नाचणी हा एक तृणधान्याचा प्रकार आहे. नाचणी दिसायला गडद लाल रंगाची असते. शरीरासाठी थंड असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नाचणीचे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायी ठरते. नाचणीची लागवड डोंगराळ भागात केली जाते. 

या लेखात,आपण नाचणी चा वापर, फायदे आणि नुकसान बघणार आहोत.  नाचणीचे शास्त्रीय नाव इलुसाईन कोराकाना आहे. आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात नाचणी पिकविल्या जाते व आदिवासी लोकांचे मुख्य अन्न म्हणून ही नाचणी ओळखली जाते. नाचणी पित्तशामक, थंड, रक्‍तातील उष्ण दोष कमी करते. स्थूल व्यक्‍तींनी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नाचणीचा आहारात समावेश करावा.

चला तर बघूया नाचणी म्हणजे काय आणि दैनंदिन आहारामध्ये आपण नाचणी चा वापर कसा करू शकतो. 

Ragi meaning in marathi

नाचणी खाण्याचे फायदे

नाचणी म्हणजे काय?- Ragi in marathi

नाचणी ही वनस्पती Poaceae कुटुंबातील असून तिचे वैज्ञानिक नाव   इलुसाईन कोराकाना (Eleusinae coracaena) आहे. नाचणी दिसायला गडद लाल रंगाची असते. यात अमीनो ऍसिड आणि मेथिओनाइन आढळतात.

नाचणीच्या पिठापासून  केक, पुडिंग किंवा दलिया बनवता येते. नेपाळमध्ये आणि आफ्रिकेच्या अनेक भागांमध्ये पिठाचे आंबवलेले पेय (किंवा बिअर) बनवले जाते. नाचणीच्या पेंढ्याचा उपयोग जनावरांना चारा म्हणून केला जातो.

शिजवलेल्या नाचणीमध्ये 71% पाणी, 24% कर्बोदके, 3% प्रथिने आणि 1% चरबी असते. 


हे वाचलंत का? –
* कुळीथ (हुलगे) म्हणजे काय?
* आपण किती दिवस न झोपता राहू शकतो?

    नाचणीचा परिचय 

    कोकण आणि डांग (गुजरात) प्रांतात नाचणीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. नाचणीचा उपयोग भाकरी आणि आंबील बनवण्यासाठी होतो.

    महाराष्ट्रातील कोकणपट्टी आणि खानदेशामध्ये नाचणीचे पिक खरीप हंगामात घेण्यात येते. महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिशा, उत्तराखंड, गोवा व बिहार या राज्यांमध्येही नाचणी पिकविली जाते. नाचणीचे दाणे गडद विटकरी रंगाचे असून आकाराने मोहरीसारखे बारीक असतात.

    नाचणीचे मुख्य लागवड क्षेत्रे पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेतील काही भाग आहेत – विशेषतः युगांडा, केनिया, काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, झिम्बाब्वे, झांबिया, मलावी आणि टांझानिया – आणि भारत आणि नेपाळचे काही भाग.

    1996 पर्यंत, आफ्रिकेतील नाचणीची लागवड झपाट्याने कमी होत चालली होती कारण त्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता होती, शेतकऱ्यांनी मका, ज्वारी आणि कसावा यांसारखी पोषक-निकृष्ट परंतु कमी श्रम-केंद्रित पिके घेण्यास प्राधान्य दिले.आशियामध्ये मात्र अशी घसरण दिसली नाही.

    नाचणीचा रंग जरी गडद तपकीरी असला तरी चव मात्र उग्र नसते त्यामुळेच गहु, ज्वारी, तांदळाचे जसे गोड आणि तिखट पदार्थ बनविता येतात त्याप्रमाणे नाचणीचे सुद्धा गोड व तिखट पदार्थ बनविता येतात, तसेच पारंपारिक पदार्थांचे पोषण मुल्य वृद्धिंगत करण्यासाठी नाचणीचा उपयोग करता येतो.

    एकदा कापणी केल्यावर नाचणीवर क्वचितच कीटक किंवा बुरशी हल्ला करतात. नाचणी 10 वर्षांपर्यंत साठवून ठेवली जाऊ शकते. चांगल्या स्टोरेज परिस्थितीत 50 वर्षांपर्यंत सुद्धा नाचणी साठवल्या जाऊ शकते. दीर्घ साठवण क्षमतेमुळे नाचणी  हे शेतकऱ्यांसाठी दुष्काळाचे पीक म्हणून जोखीम टाळण्याच्या धोरणांमध्ये एक महत्त्वाचे पीक बनते. 

    नाचणी इथिओपियन आणि युगांडाच्या उच्च प्रदेशातील स्थानिक आहे. समुद्रसपाटीपासून 2000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर लागवडीला तोंड देण्याची क्षमता, त्याची उच्च दुष्काळी सहनशीलता आणि धान्याचा दीर्घकाळ साठवणूक करण्याची क्षमता ही नाचणीची  वैशिष्ट्ये आहेत.

