ज्युनियर आर्टिस्टला डब्यात बंद करून विसरून गेली टीम,

When Amitabh Bachchan Saves life Of Junior Artist – ‘जादुगर’ चित्रपटाच्या सेटवर एक मोठा अपघात होता होता राहिला. खरंतर शूटिंगदरम्यान एक मुलगी एका बॉक्समध्ये बंद होती, सिन शूट केल्यानंतर फिल्म शूट करणारी टीम मुलीला डब्यातून बाहेर काढायला विसरून गेली. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्या मुलीचा जीव वाचवला.

अमिताभ बच्चन यांनी एका ज्युनियर आर्टिस्टचा जीव वाचवला.!

ही गोष्ट १९८९ सालची आहे. अमिताभ बच्चन प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जादुगर’ चित्रपटात काम करत होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे जादूगाराच्या भूमिकेत होते, आणि हि शूटिंग नटराज स्टुडिओमध्ये सुरू होती.

रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांच्या मॅजिक शोचा एक सीन शूट केला जाणार होता, ज्यासाठी एका ज्युनियर आर्टिस्टला बॉक्समध्ये बंद करून ठेवावे लागले. या सीनचे शूटिंग व्यवस्थित पार पडले आणि डब्यातील ज्युनियर आर्टिस्टला विसरून टीम दुसऱ्या शॉटमध्ये व्यस्त झाली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा अमिताभ बच्चन दुसऱ्या सीनचे शूटिंग करत होते, तेव्हा अमिताभ बच्चन यांना बॉक्समध्ये बंद असलेल्या मुलीचा विचार आला. त्यानंतर लगेचच अमिताभ धावतच त्या डब्याजवळ पोहोचले. अभिनेत्याने बॉक्स उघडला. तेव्हा मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडली होती.

त्यानंतर ज्युनियर आर्टिस्टला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला, पण मुलीचा जीव वाचला ही अभिमानाची गोष्ट आहे. पण या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर अशी घटना घडली, ज्याची आठवण करून आजही अमिताभ बच्चन हादरतात.

अमिताभ बच्चन वयाच्या 80 व्या वर्षी त्यांच्या चित्रपटांमध्ये पूर्णपणे एक्टिव आहेत. अमिताभ बच्चन आपल्या दमदार एक्टिंग आणि डायलॉग्सनी आजही चाहत्यांच्या होश उडवतात.

या अभिनेत्याने 1969 मध्ये आलेल्या ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास चालू शकला नाही.

त्यांनतर ‘जंजीर’ हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील मोलाचा ठरला. या चित्रपटानंतर जणू अमिताभ बॉलिवूडचे सुपरस्टार झाले होते. 1989 मध्ये अमिताभ बच्चन यांचा ‘जादूगर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.


हे वाचलंत का ? –

Share