स्वार्थी लोक ओळखायचे ६ जबरदस्त लक्षणे

selfish in marathi

स्वार्थी लोक

समाजामध्ये दुसरा, तिसरा व्यक्ती सोडला. तर शक्यतो सर्वात जास्त लोकांच्या बोलण्यातून एक शब्द सारखा ऐकायला मिळतो.

तो म्हणजे स्वार्थी..!

मला तरी अस वाटतं स्वार्थी म्हणजे काय? हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही.

सर्वानाच आपल्या जीवनात एखाद्या तरी स्वार्थी व्यक्तीचा अनुभव आलेला असतो. तसे तर हे सर्व जगच स्वार्थानं भरून पडलेले आहे.

तुम्ही हे आर्टिकल वाचत आहात? यात काय तुमचे स्वार्थ दडलेला नाही..? उत्तर हो असणार… कारण तुम्हाला स्वार्थी लोक कसे असतात हे जाणून घ्यायचे आहे.

म्हणूनच तुम्ही हे आर्टिकल वाचत आहात. स्वार्थी तुम्ही आहात! स्वार्थी मी पण आहे! स्वार्थी सर्वच लोक असतात. परंतु स्वार्थ हे दोन प्रकारचे असतात.

पहिला म्हणजे ज्यामुळे आपला हेतू किव्हा स्वार्थ साध्य होतो. परंतु त्यामधून दुसऱ्याचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही. तसा स्वार्थ!

आणि दुसरा म्हणजे ज्यात आपला स्वार्थ साध्य होण्यासाठी दुसऱ्याचे नुकसान जरी होत, असेल तरी त्या गोष्टीचा विचार न करता तसे करणे हा होय.

तुम्ही या दोन्ही मधील कुठले स्वार्थी आहात? आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा.!

नमस्कार मित्रांनो, माहिती लेक मध्ये तुमचे मनपुर्वक स्वागत आहे.

जेव्हा आपला एखादा मित्र, किव्हा नातेवाईक हे आपला उपयोग करून त्यांचे काम करून घेतो आणि त्याचा तो स्वार्थ आपल्यावर भारी पडतो. तेव्हा खूप वेळ झालेली असते.

त्यावेळेस तुमच्या मनात एक वाक्य नेहमी येते. हा इतका स्वार्थी असेल, अस मला वाटले नव्हते. मला जर आधी माहिती असत. हा असा आहे. तर मी त्याच्या पासून दूर राहिलो असतो.

परंतु तो पर्यंत ती वेळ निघून गेलेली असते.

आपण या आर्टिकल मध्ये तेच समजून घेणार आहोत की अशी स्वार्थी, सेल्फीश व्यक्ती कशी ओळखायची. चला तर बघूया…!

१) तुम्ही एखाद्या व्यक्तीला सारखी मदत करता. आणि एक दिवस अचानक तुम्हाला जर काही अडचण आली आणि तुम्हाला त्या व्यक्तीची मदत हवी असल्यास ते तुम्हाला कुठलेही कारण सांगून तो प्रसंग टाळतात.

समजून घ्या. की असा व्यक्ती स्वार्थी आहे आणि त्याच्या जवळ कारणांचा खजिना आहे. त्यावर तुम्ही कशीच मात करूच शकत नाही. तो व्यक्ती तुम्हाला असे काही कारण शोधून सांगेल की, त्या समोर तुम्ही नक्की गुडघे टेकवाल.

२) स्वार्थी असलेला व्यक्ती स्वतःच काही प्लॅन करेल आणि स्वतःच तो प्लॅन रद्द करेल. कारण त्यात तुमचा निर्णय असऱ्यांनासण्याचा काहीच प्रश्न नसतो. कारण तो व्यक्ती स्वार्थी आहे. तो फक्त त्याचाच स्वार्थ बघेल.

३) स्वार्थी व्यक्तीने घेतला निर्णय हा त्यांचा फायनल निर्णय असतो. त्यात ते तळजोळ अजिबात सहन करत नाही. हे करायचे म्हणजे, हेच करायचे यावर त्यांचा दृढ विश्वास असतो. कारण तो व्यक्ती स्वार्थी असतो.

४) तुम्हाला वरवर ओळखणारा व्यक्ती अचानक तुमची चापलुसी करायला लागतो. किव्हा तुम्हाला अचानक सम्मान द्यायला लागतो. तेव्हा समजून घ्या. तुमच्यात त्याला बकरा दिसला आहे आणि तो तुम्हाला कापण्याच्या तयारीत आलेला आहे. त्याचे तुमच्या कडे काही तरी नक्की काम आहे. शक्यतो त्याला बळी पळू नका.

५) स्वार्थी व्यक्ती हे चुगलखोर स्वभावाचे असतात. याच त्याला त्याच याला सांगत फिरणे हे त्यांचे दैनंदिन बिनपगारी काम असते. असा जर व्यक्ती तुमच्या संपर्कात असेल. तर त्या पासून लांब राहणेच योग्य. कारण अशी व्यक्ती त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी तुमच्या पण काही गोष्टी दिसर्या व्यक्तीला नक्कीच सांगू शकतो.

६) तुमच्या मित्रानं मध्ये असे काही नमुने नक्कीच असणार जे तुम्हाला असे म्हणून पैसे उधार मागतील. की तुमच्या कडून जर पैसे मिळालेच नाही तर त्यांचे कामच होणार नाही.

उदाहरणार्थ ते नमुने म्हणजेच मित्र तुम्हाला म्हणतील की, अरे यार मला 100 किव्हा 500 रुपयेच कमी पडले प्लीज मला दे नाहीतर माझ काम राहील…!

असे कारण देऊन माझ्या जवळून 200 ते 100 घेऊन जाणारे 7 ते 8 मित्र आहेत. मी त्यांना 200 रुपय वाली गॅंग असे म्हणतो.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. या आर्टिकल चा इतरांना फायदा व्हावा असे वाटत असल्यास मित्रानं मध्ये नक्की शेअर करायला विसरू नका.

तसेच शक्य असल्यास तुमच्या स्वार्थी मित्रांना हे आर्टिकल आवर्जून शेअर करा. या माध्यमातून त्यांच्यात थोडा जरी प्रकाश पडला तर धन्य. आणि अश्याच प्रकारच्या माहिती वाचण्यासाठी माहिती लेक ला अवश्य भेट द्या. मी सागर राऊत परत भेटूया एका नवीन विषयावर
धन्यवाद..!

  • सागर राऊत


हे वाचलंत का? –

Share