क्विनोआ काहींच्या माहितीतला किंवा काहींच्या ऐकण्यातला एक धान्य प्रकार आहे. आपण नेहमीच कडधान्याची नावे ऐकत असतो. जे उपयुक्त असता आपल्या शरीरासाठी तसेच काहीस सध्या क्विनोआ हा धान्य प्रकार चर्चेत आहे. नक्की हा कसा दिसतो?
क्विनोआ म्हणजे काय..?|Quinoa meaning in marathi
क्विनोआ (Quinoa) हे एक अमरांथ फॅमिली मधील फुलांची वनस्पती आहे, क्विनोआला “राजगिरा” असे ही म्हटलं जातं.
क्विनोआ दिसायला एखाद्या डाळीसारखा आहे. दक्षिण अमेरिकेतील मुख्य धान्य म्हणून क्विनोआ ओळखला जातो. क्विनोआच्या शेतीसाठी कमीतकमी पाणी लागत. कमी पाण्याच्या ठिकाणी सुद्धा याची शेती केली जाते.
अस म्हणतात की क्विनोआ हे धान्य इतर धान्यांच्या तुलनेत अधिक पौष्टिक आणि रुचकरही असत. उपयुक्त अस हे धान्य कोणत्याही किराणा दुकानात किंवा सुपरमार्केटमध्ये उपलब्धीत असत. परंतु ते नसल्यास आपण ते ऑनलाईन ऑर्डर सुद्धा करू शकतो. राज्यातील अकरा जिल्यांमध्ये क्विनोआ चे पीक रुजत आहे.
हे वाचलंत का? – * जवस खाण्याचे आरोग्यासाठी फायदे * पाण्याचा टीडीएस किती असावा? |
हे पीक आकाराने बाजरी, ज्वारीच्या दाण्यासारखे असतात. याला विशिष्ट अशी चव नसते, परंतु यातून शरीराला जास्त प्रमाणात प्रथिने मिळतात तसेच आरोग्यासाठी उपयुक्त असलेले घटक व्हिटीमीन बी, व्हिटीमीन ई, लोह, प्रथिने, फायबर, मॅग्नेशिअम, पोट्याशीयम आणि अमिनो असिड यासारखे पोषक घटक यातून मिळतात. जे घटक निरोगी राहण्यास मदत करतात.
याच बरोबर यामध्ये कन्सरविरोधी आणि अँटी-एजिंग गुणधर्म देखील आहेत. जे कर्करोगाने वृद्धत्वाची असलेल्या समस्या कमी करतात, एवढंच काय तर रक्तदाब, अशक्तपणा, ऑस्टिओपोरोसिस आणि हृदयाशी संबंधित आजारांसारख्या अनेक आजारांना बर करण्यास ते मदत करता.
ही क्विनोआची वनस्पती आहे, जी सुमारे चार ते पाच मीटर उंच आहे, आणि सर्व बाजुंनी फुलांनी व्यापलेली आहे. क्विनोआ वनस्पतीचे फुल गंधहीन असते, परंतु आकर्षक दिसते. या वनस्पती मध्ये कीड आणि रोगांवर प्रतिकार करण्याची क्षमता चांगलीच असते.
Organic India Quinoa
Quinoa seeds in Marathi
क्विनोआचे विविध प्रकार
अमेरिकेत क्विनोआचा वापर हा विविध प्रकारच्या केक बनविण्यासाठी केला जातो. कारण क्विनोआ ग्लुटेन फ्री असतो आणि यामध्ये अनेक प्रकारचे ऑमिनो ऑसिड असतात. क्विनोआ
मधून फायबर, झिंग, माग्नीशियम, व्हिट्यामीन इ. हे जास्त प्रमाणात शरीराला मिळतात. मुख्य म्हणजे शरीरातील प्रोटिन्सची कमतरता क्विनोआमुळे नाहीशी होते. साधारणतः क्विनोआचे तीन प्रकार पडतात.
