नमस्कार, माहिती लेक मध्ये तुमचे स्वागत आहे, तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या आर्टिकल मध्ये नक्की मिळेल GDP बद्दल जाणून घेण्याआधी आपण बघूया GDP हि संज्ञा कुठून आली ते, मी आधी स्पष्ट करतो. GDP हा शब्द पहिल्यांदा अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ सायमन यांनी 1935-1944 मध्ये वापरला होता. सर्वात आधी सायमन याच अर्थतज्ज्ञाने अमेरिकेला या शब्दाची ओळख करून दिली.
GDP in marathi
हा तो काळ होता, जेव्हा जगातील बँकिंग संस्था आर्थिक विकासाचा अंदाज बांधण्याचे काम हाताळत होत्या, त्यापैकी बहुतेकांना त्यासाठी शब्द सापडत नव्हता. जेव्हा सायमन यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये GDP (जीडीपी) या शब्दाची व्याख्या या शब्दासह केली, तेव्हा IMF म्हणजेच इंटरनेशनल मॉनेटरी फंड यांनी हा शब्द वापरण्यास सुरुवात केली.
GDP चा Full Form “Gross Domestic Product” आहे, यालाच मराठी मध्ये सकल देशांतर्गत उत्पादन असे म्हणतात. GDP ला आपण सविस्तर समजून घेऊया! GDP full form in marathi
ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट (GDP) हे कोणत्याही देशाच्या आर्थिक अर्थव्यवस्था माहिती करण्याचे माध्यम आहे. जीडीपीचा वापर कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोजमाप करण्यासाठी केला जातो. ज्याद्वारे देशाचे एकूण उत्पादन मोजता येते.
भारतातील सकल देशांतर्गत उत्पादनांची गणना 3 महिन्यांत केली जाते. साधारणपणे, GDP एका वर्षाच्या कालावधीत मोजला जातो. जर जीडीपी वाढला तर त्याचा अर्थ देशाची आर्थिक अर्थव्यवस्था सुदृढ आहे आणि जीडीपी कमी होत, असेल तर याचा अर्थ देशाची आर्थिक अर्थव्यवस्था कमकुवत आहे.
हे वाचलंत का? – * INCOME TAX म्हणजे काय? * जीएसटी (GST) म्हणजे काय? |
Gross Domestic Products (ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट)
एखाद्या देशाचा जीडीपी हे त्या सकल देशांतर्गत उत्पादन (Gross Domestic Product) म्हणजेच त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शवित असतो. GDP च्या आकडेवारीवरून आपल्याला कुठल्याही देशाची आर्थिक स्थिती समजू शकते. जीडीपी हि एक प्रकारे विद्यार्थ्याच्या मार्कशीट प्रमाणेच आहे. मार्कशीट वरून जशी विद्यार्थ्यांची वार्षिक प्रगती माहिती होते, त्याच प्रमाणे जीडीपी वरून देशाची वार्षिक आर्थिक परिस्तिथी माहिती होते.
साधारणपणे, GDP हे एका वर्षाच्या कालावधीत मोजला जातो. तसेच देशाची आर्थिक स्थिती दर तीन महिन्यांनी मोजली जाते. कृषी, उद्योग आणि सेवा हे GDP अंतर्गत येतात. जेव्हा या क्षेत्रामध्ये उत्पादन वाढते किव्हा कमी होते. या आधारावर जीडीपीचा दर ठरवला जातो.
भारतात, केंद्रीय सांख्यिकी कार्यालय (CSO) वर्षातून चार वेळा जीडीपीचा अंदाज लावते. म्हणजेच, दर तिमाहीत जीडीपीचे मूल्यांकन केले जाते. दरवर्षी ते वार्षिक GDP वाढीचे आकडे प्रसिद्ध करतात.
जीडीपी चे मूल्यांकन कसे केले जाते?
GDP डेटा आठ क्षेत्रांमधून गोळा केला जातो. यामध्ये कृषी, उत्पादन, वीज, गॅस पुरवठा, खाणकाम, उत्खनन, वनीकरण आणि मत्स्यपालन, हॉटेल, बांधकाम, व्यापार आणि दळणवळण, वित्तपुरवठा, रिअल इस्टेट आणि विमा, बिजनेस सर्विसेज़ आणि कम्युनिटी, सामाजिक आणि सार्वजनिक सेवा यांचा समावेश आहे.
जीडीपी चार महत्त्वाच्या घटकांद्वारे मोजला जातो.
- पहिला घटक म्हणजे ‘उपभोग खर्च’ (कंजम्पशन एक्सपेंडिचर) – वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी लोकांचा एकूण खर्च याला म्हणतात.
