सरडा रंग का? व कसा बदलवतो?

सरडा मराठी माहिती

sarda3

सरडा हा प्राणी रंग का..? व कसा बदलवतो..?
(सरडा विषयी माहिती)

हा तर सारखा सारखा रंग बदलतो! हे तुम्ही खूप दा ऐकलं असेलच. हे वाक्य माणसांना लागू होत. म्हणजेच एका गोष्टीवर स्तिर नसणे. हे वाक्य नेमकं कुठून आलं हे तूम्हाला नक्कीच माहिती असेल!
तो एक प्राणी आहे जो आपला रंग नेहमी बदलतो.

हा प्राणी प्रसंगानुसार आपला रंग ज्या वास्तूच्या सानिध्यात असेल तसा करतो. पण हे तो आपल्या बचावात्मक पद्धतीसाठी करतो. जस कि माणूस…….
तर हा प्राणी सरडा आहे. यालाच इंग्रजी मध्ये कैमीलियन (Chameleons) असे म्हणतात.

याची जीभ लांब असून, खूप वेगाने जिभीमार्फत आपली शिकार करतो. हा आपला प्रत्येक डोळा स्वतंत्र पणे हलवू शकतो. ज्यामुळे गिरगिट एकाच वेळी दोन भिन्न वस्तूंचे निरीक्षण करू शकतो.

हा आपला डोळा शरीराच्या ३६० अंशात फिरवू शकतो. याचे डोळे खूप तीष्ण असून याला स्वतःपासून ०५ ते १० मीटर अंतरावचे कीटक दिसतात. हा छोटेछोटे कीटक व फुलपाखरू इत्यादी वर जगतो.

sarda2

सरडा हा दोन्ही व्हिसिबल आणि अल्ट्रावायलेट लाईट मध्ये पाहू शकतो. सरड्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत. आणि ते अफ़्रीका, माडागास्कर, स्पेन, पुर्तगाल, भारत, दक्षिण एशिया इथे आढळतात.

जसे कि सांगितल्या प्रमाणे सरडा विविध रंग बदलवू शकतो. जसे कि गुलाबी, निळा, लाल, नारिंगी, हिरवा, काळा, तपकिरी, फिकट निळा, पिवळा, आणि जांभळा इत्यादी.
तर आत्ता बघूया की,

सरडा रंग कश्या प्रकारे बदलतो. (सरडा रंग कसा बदलतो)

सरड्याच्या त्वचेवर एक थर चढलेला असतो, त्यात विविध रंग असतात. आणि त्या थरा खाली गुआनाईन क्रिस्टल्स असलेले पेशी असतात. आणि सरडा त्या क्रिस्टल्स ची जागा बदलवतो. त्यामुळे सरडा आपला रंग बदलू शकतो.

सरडा आपला रंग दुसऱ्याची शिकार करण्याआधी व दुसऱ्याची स्वतः शिकार होण्याआधी आपला रंग बदलवतो. प्रतिस्पर्देवर (दुसरा सरडा) हल्ला करतेवेळी हा खूप चमकदार होतो. व त्याला समर्पण करायचे असल्यास गडद रंग करतो.

वाळवंटातील सरडा हा उष्णता शोषण्यासाठी काळा रंग धारण करतो. कारण काळा रंग उष्णता शोषक असतो. यांच्या काही प्रजातींमधल्या सरड्याची हाडे जर तुम्ही अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या खाली धरली तर ती चमकतात. ज्याला बायोजेनिक फ्लूरोसेन्स असे पण म्हणतात.

sarda1

सरडा हा उष्णकटिबंधीय, पर्वतात, वाळवंटात व गवताळ प्रदेशात राहतो. यांची काही प्रजाती नाम शेष होण्याच्या मार्गावर आहे.

तर वरील पोस्टमुळे तुम्हाला सरड्याबद्दल बरीचशी माहिती मिळाली असेलच.
अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.

धन्यवाद…!

  • सागर राऊत

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment