टूना मासा खाण्याचे ६ आश्चर्यजनक फायदे | Tuna Fish in Marathi

आपल्या शरीराला वेळोवेळी योग्य पोषण मिळणे खूप महत्वाचे आहे. असे न झाल्यास आपण अनेक आजारांच्या विळख्यात सापडू शकतो. त्यामुळे आपल्या आहारात शाकाहारी अन्नासोबत मांसाहारी पदार्थांचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. आता तुम्हाला विचार पडला असेल की, मांसाहारात कोणते पदार्थ समाविष्ट करावेत, की जेणे करून आपले शरीर निरोगी राहील.

अनेक पदार्थ आहेत ज्यांचा तुम्ही तुमच्या मांसाहारी आहारात समावेश करू शकता. या सर्व मांसाहारी पदार्थांमध्ये मासे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. बाजारात अनेक प्रकारचे मासे उपलब्ध आहेत. पण आज मी तुम्हाला ‘टूना‘ माश्या बद्दल सांगणार आहे. टूना फिशचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत? हे जाणून घेण्यापूर्वी, टूना मासा काय आहे? हे समजून घेऊया.!

हे वाचलंत का? –
* मासे पाण्याखाली कसे श्वास घेतात?
* सॅल्मन फिश खाण्याचे आश्चर्यकारक फायदे तसेच नुकसान

टूना माश्या बद्दल माहिती

tuna in marathi

tuna in marathi


टूना फिश म्हणजे काय? – Tuna Fish in Marathi

टूना फिश हा एक खास प्रकारचा मासा आहे, ज्याला टन्नी (Tunny) असे देखील म्हणतात. टूना मासा ‘थुन्निनी’ या माशांच्या प्रजातीचा आहे. त्याच्या अनेक प्रजाती आपल्याला जगभरात पाहायला मिळतात. टूना माशाचा आकार इतर माशांपेक्षा थोडा वेगळा असतो. हे मासे खाऱ्या पाण्यात आढळतात.

असे म्हणतात कि, टूना फिशच्या काही प्रजाती 40 ते 50 वर्षांपर्यंत जगतात. तसेच, टूना फिश हे वेगवेगळ्या आकारात आढळतात. टूना माशाची लांबी 1 फूट ते 15 फूट पर्यंत राहते. टूना माशात इतर माशांपेक्षा पारा जास्त असतो. या माशात ओमेगा ३ आणि व्हिटॅमिन बी देखील असतो. जे आरोग्यासाठी फायदेशीर राहत. टूना मासा हे वजन कमी करण्यास, हृदयविकाराचा धोका कमी करण्यास आणि रक्त कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करू शकतो.

टूना फिश खायला खूप चविष्ट असतात, तसेच टूना मासा आपल्या शरीरासाठी देखील फायदेशीर आहे. जे आपल्याला अनेक आजारांपासून वाचवण्याचे काम करते.

कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, सोडियम, प्रोटीन, आयर्न, फोलेट, व्हिटॅमिन डी, नियासिन आणि ऊर्जा यांसारखी अनेक पोषक तत्त्वे टूना माशांमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात.


टूना फिश मधील पौष्टिक घटक

पोषक तत्वमात्रा
पानी (water)74 ग्रॅम
ऊर्जा (Energy)109 कि. कैलोरी
प्रथिने (Protein)24.4 ग्रॅम
कॅल्शियम (calcium)4 मिग्रॅ
मॅग्नेशियम (Magnesium)35 मिग्रॅ
चरबी (fat)0.49 ग्रॅम
फॉस्फरस (Phosphorus)278 मिग्रॅ
लोह (Iron)0.77 मिग्रॅ
पोटॅशियम (Potassium)441 मिग्रॅ
सोडियम (sodium)45 मिग्रॅ
जस्त (Zinc)0.37 मिग्रॅ
फोलेट (folate)2 यूजी
व्हिटॅमिन-बी (Vitamin-B)6 0.933 मिग्रॅ
नियासिन (Niacin)18.475 मिग्रॅ
रिबोफ्लेविन (Riboflavin)0.115 मिग्रॅ
थायमिन (Thiamine)0.118 मिग्रॅ
व्हिटॅमिन ए (Vitamin A)18 यूजी
व्हिटॅमिन ई (Vitamin E)0.24 मिलीग्राम
व्हिटॅमिन डी (Vitamin D)69 आइयू
फॅटी ऍसिडस् (Fatty Acids)0.172 ग्राम

Chart Refer – fdc.nal.usda.gov


tuna fish in marathi

tuna fish in marathi

टूना मासा खाण्याचे फायदे

आहारात टूना फिशचा समावेश करणे हे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. टूना मासा अनेक शारीरिक समस्यांचे परिणाम आणि लक्षणे कमी करण्यास मदत करू शकते. परंतु कोणत्याही रोगावर तो अचूक उपचार नाही. हे लक्ष्यात असणे गरजेचे आहे.