- दुसरा घटक म्हणजे ‘सरकारी खर्च’ (गवर्नमेंट एक्सपेंडिचर)
- तिसरा घटक म्हणजे ‘गुंतवणूक खर्च’ (इनवेस्टमेंट एक्सपेंडिचर) आणि
- चौथा घटक म्हणजे सर्वात शेवटी येतो निव्वळ निर्यात (नेट एक्सपोर्ट्स)
जीडीपी नोमिनल आणि वास्तविक (रियल टर्म) मध्ये मोजला जातो. नोमिनल शब्दात, हे सध्याच्या किमतींवरील सर्व वस्तू आणि सेवांचे मूल्य आहे.
जेव्हा हे आधारभूत वर्षाच्या (बेस ईयर) संदर्भात महागाई सापेक्ष मध्ये अड्जस्ट केले जाते, तेव्हा आपल्याला वास्तविक GDP मिळतो. आपण सामान्यतः वास्तविक जीडीपीला अर्थव्यवस्थेची वाढ मानतो. यालाच आपण सूत्राच्या माध्यमातून समजून घेऊया.
जीडीपी कसा काढल्या जातो?
GDP formula
GDP = C + I + G + (X – M)
एकूण देशांतर्गत उत्पादन = खाजगी वापर + एकूण गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात-आयात)
- खाजगी वापर (Consumption)
C म्हणजेच Consumption यालाच मराठी मध्ये खाजगी वापर किव्हा उपभोग असे म्हणतात. यामध्ये देशातील नागरिकांचा वैयक्तिक घरगुती खर्च जसे की- अन्न, भाडे, वैद्यकीय खर्च आणि इतर खर्च समाविष्ट आहेत, परंतु नवीन घराचा समावेश नाही.
- एकूण गुंतवणूक (Investment )
I म्हणजेच Investment, यालाच मराठी मध्ये एकूण गुंतवणूक किव्हा निवेश असे म्हणतात. यामध्ये देशातील सर्व संस्थांनी देशाच्या मर्यादेत केलेल्या एकूण खर्चाची गणना केली जाते.
- सरकारी खर्च (Government Expenses)
G म्हणजेच Government Expenses यालाच मराठी मध्ये सरकारी खर्च असे म्हणतात. यामध्ये देशातील यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, लष्करासाठी शस्त्रास्त्रे खरेदी आणि सरकारकडून गुंतवणुकीचा खर्च समाविष्ट आहे. यात सामाजिक सुरक्षा किंवा बेरोजगारी लाभ यासारख्या कोणत्याही हस्तांतरण खर्चाचा समावेश नाही.
- निर्यात (Export)
E म्हणजेच Export यालाच मराठी मध्ये एकूण निर्यात असे म्हणतात. यामध्ये आपल्या देशाने उत्पादित केलेली रक्कम आहे. यामध्ये इतर राष्ट्रांसाठी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचा समावेश होतो.
- आयात (Import)
M म्हणजेच Import यालाच मराठी मध्ये आयात असे म्हणतात. यामध्ये आयात करण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवांमध्ये त्याच उत्पादनांचा समावेश केला ज्यात उत्पादन हे आपल्या देशाच्या सीमांतर्गत होत नसते. आणि जीडीपीची गणना करताना आयात ही निर्यातीतून वजा केली जाते.
जीडीपी चे प्रकार
1.रिअल जीडीपी (Real GDP)
2.नॉमिनल जीडीपी (Nominal GDP)
1.रिअल जीडीपी Real GDP
रिअल जीडीपी ला नॉमिनल जीडीपी पेक्षा अधिक महत्त्व दिले जाते, कारण ते आपल्याला देशाच्या आर्थिक विकासाची अचूक माहिती देते. वास्तविक GDP मध्ये आधारभूत वर्षाच्या (Base Year) किमती घेऊन GDP ची गणना केली जाते.
रिअल जीडीपी समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया
समजा 2021 मध्ये देशात 50 पुस्तके तयार झाली.
2021मध्ये एका पुस्तकांची किंमत हि 50 रुपये आहे.
समजा त्या देशाच्या सरकारने 2015 हे बेस वर्ष मानले आहे.
आधारभूत वर्षाची ( Base Year ) किंमत (2015) – एका पुस्तकाची किंमत रु.20 होती . साहजिकच, 2015 मध्ये पुस्तकांची किंमत कमी होती.
आता आपण त्या देशाच्या जीडीपीची गणना करण्यासाठी एका सूत्राचा वापर करू
रिअल जीडीपी (GDP ) = उत्पादन (2021) × बेस वर्षाचे मूल्य (2015)
जर आपल्याला एखाद्या देशाचा खरा GDP शोधायचा असेल, तर उत्पादन संख्याने बेस वर्षाचे मूल्याला गुणाकार करायचा
GDP = 50 × 20 = 1000
GDP = 1000
त्या देशाचा जीडीपी 1000 आहे.
