रेशीम उद्योग
रेशीम बद्दल कुणाला माहिती नाही? रेशीम चे कपडे, रेशीम धागे, रेशीम चा रूमाल तर खूप प्रसिद्ध आहे, खूप वर्षा पासून रेशीम ने आपली एक वेगळीच ओळख बनवली आहे. रेशीम पासून तयार होणाऱ्या सिल्क च्या साडी तर खूप प्रसिद्ध आहेत.
आज सुध्दा रेशीम च्या कापडाची तेवढीच मागणी आहे आणि ही मागणी दिवसेदिवस वाढत आहे. खूप महिला आहेत, ज्या सिल्क साडी आवळीने घालतात. रेशीम धाग्याला बाजारात खूप मोठ्या प्रमणात मागणी आहे. आणि हे मागणी दरवर्षी वाढत चालली आहे.
रेशीम शेती मुळे खूप लोकांना रोजगार मिळाला आहे या उद्योगामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शहराकडे होणारे मजुरांचे स्थलांतर कमी झाले आहे. तुती लागवड करून शेतकऱ्यांनी पर्यावरणाचे रक्षण सुद्धा केले आहे. काही शेतकरी कमी जागेत व कमी पैशात या उद्योगात यशस्वी झाले आहेत व पैसा कमावला आहे.
हे वाचलंत का? – * व्यवसाय कसा सुरू करावा? * ९ मार्गाने आपल्या व्यवसायाचा ब्रँड तयार करा! |
रेशीम उद्योग म्हणजे काय? – Reshim sheti
रेशीम उद्योग हा खूप मोठा आर्थिक उलाढाल असलेल्या उद्योग आहे. या उद्योगासाठी शासनाकडून देखील मदतीच्या माध्यमातुन चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सरकारने जागोजागी रेशीम उद्योग केंद्र उभारले आहेत. या केंद्रांमधून रेशीम अळ्यांचे अंडी पुंजी तसेच मार्गदर्शन देखील मिळते. व सरकार या उद्योगाला पैशेच्या स्वरूपात अनुदान सुद्धा देते.
रेशीम उद्योग हा एक असा व्यवसाय आहे, जो कमी पैशान मध्ये सुरू केला जावू शकतो. कमी पैसे म्हणजे तुम्ही जेवढे कमी समजताय तेवढे नाही हा उद्योग सुरू करण्यासाठी कमीत कमीत आपल्याला 5 लाख रुपये गुंतवणूक लागते.
हा व्यवसाय खूप मेहनत आणि हुशारीने करावा लागतो कारण या मध्ये खूप प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या आपल्यासाठी नवीन आहेत.
या व्यवसाया मध्ये तुम्हाला रेशीम अळ्या पाळून त्यांच्या पासून रेशीम चे उत्पादन घ्यावे लागते, या व्यवसाय मधून तुम्ही तयार झालेले रेशीम विकून चांगले पैसे कमवू शकता. हा व्यवसाय करण्याकरिता तुमच्याकडे शेती असणे गरजेचे आहे कारण हा व्यवसाय शेती वर आधारित व्यवसाय आहे.
रेशीम काय आहे?
रेशीम हा एक प्रकारचा पतला आणि चमकदार धागा असतो. ज्याचा पासून कपडे विणले जातात, हा धागा फिलामेंटस सेल मध्ये राहणाऱ्या कीटक पासून तयार केला जातो.
रेशीम उद्योगासाठी लागणारी जमीन
या व्यवसाय करिता लागणाऱ्या जमिनीचा जर आपण विचार करतो तर याला 1 यकर शेती लागेल व 1700 sqfoot शेड, ज्यामध्ये आपण रेशीम अळ्यांचे संगोपन करू.
हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला शेतीची आवश्कता याकरिता आहे, ज्यामध्ये आपल्याला तुती या रोपाची लागवड करावी लागते, या तुतीच्या पाल्या वर आपल्याला रेशीम किडे जगवावे लागतात, हा पाला त्यांना खावू घालावा लागतो.
तुतीची शेती कशी करावी?
Reshim udyog
तुतीची लागवड करण्यासाठी चांगली कसदार जमीन लागते. तुतीच्या रोपांची लागवड करताना दोन रोपंमधील अंतर चार ते पाच फूट ठेवावे लागते, यामुळे तुतीची वाढ चांगल्या प्रकारे होते.
तूती ही जंगली झाड असल्यामुळे या झाडाला पाणी कमी प्रमाणात लागते. जेवढे पाणी एक एकर संत्रा बागेला लागते तेवढ्या पाण्यात तीन एकर तुती आरामात जगते.
