हॉटेलमध्ये बेड वर पांढऱ्या चादरी का घालतात? रहस्य जाणून थक्क व्हाल!

White Bed Sheets for Hotels

White Bed Sheets for Hotels : तुम्ही जर हॉटेल्स मध्ये जात तर तुमच्या लक्षात आले असेल, की सर्व लक्झरी हॉटेल्स त्यांच्या खोल्यांमध्ये बेड शिट (बेड चादर) हि रंगीत चादरी ऐवजी पांढऱ्या रंगाच्या चादरी वापरतात. अगदी बजेट हॉटेल देखील या प्रकरणात अपवाद राहिलेले नाही. हॉटेल्समध्ये बेडवर पांढरी चादर का पसरवली जाते, हे तुम्हाला माहीत आहे का?

हॉटेल उद्योगातील तज्ञ आणि इंटिरियर डिझायनर्सच्या मते हॉटेलच्या खोल्यांसाठी पांढरा रंगाची चादरी निवडण्यामागचे काही प्रमुख कारणे आहेत. चला ते जाणून घेऊया.

हॉटेलच्या खोल्यांसाठी पांढरी चादर निवडण्याची कारणे

१) सकारात्मक वातावरण (पॉजिटिव वाइब)

पांढरा रंग हा शांतता आणि सकारात्मकतेचा रंग आहे. खोलीत राहताना तुमच्या भेटीचा उद्देश काहीही असो, तुम्हाला शांत, निवांत आणि सकारात्मक वाटले पाहिजे. हॉटेल उद्योग तुम्हाला शांत आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करण्यासाठी आणि तुम्हाला आराम आणि आनंदी वाटण्यासाठी बेडशीटसाठी पांढरा रंग निवडतात.

२) स्वच्छ करणे सोपे

पांढरा रंगात डाग लपवत नसल्यामुळे, पांढऱ्या रंगाच्या चादरी स्वच्छ करणे सोपे आहे. रंगीत बेडशीटपेक्षा हे स्वच्छ करणे आणि धुणे सोपे आहे कारण आपण डाग स्पष्टपणे पाहू शकतो आणि साफसफाईच्या वॉशिंग पावडर तसेच साबणाने ते काढून टाकल्या जाते.

३) लक्झरी अनुभव

पांढरा हा केवळ शांतीचा रंग नाही. ते चैनीचेही प्रतीक आहे. स्वच्छ पांढर्‍या बेडशीट असलेली हॉटेलची खोली आलिशान दिसते. तसेच पांढऱ्या रंगाच्या चादरींना रंगीत चादरींच्या तुलनेत जास्त देखभालीची आवश्यकता असते. त्यामुळे, तुम्हाला लक्झरी आणि ऐश्वर्याचा अनुभव देण्यासाठी हॉटेल या खोल्या मध्ये सरार्स वापरल्या जातात.

४) अतिथींना सतर्क ठेवते

पांढरा रंग वापरला जातो कारण तो कोणताही डाग लपवत नाही. म्हणून, पाहुणे त्यांच्या हॉटेलच्या खोलीच्या बेडवर जेवताना किंवा इतर कोणतीही कामे करताना सावध गिरी बाळगतात. ते बेड वापरताना निष्काळजीपणा टाळतात.

५) ताजेपणाचा अनुभव येतो

अनेकदा आपल्या घरच्या बेडरूममध्ये रंगीबेरंगी चादरी असतात. याउलट हॉटेल्स पांढऱ्या रंगाचे चादरी वापरतात, ज्यामुळे ते आपल्या घरातील बेडरूमपेक्षा वेगळे असतात. म्हणून, प्रत्येक वेळी तुम्ही हॉटेलच्या खोलीत प्रवेश करता. तेव्हा तुम्ही ताजेपणाचा आनंद घेऊ शकता. तसेच पांढरी बेडशीट तुमचा तणाव दूर ठेवते आणि तुम्ही शांत झोपेचा आनंद घेऊ शकता.


हे वाचलंत का ? –

Share