशाली स्त्रोत मानले जाते. कच्चा आणि तळलेला मखाना मध्ये अमीनो ऍसिड आढळतात.

कमी प्रमाणात भाजलेल्या मखाना हा सकाळचा नाश्ता आणि मुलांसाठी टिफिन पर्याय बनतो. भारतातील लोक मखाना पासून खीर, रायता, करी, तसेच कटलेट यासारखे पदार्थ बनवतात.

खूप प्रमाणात मखाना चा उपयोग हा धार्मिक विधींमध्ये आणि मखाना हा देवाला अर्पण करून केला जातो. संपूर्ण देशात मखाना हा वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो. जसे कि, उत्तर बिहारमध्ये, लोक बिया पॉप्ड स्वरूपात खातात. तसेच मणिपूरमध्ये लोक मखाना ची पाने आणि देठ शिजवून खातात.


मखानाचे पौष्टिक घटक

मखाना खाण्याचे फायदे हे त्यात असलेल्या पौष्टिक घटकांमुळेच दिसून येतात. मखानामध्ये पोषक घटक किती प्रमाणात आढळतात.

पोषक तत्वमात्रा प्रति 100 ग्राम
कैलोरी393 kcal
प्रोटीन10.71 ग्राम
फैट10.71 ग्राम
कार्बोहाइड्रेट71.43 ग्राम
फाइबर3.6 ग्राम
शुगर3.57 ग्राम
कैल्शियम18 मिलीग्राम
पोटेशियम57 मिलीग्राम
सोडियम750 मिलीग्राम
फैटी एसिड टोटल सैचुरेटेड1.79 ग्राम

मखानाचे विविध भाषांमधील नावे

  • इंग्रजी – गोरगोन फ्रूट (Gorgon fruits), प्रिकली वाटर लिलि (Prickly water lily), Fox nut (फॉक्स नट)
  • हिंदी – मखाना, मखान्ना;
  • मराठी – मखणे (Makhane), मखाणे (Makhane);
  • संस्कृत – मखान्न, पद्मबीजाभ, पानीयफल, अंकलोड्य;
  • गुजराती – मखाणा (Makhana);
  • बंगाली – माखाना (Makhana);
  • मल्याळम – सीवसट (Sivsat);
  • मणिपुरी -थान्गजिन्ग (Thangjing)
  • पंजाबी – जवेर (Jeweir);
  • पर्शियन – मुकरेष (Mukhresh), मुखरेह (Mukhareh)

मखानाचे फायदे (Makhana Benefits in Marathi)


1) रक्तदाब कमी करण्यास मदत

मखनाच्या नियमित वापर केल्यामुळे रक्तदाब सारख्या समस्येपासून मोठ्या प्रमाणात आराम मिळतो. मखना मध्ये अल्कलॉइड्स हायपरटेन्शन आढळून येतात. हे उच्च रक्तदाबाच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो. म्हणून बीपी च्या समस्या कमी करण्यासाठी मखणा खाणे फायदेशीर आहे.

2) हृदयविकार कमी करतो

मखानाचे सेवन केल्याने मधुमेह, तसेच वाढते वजन नियंत्रित होते. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा हे हृदयविकार वाढवण्यासाठी जोखीम घटक आहेत. म्हणून हृदयविकार कमी करण्यासाठी मखनाचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा या समस्या टाळून हृदयविकाराचा धोका कमी करता येतो. त्याच प्रमाणे मखना चे सेवन केल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांपासून संरक्षण करता येते.

3) वजन कमी करण्यासाठी मदत होते

मखाना चे सेवन केल्याने लठ्ठपणाच्या समस्याकमी होतात. तसेच मखाना चे सेवन केल्याने शरीरातील चरबीच्या पेशी नियंत्रित होण्यास मदत होते.आणि चरबी पेशींचे वजन कमी होते. तसेच वजन कमी होण्यास मदत होते.

4) मधुमेहची समस्या नियंत्रित करता येते

मधूमेहाच्या समस्या कमी करण्यासाठी मखनाचा वापर केला जातो. मखानामध्ये हायपोग्लाइसेमिक म्हणजेच, रक्तातील साखर कमी करणारा प्रतिरोधक स्टार्चचा आढळतो. हा स्टार्च मधुमेहाच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. तसेच ते शरीरातील इन्सुलिन नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरतो.

5) किडनीसाठी मखना फायदेशीर

मखनाचे सेवन करणे किडनीसाठीही फायदेशीर आहे. मखनाचे सेवन केल्याने मूत्रपिंडाच्या समस्यां जसे कि, अतिसार सारख्या इतर आजारांविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फायदेशीर आहे. किडनीच्या समस्यां असल्यास त्यावर उपचार करण्यासाठी मखनामधील कोणते गुणधर्म फायदेशीर असेल हे अजूनही स्पष्ट झाले नाहीत.

