स्टॅम्प पेपर विकत घेतांना, घ्या काळजी.!

Stamp Paper new rules 2023

stamp duty in maharashtra

stamp duty in maharashtra

स्टॅम्प पेपर विकत घेतांना घ्या काळजी.!

नमस्कार शेतकरी मित्रांनो…आज आपण कोणतेही सरकारी काम करण्यासाठी किंवा आपले काही व्यवहार करण्यासाठी स्टॅम्प पेपर चा वापर करतो.

ते मग घर शेत खरेदी असो किंवा न्यायालयीन काम किंवा बँक चे व्यवहार या सर्व कामांसाठी आपण बरेच दा स्टॅम्प पेपर वापरतो. आणि अनेकवेळा हा स्टॅम्प 100, 500, 1000 रुपयाचा होतो.

बरेच लोक स्टॅम्प पेपर च्या विश्वासावर आपली कोणती गोष्ट विकतात किंवा विकत घेतात. या स्टॅम्प पेपर च्या व्यवहारावर लोकांना खूप विश्वास झालेला आहे.

आता सरकार नी स्टॅम्प पेपर संबंधित काही नवीन नियम लागू केले आहेत.

स्टॅम्प पेपर संबंधित काही नवीन नियम

या नवीन स्टॅम्प पेपर नियमा नुसार आपण जेव्हा स्टॅम्प विकत घ्यायला जात होतो, तर ज्या सदर व्यक्ती च्या नावे स्टॅम्प आपल्याला घ्यायचा आहे.

तो हजार नसल्यास आपण हस्ते असे वापरून स्टॅम्प घेवू शकत होतो. परंतु आता ही सुविधा पूर्णतहा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

आता ज्या व्यक्तीच्या नावे स्टॅम्प विकत घ्यायचा आहे. त्या वक्तीला स्वतः स्टॅम्प विकत घ्यायला जावें लागणार आहे आणि आता या करिता आपले ओळखपत्र लागणार आहे.

नवीन स्टॅम्प पेपर नियमा नुसार हस्ते स्टॅम्प पेपर ही सुविधा बंद करण्यात आली आहे.

त्यामुळे आपण आता हस्ते स्टॅम्प पेपर विकत घेवू शकणार नाही. स्टॅम्प पेपर वाल्याला 100, 200 रुपये देवून व्यक्ती हजर नसल्यास त्या व्यक्ती च्या नावे स्टॅम्प विकत घ्यायचा नाही. या करिता तुमच्या वर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

स्टॅम्प पेपरची वैधता किती दिवस राहते. (Stamp Validity)

बऱ्याच लोकांना हा प्रश्न राहतो. जेव्हा ते स्टॅम्प संबधित कोणते व्यवहार करतात. स्टॅम्प ची validity किती दिवसांनी संपते. बऱ्याच लोकांचं हे मत आहे, की स्टॅम्प हा काही दिवसांनी निरस्त होवून जातो.

मित्रांनो ही गोष्ट चुकीची आहे. स्टॅम्प हा आयुष्यभर आणि तुमच्या आयुष्यानंतर सुद्धा validate राहतो.

भारतीय स्टॅम्प नियम 1899 नुसार तुम्ही जर स्टॅम्प विकत घेतला असेल आणि तो स्टॅम्प तुम्ही वापरला नाही तसेच तुम्हाला त्याची गरज भासली नाही, तर तुम्ही त्या स्टॅम्प ला सहा महिन्यांत परत करू शकता व आपले पैसे परत घेवू शकता.

जुन्या तारखी मधील स्टॅम्प मिळू शकतो का?

नाही..! कधीच नाही तुम्ही कधीच मागील तारखेचा स्टॅम्प विकत घेवु शकत नाही. हे पूर्णतः illegal आहे. स्टॅम्प विक्रेता कधीच तुम्हाला मागील जुन्या तारखेचा स्टॅम्प देणार नाही.

स्टॅम्प विक्रेत्याला या सर्व विकलेल्या स्टॅम्प ची सर्व माहिती सरकार ला पुरवावी लागते. म्हणून कधीच मागील तारखेतील स्टॅम्प विकत घ्यायचा प्रयत्न करू नका.

आम्ही अश्याच प्रकारची माहिती नेहमी या ब्लॉग वर देत राहतो. ही माहिती आपण आपल्या WhatsApp वर मिळवू शकता अगदी मोफत त्याकरिता आमचा व्हॉट्स ग्रूप जॉईन करा.


हे वाचलंत का ? –

Share