९ मार्गाने आपल्या व्यवसायाचा ब्रँड तयार करा!

तुमचा लहान व्यवसाय जरी असला, तरी त्या व्यवसायाचा तुम्ही एक ब्रँड तयार करू शकता. या आर्टिकल मध्ये आपण बघणार आहोत कि ९ मार्गाने एका लहान व्यवसायाचा ब्रँड कसा तयार करायचा. त्याआधी आपण जाणून घेऊया नेमके ब्रँड म्हणजे काय ?

ब्रँड म्हणजे काय? – Branding meaning in marathi

Brand in marathi

/Branding-meaning-in-marathi

branding meaning in marathi

एक ब्रँड म्हणजे तुमचे प्रेक्षक आणि ग्राहक तुमच्या व्यवसायाबद्दल कसे विचार करतात आणि ते त्यांचे काय प्रतिनिधित्व करतात. ही लोगो किंवा नावापेक्षा वेगळी बाब आहे. ब्रँड म्हटले म्हणजे लोकांच्या डोक्यात एकच गोष्ट आपल्याला बघायला मिळते. ती म्हणजे व्यवसायाचा लोगो आणि नाव. लोगो आणि नाव हे पण ब्रँड साठी खूप महत्वाचे आहे, परंतु कधी जेव्हा तुमच्या ग्राहकांच्या भावना तुमच्या व्यवसायासोबत जुळतात तेव्हा लोगो आणि नाव काम करतो.

एका व्यायसायिकाला हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे की आपले ग्राहक आपल्या व्यवसायाबद्दल काय विचार करतात. त्यांच्या गरज पूर्ण होतात कि नाही.

1) आपला ब्रँड परिभाषित करा (Define Your Brand)

परिभाषित करणे म्हणजेच Define करणे होय तुमचा ब्रँड परिभाषित करण्यासाठी, सर्वात आधी तुमचे ध्येय काय आहे, तुम्ही तुमच्या ग्राहकांना कोणते फायदे देता, तुमच्या ग्राहकांसाठी कोणती वैशिष्ट्ये महत्त्वाची आहेत, तुम्हाला कोणत्या प्रकारचे ग्राहक आकर्षित करायचे आहेत आणि तुमच्या ग्राहकांना भेटून त्यांना विचारल्यानंतर ते तुमच्या उत्पादना बद्दल काय सांगतात त्यातील उणीव दुसर्याकडून समजून घ्या.

तसेच स्वतः पण शोधा त्यानंतर तुमच्या लक्षात येईल कि, तुम्हाला तुमच्या व्यायसायात अजून काय जोडायचे आहे. तुमच्या व्यवसायाचा मिशन स्टेटमेंट लिहिण्यासाठी वेळ काढा ज्यात तुम्ही काय करता, तुम्ही कोणासाठी करता, तुम्ही ते का करता आणि तुम्ही ते कसे करता याचा समावेश असायला हवा.

2) रंग, फॉन्ट आणि फोटो निवडा (Choose Colors, Fonts, and Images)

तुमचा व्यवसाय योग्य रित्या चालायला लागल्यावर तसेच तुम्ही तुमच्या ग्राहकांच्या अडचणी दूर केल्यानंतर. आत्ता आपण दुसऱ्या पॉईंट कडे बघूया..! ब्रँड मध्ये कोणत्या प्रकारचे रंग, फॉन्ट आणि फोटो वापरणार आहात? तुमची कंपनी ज्या उद्योगाचे प्रतिनिधित्व करते, प्रेक्षकांना काय आवडते आणि या गोष्टी कोणत्या भावना निर्माण करतात यावर हे अवलंबून असेल. त्याकडे बारकाईने लक्ष द्यावे.

लोगो तयार करण्यासाठी एखादा प्रोपेशनल व्यक्तीची नियुक्त करणे सहसा चांगले असते. लोगो आपल्या व्यवसायाचे कायदेशीर प्रतिनिधित्व आहे. काही वेळेस आपण फोटो, टॅगलाईन किंवा कधीकधी लोगोमध्ये काही विशिष्ट फॉन्ट वापरू शकत नाही. अश्या वेळेस विश्वासार्ह असलेल्या लोगो तयार करणाऱ्या व्यावसायिकांची नेमणूक करणे हे योग्य राहते.

