सोलर रूफटॉप सब्सिडी योजना अप्लिकेशन सुरु, मिळणार जास्त फायदा

सोलर रूफटॉप योजना म्हणजे काय?

सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, सरकारला तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवायचे आहेत, जेणेकरून तुम्ही स्वतःची वीज स्वतः निर्माण करू शकाल. यामुळे तुमचे वीज बिल खूपच कमी होईल, किव्हा झिरो होईल तसेच तुम्ही सरकारला जास्तीची वीज देखील विकू शकाल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच सरकार ४० ते ५० टक्के अनुदान देत आहे.

विजेचे वाढते दर आणि दरमहा येणारे मोठे बिल आता प्रत्येक सामान्य कुटुंबासाठी चिंतेचा विषय बनले आहे. उन्हाळ्यात वीज मीटर हे तर रॉकेट झालेले आहे. उन्हाळ्यात आपण मनसोक्त एसी, कूलर, पंखे – सर्वकाही चालवतो आणि नंतर बिल आल्यावर तुम्हाला धक्का बसतो. अशा परिस्थितीत, सरकारची एक नवीन योजना सुटकेचा निःश्वास टाकणारी आली आहे म्हणजेच सोलर रूफटॉप सबसिडी योजना

सरकार म्हणत आहे की, जर तुमच्या घराचे छत रिकामे असेल आणि तुम्हाला दरमहा वीज बिलाचा त्रास होत असेल, तर आता सौरऊर्जेचा वापर करण्याची वेळ आली आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सरकार यावर मोठी सबसिडी देखील देत आहे.

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते?

जर तुम्ही भारतीय नागरिक असाल आणि तुमचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असेल, तसेच इलेक्ट्रिक बिल तुमच्या नावाने असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. तुमच्या घराचे छत थोडेसे मोकळे असणे गरजेचे आहे जेणेकरून सूर्यप्रकाश थेट पॅनल वर पडेल. एक किलोवॅट सौर सिस्टीम साठी सुमारे १० चौरस मीटर जागा आवश्यक आहे.

किती अनुदान मिळेल?

सरकार सौर सिस्टीम क्षमतेनुसार अनुदान देते.
१ किलोवॅट – ३० हजार
२ किलोवॅट – ६० हजार
३ किलोवॅट ते १० किलोवॅट – ७८००० अनुदान

भविष्यात अधिक फायदे

टेक्नोलॉजी जस जशी, वाढत चाललेली आहे त्याच प्रमाणे सौर पॅनेल स्वस्त होतील आणि अधिक ऊर्जा देतील. जर येत्या काळात भारत सौर केंद्र बनला तर सामान्य लोकांना त्याचा थेट फायदा मिळेल. यामुळेच सरकार आता प्रत्येक घराला सौर ऊर्जेकडे घेऊन जाऊ इच्छित आहे.

जर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल, तर उशीर करू नका. ही योजना मर्यादित काळासाठी आहे आणि लवकरात लवकर सोलर लावणाऱ्यांना आधी प्राधान्यदिली जात आहे. जर तुमच्या घरात जागा असेल आणि तुम्हाला मासिक वीज बिलाचा त्रास होत असेल, तर आजच अर्ज करा.

सोलर ऊर्जेचा काय फायदे आहेत?

१) दरमहा वीज बिलात मोठी बचत (७०-८०% ने कमी करता येते)

२) जादा वीज ग्रिडला विकून पैसे कमवा.

३) पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही.

४) २५ वर्षांपर्यंत पॅनल वॉरंटी – म्हणजे एकदा बसवल्यानंतर, तुम्ही २ दशकांपर्यंत तणावमुक्त राहाल.

५) वीज कपातीची कोणतीही समस्या येणार नाही कारण तुमच्याकडे स्वतःची वीज असेल.

ज्या गावांमध्ये वीज कपात सामान्य आहे, तिथे हे सौर पॅनल वरदान ठरत आहेत. शाळा, रुग्णालये, लघु उद्योग – आता सर्वत्र सोलर ऊर्जेचा वापर सुरू झाला आहे. यासोबतच, सोलर इंस्टॉलेशन संबंधित नोकऱ्या देखील वाढत आहेत, ज्यामुळे तरुणांना रोजगार मिळत आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?

१) संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन झाली आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही.

२) https://solarrooftop.gov.in/ या संकेत स्थळावर वर जा.

३) तुमचा मोबाईल नंबर आणि वीज कनेक्शन ग्राहक नंबर एंटर करा.

४) OTP वापरून लॉगिन करा

५) फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

६) यानंतर, तुमच्या छताचे टेक्निकल सर्वे केले जाईल

७) जर सर्वेक्षण योग्य आढळले तर, सौर ऊर्जा बसवणे सुरू होईल

सोलर साठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील?

१) आधार कार्ड

२) पॅन कार्ड

३) वीज बिल

४) बँक पासबुकची प्रत किव्हा कॅन्सल चेक

५) मोबाइल नंबर

६) छताचा फोटो

७) पासपोर्ट आकाराचा फोटो

Share

Leave a Comment