Kusum solar yojna 2023 नवीन नोदणी सुरू 60% अनुदान मिळणार
kusum yojana
PM Kusum Yojana : सरकार ने आपल्या शेतकऱ्यानंसाठी एक नवीन योजना आणली आहे .कुसुम सोलर पंप योजना या योजने चा आपल्या शेतकरी मित्रांना खूप फायदा होणार आहे. या योजने मध्ये शेतकरी त्याची पाण्याची व्यवस्था आता सोलर पंप ने करू शकतो.
त्याकरिता शेतकऱ्याला सोलर पंप देण्यात येत आहेत. चला तर मग सविस्तर जाणून घेवुत ही योजना नेमकी आहे तरी कशी.
ही योजना सुरू करण्यामागे सरकार ने शेतकऱ्याच्या हिताची बाजू बघितली आहे. आज सुद्धा आपल्या देशात काही ठिकाणी वीज पुरवठा व्यवस्थित नसल्यामुळे बळीराजाला पेट्रोल, डिझेल ने चालणाऱ्या मशीन चा वापर करून आपल्या पिकाला पाणी द्यावे लागते. हेच कारण लक्षात घेवून सरकार ने हे पावूल उचलले आहे.
या योजने मुळे शेतकऱ्यांचे पेट्रोल, डिझेल पंप सोलर पंप मध्ये बदलून शेतकऱ्याचा खर्च कमी होईल. ही योजना शेतकऱ्यासाठी खूप फायद्याची आणि मोलाची योजना आहे.
आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर या योजने बद्दल संपूर्ण माहिती आम्ही या पोस्ट मध्ये दिली आहे. या करिता पोस्ट पूर्ण वाचा.
या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला kusum solar pump yojana काय आहे. त्याच्या साठी कागद कोणते लागतात याबद्दलची सर्व माहिती दिली आहे.
कुसुम सोलर पंप योजना ही सरकार द्वारे चालू केल्या गेलेली, एक महत्वकांक्षी योजना आहे. जग येवढं प्रगत झाल्यावर सुद्धा आज शेतकऱ्याला शेती करत, असताना खूप अडचणी येतात.
त्या मधील एक आहे. उभ्या पिकाला जगवने व त्याला पाणी देणे या करिता सरकार ने ही योजना आणली आहे.
शेतकरी आज शेतीला पाणी देण्याकरिता ज्या मशीन चा वापर करतात. त्या मशीन ला डिझेल व पेट्रोल खूप मोठ्या प्रमाणात लागते.
यामुळे त्याचा खर्च वाढतो व उत्पन्न कमी होते. पण सोलर पंप बसलवल्या वर शेतकऱ्याला बाकी खर्च कमी होवून जाईल यामुळे त्याचे खूप पैसे वाचतील आणि उत्पन वाढेल.
कुसुम सोलर कृषी पंप योजने मुळे शेतकऱ्याला होणारे लाभ
- या योजने मुळे शेतकऱ्याची पेट्रोल व डिझलच्या मशीन वरील खर्च कमी होईल, परिणामी त्याची पैशाची बचत होईल.
- शेतकरी मित्र पेट्रोल आणि डिझेल च्या पंपचा वापर कमी करून सोलर पंप चा वापर जास्त करतील, तर ते पिकाला योग्य प्रकारे पाणी देवू शकतील.
- या योजने मुळे शेतकऱ्याला नेहमी पेक्षा उत्पन्न जास्त होईल, कारण सोलर पंपमुळे पाण्याची मुबलकता वाढून जाईल.
- जे शेतकरी विजेचा पंप चालवतात, त्यांनी हे बसवल्यास त्यांना वीज बिलाचा बोजा सहन करावा लागणार नाही.
- या सोलर पंप करिता शेतकऱ्याला एकूण खरचाच्या 60% पैसे सबसिडी स्वरूपात केंद्र सरकार तर्फे दिले जातील व 30% बँक कर्ज त्याला पुरवले जाईल.
- शेतकऱ्याला सोलर पंप ला लागणाऱ्या किमती मधून खर्च फक्त 10 टक्के करायचा आहे.
- सोलर पंप लागल्या मुळे शेतकरी त्याच्या शेतीला दिवसाला पाणी देवू शकेल, वीज कंपनी च्या वेळे वर चालायची काही गरज उरणार नाही.
- या योजने मधील एक आणखी फायद्याची गोष्ट ही आहे, जर आपली गरज संपून वीज अधिक उरणार असेल, तर ती वीज आपण वीज कंपनी ला विकून त्यातून पैसे कमवू शकतो. याचे आपण महिन्याला कमीत कमी 6000 रुपये कमवू शकतो.
योजने करिता आवश्यक असलेली कागदपत्र
- पासपोर्ट साइज् फोटो
- ज्या शेतीत पंप बसवता त्याचे कागद पत्रे ( सात बारा )
- मोबाईल नंबर
- पत्ता असलेले कागद पत्र
- बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक
- आधार कार्ड
लक्षात घ्या या योजने मध्ये पैसे भरावे लागतात. म्हणून काही फेक website सुद्धा आहेत. ज्यामध्ये तुम्ही payment करून तुम्हाला कोणताही लाभ होणार नाही.
शक्यतो अर्ज आपल्या जवळील सेतू केंद्र मधून करून घ्या.
हे वाचलंत का ? –