चक्क, ट्विटरचा ब्लू बर्ड ऐवजी कुत्याच्या लोगो ने घेतली जागा.!

twitter logo change

twitter logo change

आत्ता ची सर्वात मोठी बातमी ट्विटरचा ब्लू बर्ड (Blue Bird of Twitter) आता उडून गेला असून, त्याची जागा कुत्र्याने (Doge) ने घेतली आहे.

ट्विटरवर दिसणारा नवा लोगो आणि इलॉन मस्कचे ट्विट पाहून, सोमवारी रात्री ट्विटर यूजर ट्विटरवर दिसणाऱ्या ब्लू बर्ड ऐवजी कुत्र्याचा लोगो पाहिल्यानंतर ते गोंधळून गेले. त्यानंतर काही वेळातच ट्विटरवर युजर्सच्या ट्विटचा सपाटा चालू केला.

त्यामुळे #DOGE ने ट्विटरवर तसेच सोशल मेडीयावर तूफान ट्रेंडिंग सुरू केले आहे. ट्विटरच्या लोगोमध्ये प्रत्येकाला कुत्रा दिसला का, असे लोक एकमेकांना विचारत होते. जर लोगो बराच काळ तसाच राहिला तर यूजर ला वाटले, की मस्कने खरोखरच ट्विटर लोगो बदलला आहे?

इलॉन मस्क यांनी स्वतः ट्विट केले आहे.!

इलॉन मस्कचे रात्री खूप उशिरा ट्विट केले. तेव्हा यूजर ला समजले की, ट्विटर हॅक झाले नसून, ते स्वतः ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांचा चेंज केले आहे.

मस्कने एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये कारच्या ड्रायव्हिंग सीटवर कुत्रा बसला होता. आणि ट्रॅफिक पोलिसाच्या हातात एक परवाना होता, त्यावर ब्लू बर्डचा (निळा पक्षी ) फोटो होता.

डॉग चा फोटो च्या या पोस्टवरून मस्कने ट्विटरचा लोगो बदलल्याचे दिसते. आता ट्विटरवर ब्लू बर्डचा (निळा पक्षी) डॉग दिसणार आहे. सोमवारी सकाळी इलॉन मस्क यांनीही अशीच पोस्ट केली होती.

फेब्रुवारीतही सूचना देण्यात आल्या होत्या.!

इलॉन मस्क यांनी फेब्रुवारीमध्ये एक ट्विट केले होते. या पोस्टमध्ये सीईओच्या खुर्चीवर एक कुत्रा बसला होता. फ्लोकी असे या कुत्र्याचे नाव आहे. हा शिबा इनू जातीचा कुत्रा आहे. मस्कने पोस्टमध्ये लिहिले की, ट्विटरचे नवे सीईओ अप्रतिम आहेत. नंतर च्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले, की ते इतर लोकांपेक्षा खूप चांगले आहे.

डॉगकॉइन 20% वाढले.!

ट्विटरने आपल्या वेबसाइट आणि मोबाइल ब्राउझरवर लोगो बदलल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात पॉप्युलर क्रिप्टो डोगेकॉइनच्या किंमतीत 20 टक्क्यांनी वाढ झाली.

Dogecoin हे MemeCoin म्हणूनही ओळखले जाते. एलोन मस्क बर्याच काळापासून डॉगेकॉइनचा प्रचार करत आहेत. त्याच्या ट्विटचा या क्रिप्टोकरन्सीच्या किमतीवर मोठा प्रभाव पडला आहे.


हे वाचलंत का ? –

Leave a Comment