या झाडांना पाणी देण्यासाठी आपण ठिबक सिंचन वापरू शकतो. ज्यामुळे आपले पाणी कमीत कमी लागते किंवा पाणी मुबलक प्रमाणात असेल तर आपण पारंपरिक पटाचे पाणी देऊ शकता.
तुती ही लागवडीपासून 45 दिवसात कापणीला येऊन जाते आपण याचे अडीच ते तीन महिन्यातच उत्पन्न घेवु शकतो.
एक वेळ आपण तुटीची लागवड केली की लावलेली तुती ही आपण 10 वर्षापर्यंत आरामात ठेवू शकतो, 10 वर्ष आपल्याला तुटीची पुन्हा लागवड करण्याची गरज नाही भासणार.
एका एकराच्या तुटीच्या पाल्यावर आपन 200 ते 300 रेशीम अळ्या जगवू शकतो, व 200 किलो रेशीम उत्पादन मिळवू शकतो.
आता आपण तूतीची लागवड करून घेतली आहे, आता आपल्याला लागतील रेशीम अंडी पुंज ज्यांचे संगोपन करून आपल्याला रेशीम मिळवायचे आहे.
त्याची माहिती आपण खाली पाहू
रेशीम उद्योग मार्गदर्शन कुठून मिळेल?
रेशीम उद्योग माहिती मराठी
हे अंडी पुंजी आपल्याला आणायचे आहेत जिल्हा रेशीम कार्यालय मधून, तिथे जावून आपल्याला तिथे रेशीम उद्योग अधिकाऱ्याला भेटून त्यांच्या कडून सर्व माहिती घेवून त्यांना आपल्याला लागणाऱ्या अळ्यांची मागणी करायची आहे, जेणे करून ते आपल्याला त्या अळ्या पुरवतील व समोरील मार्गदर्शन करतील, जिल्हा रेशीम कार्यालय मधून आपल्याला ह्या अळ्या खूप सोप्या रीतीने मिळून जातात.
या उद्योग करिता जिल्हा रेशीम कार्यालय आपल्याला ट्रेंनिग सुध्धा देते पण त्या ट्रेनिंग ला आपला नंबर कधी लागेल सांगता येत नाही.
तर आपल्याला हा उद्योग सुरू करण्याआधी जे लोक हा उद्योग करीत आहेत त्यांची भेट घेवून त्यांचे मार्गदर्शन घेणे फायदेशीर आहे. आपल्या जिल्ह्यात कोण हा उद्योग यशस्वीरीत्या करीत आहे, ही माहिती आपल्याला जिल्हा रेशीम कार्यालय मधून मिळून जाते.
रेशीम उद्योग शेड
तेथून अंडी पुंज मिळाले की प्रश्न येतो ते अंडी पुंज ठेवायचा तर या करिता आपल्याला तयार करावे लागेल एक शेड, ज्याचा खर्च हा 200 ते 300 अंडकोश जर आपण ठेवत असू तर येईल 2 ते 2.5 लाख रुपये. हे शेड आपल्याला 1700 sqfoot चे तयार करावे लागे,
या मध्ये अळ्या ठेवण्याकरिता रॅक तयार कराव्या लागतील ज्या मध्ये आपण आपल्या अळ्या ठेवू व तिथेच त्यांना खायला देवू या रॅक आधीच थोड्या मजबूत करून घ्यायच्या कारण या वर नंतर तुतिच्या पाल्याचे वजन येते त्यामुळे या दबायला सुरुवात होईल.
शेड मध्ये रॅक आणि शेड च्या भिंती मध्ये 4 फूट अंतर ठेवावे.
रेशीम उद्योगसाठी शेडची रचना
रेशीम शेतीसाठी शेडची गरज लागते. शेड बांधण्यासाठी आपल्याला शासन अनुदानही देते.
शेडचा आकार हा एका एकर तुती साठी 65 फूट लांब आणि 34 फूट रुंद असावा.
शेड बांधतांना ते अश्या प्रकारे बांधावे जेव्हा आपण त्याची स्वच्छता करू तेव्हा कोणतीही अडचण न यावी
या अळ्या खूप नाजूक असल्यामुळे यांना रोगाचा प्रादुर्भाव हा लवकर होवू शकतो म्हणून स्वच्छते ला खूप महत्व आहे.