    भारतामध्ये नाचणीच्या पिठाचे सेवन दूध, उकळलेले पाणी किंवा दह्यासोबत केले जाते. डोसा, इडली आणि लाडूसह नाचणी  विविध प्रकारच्या खाद्य पाककृती वापरले जाते.


    नाचणीचे इतर भाषेतील नाव :

    इंग्लिश :  Finger Millet, Indian Millet, African Millet

    संस्कृत : मधुलिका, नर्तक, भूचरा, कठिन, कणिश

    हिंदी : मड़ुआ 


    नाचणी मधील पोषकतत्व

    प्रोटीन7.7 ग्राम
    फैट1.8 ग्राम
    फाइबर 15-22.0 ग्राम
    कार्बोहाइड्रेट75.0 – 83.3 ग्राम
    फास्फोरस130-250.0 मिलीग्राम
    पोटेशियम430-490 मिलीग्राम
    मैग्नीशियम78-201 मिलीग्राम
    कैल्शियम 398 मिलीग्राम
    सोडियम 49 मिलीग्राम
    जिंक2.3 मिलीग्राम
    आयरन3.3-14.89 मिलीग्राम
    मैंगनीज17.61-48.43 मिलीग्राम
    कॉपर 0.47 मिलीग्राम

    १०० ग्राम  नाचणी मध्ये खालील प्रमाणे पोषकतत्व असतात. 


    नाचणी खाण्याचे फायदे 

    १. हाडांच्या  विकासासाठी आवश्यक असलेले आवश्यक पोषक तत्व कॅल्शियम नाचणीतून सहजपणाने मिळते.  यातील कॅल्शियममुळे लहान मुलांना आणि गरोदर महिलांना नाचणीचे सत्व देण्यात येते. कॅल्शियमची कमतरता असल्यास, कॅल्शियमयुक्त डाएटमध्ये नाचणीचा समावेश करून शकतो.

    २. नाचणीमध्ये असणारे ट्रिप्टोफॅन अमिनो असिड हे भूक कमी करून वजन नियंत्रित करण्यासाठी मदत करते. त्याशिवाय नाचणीमध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्यामुळे एकदा खाल्ल्यानंतर त्वरीत भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यात मदत होते. शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही यामुळे कमी होते. 

    ३. नाचणीमध्ये असेलेल्या अँटीडायबिटीक गुणामुळे मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत मिळते. तसंच नाचणी लो ग्लायसेमिक आहे, जो रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. 

    ४. नाचणी लोहाचा स्रोत आहे. हिमोग्लोबिनची कमतरता असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आहारात  नाचणीचा समावेश करणे फायद्याचे ठरते. नाचणी खाल्ल्याने शरीरात विटामिन सी ची कमतरता जाणवत नाही आणि शरीरातील रक्तामध्ये लोहाचे प्रमाणही वाढते. 

    ५. नाचणीतील अमिनो असिड आणि अँटीऑक्सिडंट गुण हे नैसर्गिक पद्धतीने शरीराला आराम देतात. तसंच चिंता, डोकेदुखी, अनिद्रा यासारख्या समस्यांवर नाचणी उपयुक्त ठरते. ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो असिड हे मेंदूसाठी फायदेशीर ठरून व्यवस्थित झोप लागण्यासाठी याची मदत होते. तसंच स्मरणशक्ती चांगली ठेवण्याचे कामही नाचणीचे सत्व करते. 


    नाचणी खाल्याने होणारे नुकसान 

    १. नाचणीमध्ये मध्ये कॅल्शियम जास्त असल्याने अधिक सेवन केल्यास मुतखडा होण्याची शक्यता असते. 

    २. तसेच नाचणीमध्ये फायबर अधिक असल्याने, गॅस, पोट फुगणे आणि पोटात सूज येणेसारखा त्रासही होऊ शकतो.

    ३. नाचणीची अलर्जी असेल तर अलर्जीची समस्याही होऊ शकते. 

    ४. नाचणीचे सेवन जास्त केलयास  जुलाब किंवा उलट्या होऊ शकतात.


    नाचणी बद्दल विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

    Q.1- नाचणीचा वापर दैनंदिन जीवनात कसा करावा ?

    A.- नाचणीच्या पिठापासून हलवा, लाडू, डोसा, उपीट, भाकरी इडली बनवता येते. 

    Q.2- नाचणीमध्ये कोणते गुणधर्म असतात ?

    A.- नाचणीमध्ये  कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक कॅरोटिन तसेच थायमीन व तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. 

    Q.3- नाचणीचे काहीकाय दुष्परिणाम आहेत?

    A.- नाचणीमध्ये मध्ये कॅल्शियम जास्त असल्याने अधिक सेवन केल्यास मुतखडा होण्याची शक्यता असते.  तसेच फायबर अधिक असल्याने, गॅस, पोट फुगणे आणि पोटात सूज येणेसारखा त्रासही होऊ शकतो.


    • मृणाली आकोलकर

    🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

    Share
    WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
    Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
    Categories: Health

    0 Comments

    Leave a Reply

    Avatar placeholder

    Your email address will not be published. Required fields are marked *