१) रेड क्विनोआ
या बियाण्याचा रंग गडत लाल असतो, म्हणून त्याला लाल क्विनोआ म्हणतात. ते शिजल्यानंतर त्यांच्या रंगात कोणताही बदल होत नाही, हा क्विनोआ बहुतेकदा कोथिंबीर म्हणून खाल्ला जातो.
२) पांढरा क्विनोआ
पांढरा क्विनोआ जगातील सर्वात लोकप्रिय आहे. पांढरा क्विनोआ हस्तिदंत क्विनोआ म्हणून देखील ओळखला जातो. या प्रकारच्या क्विनोआचा वापर सर्वाधिक प्रमाणात केला जातो, कारण तो खाण्यास स्वादिष्ट असतो. पांढरा क्विनोआ कमीत कमी वेळेत शिजतो.
३) काळा क्विनोआ
काळा क्विनोआच्या वनस्पतीची कापणी लाल व पांढऱ्या क्विनोआपेक्षा कमी असते. म्हणूनच त्याचा वापर इतर दोन प्रकारच्या क्विनोआपेक्षा कमी आहे. या क्विनोआच्या दाण्याचा रंग हलका काळा आहे. जो शिजल्यानंतरही तसाच राहतो. या क्विनोआ ची चव गोड असते. परंतु या क्विनोआला शिजायला वेळ लागतो.
राजगिरा खाण्याचे फायदे (Benefits Of Quinoa In Marathi)
क्विनोआचे आरोग्यासाठी होणारे फायदे (राजगिरा खाण्याचे फायदे) खालीलप्रमाणे
१) वजनकमी करण्यास मदत होते –
जास्त वजन असणाऱ्या व्यक्तीनी क्विनोआ या धान्याचा वापर आपल्या आहारात जास्त प्रमाणात केला पाहिजे. यामधून उच्च प्रतीचे प्रथिनामुळे शरीराला मिळतात. हा पदार्थ कोलेस्ट्रोल फ्री आणि कमी स्निग्ध पदार्थ असणाऱ्या पदार्थांन मध्ये मोडतो. समतोल आहार घेण्यासाठी आपण या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे.
२) कोलेस्ट्रोल नियंत्रणीत ठेवता येते. –
या धान्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवता येते. यात उच्च फायबर आणि इतर पोषक घटक असल्यामुळे हे शरीरातील ड्रायग्लिसेराड्डसच्या पातळीला संतुलित करते. त्यामुळे रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणीत राहते.
३) मजबुत हाडे व अशक्तपणेपासून सरंक्षण –
मॅग्नेशियम, कॅल्शिअम, सारखे आइनस नी हाडे मजबूत होतात. त्यामुळे क्विनोआचा वापर करून हाडे मजबूत होण्यास मदत होते. त्याच्या सेवनाने शरीरातील सर्व घटकांची कमतरता पूर्ण करता येते. यात टाईबोफ्लोविन जास्त आणि लोह असल्यामुळे शरीरातील अशक्तपणा नाहीसा होता.
४) केसांसाठी –
यामध्ये हायड्रोलाईज्ड प्रोटीन असल्याने हे केसांचे छिद्रे मजबूत करतात, यामध्ये असलेले तांबे आणि अमिनो ऍसिड केसाच्या वाढीस मदत करते. केसातील कोंडा कमी करण्यासाठी ही या क्विनोआचा वापर केला जातो. यात असलेले कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस या सारखे महत्त्वपूर्ण खनिजांमुळे डोक्याची त्वचा स्वच्छ राहण्यास मदत होते.
५) हृदय –
शारीरातील महत्वाचा भाग म्हणजे, हृदय संबंधित कोणत्याही समस्या असल्यास मृत्यू होण्याची शक्यता असते. शरीरातील अत्यधिक प्रमाणात चरबी व क्रोलेस्ट्रोल रक्त वाहिन्यात जमा झाल्याने हृदय संबंधित रोग होण्याची शक्यता असते, परंतु क्विनोआ क्रोलेस्ट्रोल फ्री असल्याने क्विनोआ खाल्याने क्रोलेस्ट्रोलवर नियंत्रण राहत.
