पेट्रोल चे दर का वाढतात?

पेट्रोल-डिझेल-चे-दर-का-वाढतात-1024x683

पेट्रोल चे दर का वाढतात..?

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पेट्रोलच्या दरवाढीमुळे लोकांची पार गोची होऊन बसली आहे.

आणि एकदा वाढलेली किंमत ती काही केल्या कमी होत नाही.

सर्वांच्या मनात एक प्रश्न नेहमी उद्भवत असेल की, पेट्रोल चे भाव वाढतात कसे ? कोण वाढवतो? इत्यादी…..

तर आज आपण त्या मागची कारणे जाणून घेऊया.

त्या आधी आपण थोडक्यात समजून घेऊया की पेट्रोल तयार कसे होते.

हे तर आपल्याला चांगलेच माहीत असेल की पेट्रोल चे उत्पादन भारतात होत नाही, तर ते आपल्याला दुसऱ्या देशातून आयात करावे लागते.

दुसऱ्या देशाकडून crude oil ( कच्च तेल) स्वरूपात घ्यावं लागतं.

आणखी एक प्रश्न तुमच्या मनात आला असेल की, crude oil म्हणजे काय?

Crude oil म्हणजे कच्चे तेल.

जे आपल्याला जमिनीतून किव्हा समुद्राच्या पातळीतून मिळते. त्यालाच crude oil (कच्चे तेल) असे म्हणतात.

तर आत्ता आपल्याकडे कच्चे तेल आले,नंतर त्याला आपण पेट्रोलियम रिफायनरी मध्ये हीट प्रोसेसिंग करून वेगवेगळे द्रव पाईप च्या माध्यमातून काढतो.

उदा.- पेट्रोल, डिझेल, केरोसीन व नफथा इत्यादी

fuel

Image Source- Google / Image By- Wattco

पेट्रोल व डिझेल तयार तर झालं, आत्ता नेमका प्रश्न असा की याची किंमत नेमकं कोण ठरवतो. ही
नेमकी गडबड पेट्रोल पॉलिसि मध्ये आहे. जी सरकारच्या फायद्याची आहे.

Excise duty आणि VAT म्हणजे काय?

पेट्रोल वर मिळणारा टॅक्स हा फक्त केंद्र सरकार च घेत नाही, तर तो अलग राज्य सरकार पण घेतो.

• केंद्र सरकार जो टॅक्स घेतो त्याला excise duty असे म्हणतात.
• राज्य सरकार जो टॅक्स घेतो त्याला VAT असे म्हणतात.

इंटरनेट च्या आकड्यानुसार बघितलं तर पेट्रोकेमिकल मुळे सरकारकडे २०१६-१७ मध्ये ५ लाख २४ हजार करोड रुपयाचा महसूल (Revenue) गोळा झाला.
आणि २०१७-१८ मध्ये ३ लाख ८२ हजार करोड रुपयाचा महसूल फक्त अर्ध्या वर्षा च्या आत मध्ये सरकार कडे जमा झालेला होता.

  • २०१४- मध्ये लागणारी excise duty

१लिटर पेट्रोल वर excise duty ९ रुपये ४८पैसे लागायची.

१लिटर डिझेल वर excise duty ३रुपये ६५ पैसे लागायची.

  • २०१८- सध्या लागणारी excise duty

१लिटर पेट्रोल वर excise duty १९ रुपये ४८पैसे तर

१लिटर डिझेल वर excise duty १५ रुपये ३३ पैसे अशी लागते.

  • २०१३-मध्ये कच्या तेलाची एक बॅरल $११८ ला मिळायची. तेव्हा Excise duty कमी होती.
  • २०१८-मध्ये कच्या तेलाची एक बॅरल $८० ला आहे. तर excise duty जास्त आहे.

उदा.-कच्या तेलापासून तयार झालेल्या पेट्रोल ची किंमत ३६-३७ लिटर असेल, तर त्यात केंद्र सरकारची १९ रुपये excise duty अधीक राज्य सरकारची जवळपास १४ रुपये VAT लागलेला असतो. तर त्यात अजून डीलर ३-४ रुपये कमिशन लावतो. म्हणजे आपण एकूण ३७ रुपये फक्त टॅक्सचे देतो. पेट्रोल च्या किंमती पेक्षा जास्त आपण त्याच टॅक्स भरतो.

पेट्रोल GST मध्ये आणले तर..?

यामध्ये सरकारचे नुकसान आहे. कारण सरकारचे सर्वात जास्त इनकम पेट्रोल, डिझेल मधून होते.

  • GST ही ५%,१२%,१८%,आणि २८% मधेच लावता येत.
  • १२%GST लावली तर पेट्रोल ची किंमत अर्धीच होईल. आणि २८% लावली तर ती luxury मानली जाईल.
  • पेट्रोल व डिझेल हे luxury नाहीत. म्हणून त्यावर २८% GST लागू होत नाही.
  • पेट्रोल व डिझेल वर १२% पेक्षा जास्त GST नाही लावू शकत.
  • जर १२% GST लावून त्यात डीलर च कमिशन ऍड जरी केलं तरी ते आपल्याला आजच्या किंमती पेक्षा खूप कमी दरात मिळेल. त्यात सरकारच नुकसान आहे, म्हणूनतर सरकार पेट्रोल व डिझेल ला GST मध्ये आणत नाहीयेत.

अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.

धन्यवाद….

  • सागर राऊत

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