डोळ्यांसाठी फायदेशीर

डोळे निरोगी ठेवण्यासाठी माशांचे सेवन फायदेशीर मानले जाते. त्या माशांच्या यादीत टूनाचेही नाव आहे. माश्यांमध्ये, विशेषत: टूना मासा हे वय-संबंधित मॅक्युलर डिजेनेरेशन सारख्या वृद्धत्वाच्या डोळ्यांच्या आजारांवर सकारात्मक परिणाम करू शकतो.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही टूना फिशचे सेवन करू शकता. तुम्ही तुमच्या आहारात फिश ऑइलचाही समावेश करू शकता. एका संशोधनात सांगण्यात आले आहे कि, यामुळे पोटाची चरबी कमी होते. तसेच तुम्ही तुमच्या त्वचेच्या वरच्या भागासाठी फिश ऑइल देखील वापरू शकता.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो

आपल्या शरीरातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती. जे आपल्याला आजारांपासून वाचवण्याचे काम करते. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल, तर कोणताही आजार आपल्या सहज होत नाही. पण तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात टूना फिशचा समावेश करू शकता. हा मासा आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो. कारण टूना माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड आढळते.

हाडे मजबूत करतो

आपल्या हाडांना कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-डी ची सर्वाधिक गरज असते. कारण ही पोषकतत्त्वे आपली हाडे मजबूत ठेवण्याचे काम करतात. तसेच कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-डी आपली हाडे बनवण्याचे काम करतात. हाडांचे आजार आणि फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. टूना फिशमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. म्हणून तुम्ही तुमच्या आहारात टूना फिशचा समावेश करू शकता.

हृदयासाठी फायदेशीर

टूना फिशचे सेवन आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हृदयरोगींना अनेकदा मासे खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड असते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. म्हणूनच तुम्ही टूना फिशचे सेवन करू शकता.

गर्भवती महिलांसाठी फायदेशीर

ट्यूना फिशचे सेवन गर्भवती आणि बाळासाठी फायदेशीर असल्याचे एका संशोधनात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. टूना फिशमध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिड असते, जे गर्भवती महिलांना हृदयविकाराच्या जोखमीपासून वाचवण्यास मदत करते. हे गर्भाच्या मेंदू आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या विकासासाठी देखील उपयुक्त ठरू शकते.


टूना मासा खाण्याचे तोटे

ज्याप्रमाणे टूना मासे खाण्याचे फायदे आहेत. त्याचप्रमाणे टूना माशांचे तोटे देखील आहेत. त्यातील एक म्हणजे लहान माश्यांच्या प्रमाणात मोठ्या माश्यांमध्ये पारा जास्त असतो. पारा असलेले मासे गर्भधारणेदरम्यान आणि जन्मानंतर बाळाच्या मेंदूचा आणि मज्जासंस्थेच्या विकासात अडथळा आणू शकतात.

गरोदरपणात मासे खाल्ल्याने फायदे होतात यात काही शंका नाही, परंतु काही प्रकरणांमध्ये ते हानिकारक असू शकतात. अशा परिस्थितीत, गर्भवती महिलेने मासे खाण्यापूर्वी डॉक्टरांचासल्ला घेणे आवश्यक आहे.


टूना माश्या बद्दल विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

Q.1 – दररोज टूना मासे खाऊ शकतो का?

Ans – होय, एका संशोधनात दररोज सुमारे 250 मिलीग्राम ट्यूना फिश खाण्याची शिफारस केली आहे. प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य आणि अन्न खाण्याची क्षमता हि वेगवेगळी असते. त्याकरिता संबंधित विशिष्ट माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Q.2 – टूना फिश खाल्ल्याने वजन वाढू शकते का?

Ans- नाही, टूना फिश मध्ये लठ्ठपणाविरोधी गुणधर्म आहेत, त्यामुळे त्याच्या सेवनाने वजन वाढणार नाही. परंतु मसालायुक्त टूना मासे जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते.

Q.3 – टूना फिश खाणे त्वचेसाठी चांगले आहे का?

Ans- होय, टूनामध्ये असलेले फॅटी ऍसिड त्वचेची लवचिकता वाढविण्यात, ती चमकण्यास आणि आर्द्रता प्रदान करण्यात मदत करते. अशा परिस्थितीत टूनाचे सेवन त्वचेसाठी चांगले असू शकते.

Q.4 -टूना मासा कुठे आढळतो?

Ans – टूना मासा खाऱ्या पाण्याच्या महासागरात आढळतो.

निष्कर्ष

आपण सवजण स्वतःला पौस्टिक आहार मिळावा म्हणून विचार करतो. तर टूना मासा खाणे हे एक उत्तम उदाहरण आहे. टूना मासा खाण्यासाठी अधिक आरोग्यदायी तसेच स्वादिष्ट बनवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. टूना हा एक मासा आहे जो कि, कच्चा देखील खाऊ शकतो आणि हे त्याचे सर्व पोषक मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

इतरही पद्धती आहेत. जसे की ग्रिलिंग करणे, त्यामध्ये इतर पौष्टिक घटक जोडणे इ. हे असे अन्न आहे ज्यामध्ये फारच कमी चरबी असते. यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते, जे हृदयासाठी चांगले मानले जाते.

हे तुमचा रक्तदाब सुरळीत ठेवण्यात मदत करते, तुमची हाडे मजबूत करते, वजन कमी करण्यास मदत करते, तसेच तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि तुम्हाला भरपूर प्रमाणात ऊर्जा देते. जर तुम्ही डाएट करत असाल, तर तुम्ही तुमच्या डाएट चार्टमध्ये टूना चा समावेश केलाच पाहिजे.

  • सागर राऊत

📢 महत्वाची सूचना – हे आर्टिकल तुम्हाला टूना फिश (tuna fish in marathi) बद्दल माहिती देणे असल्याकारणाने टूना फिशचा वापर आरोग्याच्या हेतूने करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा आहे. इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल. धन्यवाद… 😊

❌ माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share