ते आपल्याला त्याबद्दल मार्गदर्शन करू शकतात. ते आपले मिशन स्टेटमेंट, ग्राहकांची माहिती आणि इतर माहिती घेऊ शकतात. जेणेकरून आपल्याला फक्त योग्य लोगो तयार करण्यात मदत होईल. जे आपल्या ग्राहकांना पाहिजे असलेल्या भावनांना आवाहन करेल. (मी जे तुम्हाला एक एक पॉईंट सांगत आहे, तो क्लिअर होत आहे ना? नसेल तर मला कंमेंट करून नक्की विचार मी तुमची अडचण दूर करायला तयार असेल.)

4) टॅगलाइन विकसित करा (Develop a Tagline)

टॅगलाईन एक अतिशय लहान, लक्षात राहील अशी आणि आकर्षक विधान असलेली असावी. कारण जे तुमच्या ब्रँडला तुमच्या समोर प्रथम येणाऱ्या कोणालाही स्पष्ट करेल. लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी काहीतरी ब्रँड तयार केले पाहिजे. जे कि सर्वांच्या पेक्षा वेगळे असेल. तेव्हाच तुमचा ब्रँड तयार होईल.

तसेच त्या टॅगलाइन मध्ये तुमचा व्यवसायाला सामावून घेईल. (उदा.- ज्यावर तुम्ही सध्या हे आर्टिकल वाचत आहे, जे कि माहिती लेक आहे. या वेबसाइट चे टॅगलाइन माहितीचे सरोवर असे आहे. सरोवर म्हणजे पाण्याचा जसा असतो. तसा हा माहिती चा सरोवर आहे.)

5) सोशल मीडिया वर ब्रँडिंग करा (Integrate Branding across Social Media)

ऑनलाईन असो किंवा ऑफलाइन, तुमचे ब्रँडिंग सारखेच प्रचारात राहिले पाहिजे. मग ती टॅगलाईन असो, लोगो असो किव्हा फोनला उत्तर देण्याचा मार्ग, तुम्ही तुमच्या ईमेल च्या साहाय्याने तुमच्या व्यवसायाचा प्रचार करू शकता. आजकाळ सोशल मीडिया वर सर्वच लोक आपला बराचसा वेळ घालवतात.

सध्याच्या काळात सोशल मीडिया चा वापर तुम्ही या साठी देखील करू शकता. तुमची वेबसाइट, सोशल मीडिया आणि बरेच काही कसे तुम्ही वापरता, यावर अवलंबून आहे. सोशल मीडिया च्या साहाय्याने तुम्ही कुठेही असो, तुमचे ग्राहक तुमच्या सोबत जुळलेले राहतात. त्यातून तुम्ही त्यांचा अभिप्राय घेऊ शकता. त्यांच्या अडचणी दूर करू शकता.

6) आपला ब्रँड आवाज करा (Don’t Forget Your Brand Voice)

जेवढे तुम्ही तुमच्या ब्रॅण्डचा आवाज कराल, तेवढा तो लोकांच्या मनात ठसेल. ब्रॅण्डचा आवाज करणे म्हणजे गाणे वाजवणे असे समजू नये. आवाज म्हणजे हवा करणे. ( फक्त हवा च करू नये. त्यासोबत क्वालिटी पण द्या.) जसे कि आपण ब्लॉग पोस्ट, पुस्तक, व्हिडिओ, पॉडकास्ट, वेबिनार किंवा इतर काही प्रकाशित करता की नाही, हे सुनिश्चित करणे महत्वाचे आहे.

7) टेम्पलेट तयार करा (Create Templates)

जेणेकरून तुम्ही तुमच्या संपूर्ण स्टाफला तुमच्या ब्रँडिंगबद्दल शिकवू शकाल. तुम्ही साहित्य आणि टेम्पलेट विकसित करू शकता. एक लेखन मार्गदर्शक, ब्रँडिंग मार्गदर्शक, आर्ट टेम्पलेट्स, प्रेसेंटेशन टेम्पलेट्स आणि बरेच काही जे आपल्याला हे सुनिश्चित करण्यात मदत करेल की आपले ब्रँडिंग सर्व चॅनेलमध्ये जुळले आहे कि नाही.