एक बॅच निघाल्या नंतर दुसरी बॅच त्या शेडमध्ये आणण्यापूर्वी संपूर्ण शेड व ज्या रॅक मध्ये आपण अळ्यांना ठेवतो ते सर्व निर्जंतुक करून घ्याव.
शेड अशा प्रकारे बांधावे जेणेकरून त्या शेड मध्ये इतर प्राणी किंवा कीटक येणार नाही.
आपण या अळ्यांना रॅक मध्ये ठेवतो या रॅक मध्ये कधी कधी काही अळ्या मरतात सुद्धा तर या मेलेल्या अळ्यांना मुंग्या लागायची भीती राहते ज्यामुळे जिवंत अळ्यांना सुध्धा मुंग्या लागू शकतात.
या करिता उपाय म्हणून आपण ज्या रॅक मध्ये त्या अळ्या ठेवल्या आहे , त्या रॅक चे पाय हे मोठ्या वाट्यान मध्ये ठेवावे व त्या वाटी मध्ये पाणी भरून ठेवावे या मुळे मुंग्या वर चढणार नाही.
शेडचा आतील परिसर आपण स्वच्छ ठेवू सोबतच आपल्याला बाहेरील परिसर सुध्धा स्वच्छ ठेवायचा आहे जेणे करून रोग जंतूचा प्रादुर्भाव होणार नाही.
शेड मध्ये आपण काम करतांना स्वतःच्या स्वच्छते वर सुद्धा लक्ष द्यावे लागते. कारण आपल्या हाता द्वारे रोगांचा प्रादुर्भाव होवू शकतो.
या अळ्यांना तिन्ही रूतू मध्ये ठेवतांना खूप काळजी पूर्वक ठेवावे लागते, उन्हाळ्या मध्ये जास्त उन्हामुळे अळ्या मरू शकतात त्यांना पाहिजे तशे वातावरण द्यावे लागणार. या करिता शेड वर पाणी टाकावे लागणार बाजूने नेट लावून घ्यावी.
योग्य रेशीम अंडी पुंज
रेशीम अळ्यांचे खूप प्रकार आहेत , या सर्व प्रकारांना वेगवेगळे वातावरण पाहिजे असते. आपण जेव्हा हा व्यवसाय सुरू करतो तर आपल्याला हे माहीत असणे खूप गरजेचे आहे की आपल्या कडे कोणत्या प्रकारची रेशीम अळी ही चांगली राहू शकते. ज्यामुळे आपण चांगले उत्पादन घेवु.
निष्कर्ष
रेशीम उद्योग हा खूप पैसे देणार उद्योग आहे याला व्यवस्थित व्यवस्थापन करून केल्यास या मधून खूप मोठ्या प्रमाणात आपण रेशीम चे उत्पादन घेवून पैसे कमवू शकतो. हा व्यवसाय शेती आधारित असल्यामुळे तुम्ही याला शेती सोबतच करू शकता शेती करून तुम्ही या व्यवसायात लक्ष देवू शकता.
यातील बारकावे समजून घ्यायला खूप वर्षाचा अनुभव घ्यावा लागतो होवू शकते तुम्ही या वर्षी सुरू केला व तुम्हाला चांगले उत्पन्न नाही मिळाले तर आपल्या रेशीम कार्यालय मधून मार्गदर्शन घेत रहा किंवा जो शेतकरी या उद्योगाला खूप वर्षांपासून करीत आहे त्याचे मार्गदर्शन घ्या.
हा उद्योग या पुढेही जावू शकतो तुम्ही जे रेशीम कोश पासून रेशीम धागा तयार करणारी मशीन आणली व रेशीम धागा सुद्धा आपणच तयार केला तर धाग्याला रेशीम कोष पेक्षा जास्त किंमत मिळते.
या उद्योग बद्दल मी आज पर्यंत जेवढं वाचलं किंवा पाहिलं आहे, त्यातून मला एक गोष्ट लक्षात आली की हा उद्योग आपण स्वतः जेवढी मेहनत घेवु तेवढे उत्पन्न आपण या मधून घेवु शकतो आपण मजूर लावून या मधून उत्पन्न घेवु नाही शकत म्हणून स्वतः मेहनत करायची तयारी असल्यास हा उद्योग करावा.
रेशीम उद्योग या बद्दल अधिक माहिती साठी तुम्ही facebook group join करू शकता, या मध्ये तुम्हाला रेशीम कोष विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याची माहिती मिळेल, व सध्याचे रेशीम कोष भाव काय आहे ते पण माहिती मिळेल.
- धिरज तायडे
माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.