6) प्रथिनांचा चांगला स्रोत आहे

मखणामध्ये प्रथिने हे भरपूर प्रमाणात आढळते. जसे कि,100 ग्रॅम मखणामध्ये सुमारे 10.71 ग्रॅम इतके प्रथिने असतात. त्यामुळे की मखणाचे सेवन केल्याने प्रोटीनची कमतरता भासत नाही. मखणाचे सेवन नियमित केल्याने शरीरातील प्रोटीनची मात्रा पूर्ण होते.आणि ज्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता असल्यामुळे निर्माण होणाऱ्या अनेक आजारांवर मात करता येते.

7) गरोदरपणात फायदेशीर ठरते

गरोदरपणात मखनाचे सेवन करणे खूप फायदेशीर असते. गरोदरपणात गरोदर महिलांसाठी मखनाचा वापर हा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मिसळून केला जातो. तसेच,गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर होणारी कमजोरी दूर करण्यासाठी मखनाचा वापर केला जातो. मखनामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात जसे प्रथिने, लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक गर्भधारणेदरम्यान स्त्रीला निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरतात

8) कान दुखीपासून आराम मिळतो

कान दुखने या मागील अनेक कारणे असतात. कान दुखने हि समस्या साधरणतः लहान मुलांमध्ये दिसून येतो. कानदुखीपासून आराम मिळण्यासाठी मखनाच्या बियांचा वापर केला जातो. कान दुखीपासून आराम मिळवण्यासाठी मखणाच्या बिया पाण्यात उकळून. या उकडीचे एक किंवा दोन थेंब कानात टाकल्यास कानदुखीच्या समस्या दूर होतात.

9) शरीरातील जळजळ कमी होते

अनेक लोकांमध्ये शरीराच्या वेगवेगळ्या भागात जळजळ होण्याची समस्या दिसून येते, जसे पाय किंवा तळपाय होणारी जळजळ ची समस्या असते. या प्रकारची शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी दुधात मखना मिसळून प्यायल्याने आराम मिळतो.

10) अतिसार (जुलाब) थांबन्यास मदत होते

आहारातील झालेला बदल किंवा अन्न विषबाधामुळे अतिसार होतो. अतिसार रोखण्यासाठी आहारात बदल करा आणि सोबतच मखनाचे सेवन देखील करा.मखनाचे सेवन केल्याने जुलाब थांबन्यास मदत होते.तसेच मखणा हा तुपात तळून झालेला चांगला असतो.


मखनाचे नुकसान

  • मखणामध्ये फायबर काही प्रमाणात आढळतो.मखना अधिक प्रमाणात सेवन केल्यामुळे नुकसान होऊ शकते. त्यामुळे गॅस आणि पोटाचे आजार होऊ शकते.
  • काही लोकांना मखना खाण्याची अ‍ॅलर्जी असल्यास, ताबडतोब डॉक्टरांना दाखवून त्यांचा सल्ला घ्यावा.
  • मखणाचे सेवन प्रमाणातच करणे गरजेचे असते,जर मखणा हा जास्त प्रमाणात सेवन केल्यास काही व्यक्तींवर नकारात्मक परिणाम होतात.
  • दूध आणि मखणा एकत्र सेवन करू नये, काही लोकांना असे केल्यास ऍलर्जी होऊ शकते, म्हणून दूध आणि मखणा कधीपण सोबत घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
  • असे म्हटले जाते मखना हा पचायला खूप हलका असून, त्यामुळे जास्त नुकसान होत नाही,परंतु गर्भवती महिलांनी मखणा सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मखानाबद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न

Q.1) मखना हा उपवासाला खाऊ शकतो का?

Ans – होय, मखना हा उपवासाला खाल्ला जातो, भारतात अनेक ठिकाणी मखना हा उपवासाच पदार्थ म्हणून विकत घेतात.

Q.2) मखानाचा प्रभाव कसा असतो ?

Ans – मखानाचा प्रभाव गरम असतो.

Q.3) मखणामध्ये कोणते पौष्टिक घटक आढळतात?

Ans- मखणामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि फायबर हे पौष्टिक घटक आढळतात.

Q.4) मखना आणि कमळाच्या बिया एकच आहेत का?

Ans- होय, कमळाच्या बिया आणि मखाना एकच आहेत.

Q.5) मखना खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे?

Ans- मखनाचे सेवन नियंत्रित प्रमाणात करावे, मखाना हा भाजून किंवा पावडर बनवून वापरता येतो.


  • मोहिनी सदाफळे राऊत

हे वाचलंत का ? –

Share