(सूचना – उदाहरणामध्ये अंदाजे किमती घेतल्या आहे. रिअल जीडीपी (GDP ) मोजण्यासाठी 2015 च्या किंमती वापरल्या, 2021 च्या किमती नाहीत.)
२.नॉमिनल जीडीपी (Nominal GDP)
नॉमिनल जीडीपी वर्तमान बाजारभावानुसार मोजला जातो. यासाठी पण आपण एक उदाहरण बघूया!
समजा 2021 मध्ये एका देशात 30 पुस्तके बनवले आहेत.
त्या पुस्तकांची किंमत 2021 मध्ये 50 रुपये आहे.
नॉमिनल जीडीपी मिळवण्यासाठी आता किमतींनी उत्पादनाला गुणाकार करू.
GDP = 30 × 50 = 1500
GDP = 1500
जीडीपी चे महत्त्व
- जीडीपीवरून आपण कोणत्याही देशाच्या आर्थिक वाढीचा अंदाज लावू शकतो.
- जीडीपी वापर गुंतवणूकदार देशामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी करतात. जेणेकरून त्यांना चांगला नफा मिळू शकेल.
- जीडीपी हा एक पॅरामीटर आहे ज्यातून आपल्याला रोजगार, उत्पादन, मागणी याबद्दल बरीच माहिती मिळते.
- जीडीपी देखील उत्पादन वाढ दर्शवते. त्यामुळे देशातील रोजगाराबाबत बरीच माहिती मिळते.
- जीडीपीचा वापर दुसऱ्या देशाच्या आर्थिक वाढीची तुलना करण्यासाठी देखील केला जातो.
भारताचा GDP किती आहे
स्थिर स्थानिक चलनाच्या आधारे बाजारभावांवर GDP चा वार्षिक टक्केवारी वाढीचा दर. एकूण 2010 यूएस डॉलरवर आधारित आहेत. जीडीपी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सर्व निवासी उत्पादकांनी जोडलेल्या एकूण मूल्याची बेरीज तसेच कोणतेही उत्पादन कर आणि उत्पादनांच्या मूल्यामध्ये समाविष्ट नसलेली कोणतीही सबसिडी वजा.
- 2020 साठी भारताचा जीडीपी विकास दर -7.96% होता, 2019 च्या तुलनेत 12.01% घसरण.
- 2019 साठी भारताचा जीडीपी वाढीचा दर 4.04% होता, 2018 च्या तुलनेत 2.49% घसरण.
- 2018 साठी भारताचा जीडीपी वाढीचा दर 6.53% होता, जो 2017 च्या तुलनेत 0.26% कमी आहे.
- 2017 साठी भारताचा जीडीपी विकास दर 6.80% होता, 2016 च्या तुलनेत 1.46% घसरण.
जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था (Largest economies in the world)
Rank | Country | GDP in billion $ | GDP in $ per capita |
1 | अमेरिका | 23,315.1 | 70,249 |
2 | चीन | 17,820.5 | 12,618 |
3 | जपान | 5,005.5 | 39,827 |
4 | जर्मनी | 4,259.9 | 51,204 |
5 | भारत | 3,150.3 | 2,238 |
6 | इंग्लंड | 3,122.5 | 46,378 |
7 | फ्रान्स | 2,957.9 | 43,659 |
8 | इटली | 2,114.4 | 35,770 |
9 | कॅनडा | 2,001.5 | 52,332 |
10 | रशिया | 1,836.9 | 12,805 |
जीडीपी बद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)
Q.1 जीडीपी म्हणजे काय?
Ans- सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) हे एका विशिष्ट कालावधीत देशामध्ये उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे एकूण आर्थिक किंवा बाजार मूल्य म्हणजेच जीडीपी असे म्हणतात.
Q.2 GDP मोजण्याचे सूत्र काय आहे?
GDP = C + I + G + (X – M)
एकूण देशांतर्गत उत्पादन = खाजगी वापर + एकूण गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात-आयात)
Q.3 जीडीपी चे प्रकार कुठले?
Ans- एकूण देशांतर्गत उत्पादनांचे दोन प्रकार आहेत. पहिला रिअल जीडीपी आणि दुसरा नॉमिनल जीडीपी.
Q.4 GDP कोण मोजतो?
Ans- केंद्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) जीडीपीची गणना करतो.
Q.5 GDP किती वर्षात मोजला जातो?
Ans- जीडीपीची गणना एका वर्षात केली जाते आणि भारतातील जीडीपी तीन महिन्यांत मोजला जातो.
Q.6 GDP (एकूण देशांतर्गत उत्पादने) हा शब्द पहिल्यांदा कधी वापरला गेला?
Ans- GDP हा शब्द पहिल्यांदा अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ सायमन यांनी 1935-1944 मध्ये वापरला होता.
- सागर राऊत
माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.