8) तुमच्या आश्वासनांची पूर्तता करा (Deliver on Your Promises)

तुम्ही तुमच्यासाठी बनवलेल्या ब्रँडिंगनुसार जगणे अत्यावश्यक आहे. स्वतःला जर तुम्ही १००% वचन दिले नसेल किव्हा, प्रश्न विचारले नाही तर ते करा. जर तुम्ही ठामपणे ठरवले असेल कि, मला माझ्या व्यवसायाला पुढल्या काही वर्ष्यात खूप मोठे झालेले बघायचे आहे, तर तुम्ही ते केलेच पाहिजे.

जे कि तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी ठरवले आहे, नाहीतर तुमच्या ब्रँडिंगवर कोणी विश्वास ठेवणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही काही करून दाखवत नाही. तोपर्यंत तुमच्या शब्दाला मान नसतो. म्हणजेच तुमच्या ब्रॅण्डला मान नसतो.

9) सुसंगत रहा (Be Consistent)

आपल्या छोट्या व्यवसायाचे ब्रँडिंग करण्यासह – व्यवसायाच्या सर्व पैलूंची एक किल्ली म्हणजे सातत्य (नियमितपणा). सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन चॅनेलवर आपल्या ब्रँडिंगसोबत सुसंगत रहा. आपण सशुल्क जाहिरात चालवा किंवा विनामूल्य सामग्री तयार करा. आपण आपल्या उद्योगात एक संस्मरणीय व्यवसाय व्हाल याची खात्री करण्यासाठी ब्रँडिंग आवश्यक आहे.

ब्रँडिंग लहान व्यवसाय मालकांसाठी तसेच मोठ्या व्यवसायासाठी महत्वाचे आहे. तुमच्याकडे मर्यादित बजेट असल्यास, स्मार्ट ब्रँडिंग हे कदाचित तुम्ही बनवू शकणारे सर्वात स्वस्त व्यवसाय साधन आहे.

तुम्हाला सांगण्यात खूप आनंद होत आहे कि, आपली माहिती लेक वेबसाइट हि महाराष्ट्रात ब्रँड झालेली आहे अवघ्या दिड वर्षात माहिती लेक ला २२५३७०५ लोकांनी भेट देऊन यावरची आर्टिकल वाचलीत. तसेच तुमच्या मेल आणि व्हाट्सअप मॅसेज वाचून खूप आनंद होतो. धन्यवाद तुमच्या सर्वांचे ज्यांच्या मुळे वेबसाइट कुठल्या कुठे पोहचली आहे. असेच आमच्यावर तुमचे प्रेम राहू द्या.

 • सागर राऊत

( महत्वाची सूचना – माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. धन्यवाद… 😊 )

हे वाचलंत का? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

2 thoughts on “९ मार्गाने आपल्या व्यवसायाचा ब्रँड तयार करा!”

 1. माननीय श्री . सागर राऊत जी
  नमस्कार विनंती विशेष की, आपण
  माहिती लेक या वेबसाईट सुरू केली आहे ती मराठी उद्योजकांसाठी खरोखरच मार्गदर्शनिय आहे. व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्यास प्रवृत्त करते.
  आम्ही सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी मराठी माणसांना जागतिक पातळीवर होत असलेल्या घडामोडी आणि त्यांच्या कौटुंबिक जीवनावर होणारा परिणाम या विषयावर जनजागृती करीत आहोत. जेणेकरून जागतिक अर्थव्यवस्थेचा मराठी माणसांना लाभ होईल.

  Reply
  • नमस्कार,
   दिलीप इंगळे सर
   तुमची कंमेंट वाचून खूप आनंद झाला.! तुम्ही जो सामाजिक उपक्रम राबवत आहे. याबद्दल ऐकून बरे वाटले. या क्षेत्रातील तुमचा प्रवास आनंदमयी आणि उत्साही जाओ.! हीच ईश्वर चरणी प्रार्थना.!

   Reply

Leave a Comment