६) निरोगी त्वचा –
क्विनोआतील जीवनसत्त्व “ब” हे परिपूर्ण असल्याने क्विनोआचा वापर आहारात केल्यास त्वचेवरील काळे डाग व पांढरे चट्टे कमी होता. क्विनोआतील जीवनसत्व “ब-३” मुळे चेहऱ्यावरील मुरूम व पुटकुळ्या नाहीश्या होता.
quinoa in marathi meaning / quinoa meaning marathi
quinoa meaning in marathi
७) कर्करोग –
क्विनोआच्या पानात कर्करोग विरोधी तत्व आहेत, ज्याचा उपयोग कर्करोगासारख्या गंभीर आजारासाठी होतो.
८) मधुमेह आणि बी.पी –
मधुमेह हा अतिशय गंभीर शारीरिक आजार आहे, ज्याच्या अंतर्गत रक्तवाहिन्यांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त होत असते. यावर वेळीच नियंत्रण न केल्यास जीवाला धोका होऊ शकतो. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन यांच्या सांगण्यावरून ही माहिती कळली आहे कि, क्विनोआ मधुमेहासाठी खूप फायदेशीर ठरतो. मधुमेहावर रामबाण उपाय म्हणजे क्विनोआचे
सेवन.
९) प्रतिकारशक्ती –
आपल्याला काही किरकोळ आजार ताप सर्दी खोकला किंवा खूप कामाने आलेला अशक्तपणा हे झालेले रोग शरीर त्याचे त्याचेच बरे करत असतो. आपण केवळ काही घरगुती उपचारांद्वारे बरे करण्याचा प्रयत्न करत असतो.
पण रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास या किरकोळ रोगाचे परिणाम शरीरावर त्वरित दिसून येता, ज्यांची प्रतिकार शक्ती चांगली आहे, त्यांच्यावर किरकोळ रोगांचा परिणाम दिसून येत नाही. परंतु ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे.
त्यांच्यावर किरकोळ आजारांचा परिणाम हे दिसून येतात, आणि प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी क्विनोआ सारखे धान्य नियमित आहारात घेतला पाहिजे. ज्यातून फायबर, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, यांसारख्या उपयुक्त गोष्टी क्विनोआ च्या सेवनातून शरिराला मिळतात.
– मधुरा जोशी
क्विनोआ बद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)
प्रश्न१ – क्विनोआ ला मराठी मध्ये काय म्हणतात?
उत्तर – क्विनोआ ला मराठी मध्ये राजगिरा असे म्हणतात.
प्रश्न२ – दररोज क्विनोआ खाणे ठीक आहे का?
उत्तर – होय, आरोग्यासाठी क्विनोआ नियमितपणे खाऊ शकता.परंतु प्रमाणातच सेवन करावे.
प्रश्न३ – क्विनोआ वजन कमी करण्यासाठी चांगले आहे काय?
उत्तर – होय, क्विनोआ वजन कमी करण्यास मदत करू शकतो.
प्रश्न४ – क्विनोआ पोटामध्ये गॅस बनतो का?
उत्तर – होय, क्विनोआ मध्ये फायबर असल्याकारणाने जास्त सेवन केल्यास गॅसची समस्या उद्भवू शकते.
प्रश्न५ – क्विनोआ मुळे पोटदुखी का होते?
उत्तर – क्विनोआ मध्ये फायबर असल्याकारणाने पोटदुखी होऊ शकते, त्याकरिता क्विनोआ चे योग्य प्रमाणात सेवन करावे.
(📢 महत्वाची सूचना – हे आर्टिकल तुम्हाला क्विनोआ बद्दल माहिती देणे असल्याकारणाने क्विनोआ चा वापर करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा आहे. इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल.
🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.