झुरळ माहिती मराठी | Zural Marathi Mahiti

Share

big cockroach

zural-marathi-mahiti

झुरळ|Zural Marathi Mahiti

तुम्हाला माहिती आहे का? असा जीव ज्यांचा रक्ताचा रंग हा पांढरा आहे.? असा कोणता जीव असेल बरं ज्याचे रक्त पांढऱ्या रंगाचे आहे…?

Telegram Channel वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

तो जीव म्हणजेच आपल्या घरातील बाथरूम किंवा किचन च्या कोपऱ्यात लपून बसणारे झुरळ होय!
हाच तो जीव आहे ज्याच्या रक्ताचा रंग हा पांढरा असतो.
आजच्या पोस्ट मध्ये आपण झुरळ बद्दल काही फॅक्ट जाणून घेणार आहोत, चला तर मग बघूया..!

१) झुरळा च्या रक्ताचा रंग पांढरा असतो, कारण त्याचा रक्तामध्ये हिमोब्लोबिन ची कमी असल्यामुळे. हिमोब्लोबिन हे हिम म्हणजेच आयरण आणि ग्लोबिन, प्रोटीन मिळून बनत आणि शरीरात ऑक्सिजन च परिवहन करतो याच हिमोब्लोबिन मुळे रक्ताचा रंग हा लाल असतो.

२) जगात झुरळाच्या जवळ जवळ 45000 प्रजाती सापडतात.

३) झुरळा हा असा जीव आहे, ज्याचं मुंडक हे धडा पासून वेगळ झाल्यावर पण तो ९ दिवस जगू शकतो.

४) झुरळाला पंख असून पण त्यातील थोड्या फारच प्रजाती ह्या उडू शकतात.

५) झुरळ हे बिना खायचे एक महिना जिवंत राहू शकतात.

६) झुरळानमुळे ३३ प्रकारचे बॅकटिरियान चा प्रसार होतो. ज्यामुळे लहान मुलांना अस्थमा सारख्या बिमाऱ्या होऊ शकतात.

झुरळ हा घरामध्ये, हॉटेल, दुकान तसेच इतर ठिकाणी आढळणारा एक सामान्य कीटक आहे. झुरळ प्रामुख्याने अंधाऱ्या, ओलसर आणि उबदार ठिकाणी राहणे पसंत करते. स्वयंपाकघरातील सिंकखाली, ड्रेनेजजवळ, कचऱ्याच्या डब्याजवळ आणि फर्निचरच्या फटींमध्ये झुरळे लपलेली दिसतात.

झुरळे विविध प्रकारची असतात. त्यांचा आकार आणि रंग प्रजातीनुसार बदलतो. काही झुरळे तपकिरी, तर काही काळसर रंगाची असतात. झुरळांना अन्नाचा वास लवकर जाणवतो आणि उरलेले अन्न, कचरा तसेच इतर सेंद्रिय पदार्थ त्यांना आकर्षित करतात.

झुरळांमुळे घरातील स्वच्छतेवर परिणाम होऊ शकतो. त्यांच्या शरीरावर किंवा पायांवर सूक्ष्मजीव असू शकतात आणि ते अन्न किंवा स्वयंपाकघरातील पृष्ठभागावर पोहोचू शकतात. त्यामुळे अन्न झाकून ठेवणे आणि स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे.

घरात झुरळांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अन्नाचे कण लगेच साफ करावेत, कचरा नियमितपणे बाहेर टाकावा आणि पाण्याची गळती दुरुस्त करावी. भिंतीतील किंवा फर्निचरमधील फटी बंद करणेही उपयोगी ठरते. झुरळांचा प्रादुर्भाव जास्त असल्यास योग्य कीटकनियंत्रण सेवा घेणे हा प्रभावी पर्याय ठरू शकतो.

हे होती झुरळ बद्दल चे थोडक्यात परंतु महत्वाची माहिती आम्ही आशा करतो, कि हि माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. अशाच छान छान माहिती साठी माहितीलेक ला अवश्य भेट द्या.

  • धिरज तायडे

हे वाचलंत का? –


🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.


Share

Leave a Comment