कांदा उत्पादक शेतकऱ्यंसाठी खूप आनंदाची बातमी 350 रुपये प्रत्येकी क्विंटल सबसिडी
Onion Subsidy Maharashtra : कांदा उत्पादनावर शेतकऱ्याना आता मिळणार 350 रुपये सहानुग्रह अनुदान. राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी या अर्थसंकल्प अधिवेशनात याबाबत मोठी घोषणा करण्याचं ठरवलं होतं.
त्यांनी आता विधानसभेत घोषणा करत म्हंटले आहे. राज्यातील सर्व कांदा शेतकऱ्यांना सरकार तर्फे 350 रुपये सानुग्रह (सबसिडी) अनुदान देण्यात येईल.
या बदलत्या वातावरना मुळे शेतकरी खूप संकटात सापडला आहे. कधी त्याला अवकाळी पावसाचा सामना करावा लागतो.तर कधी गार पिटीचा.
या सर्व मध्ये त्याच्या जवळ निसर्गा सोबत लडण्यासाठी साहित्य सुद्धा उपलब्ध नाही. या सर्व गोष्टी मुळे कंटाळलेल्या शेतकऱ्या साठी हि घोषणा एक दिलासा आहे.
विरोधी पक्ष कांदा शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत होते. कांदा या पिकाला एक आधारभूत किंमत मिळावी असे विरोधी पक्षाचे म्हणणे होते. याच दरम्यान आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी ही महत्वाची घोषणा करून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. व शेतकऱ्यांना एक दिलासा दिला.
मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात म्हंटले कांदा हे पीक नाशवंत असल्यामुळे, त्याला आधारभूत किंमत ही लागू करता येत नाही.
कांदा हे पीक एक नगदी पीक आहे. आणि कांद्याचा भाव हा निर्यात नाही आयात वर निर्भर करतो अश्याच गोष्टी मुळे या वर्षी कांद्याचे भाव हे येवढ्या खाली गेले.
शेतकऱ्याच्या लाल कांद्याला बाजारात सध्या भाव आहेत. महाराष्ट्र मध्ये खरीप व रब्बी या दोन्ही कालावधीत कांदा हा पेरला जातो व मोठ्या प्रमाणावर त्याचे उत्पादन घेतले जाते. बाजारातील ग्राहकांची मागणी लक्षात घेता कांदा खरेदी करणे सुरू आहे.
माननीय एकनाथ शिंदे आपल्या भाषणात आणखी पुढे म्हणाले, आम्ही नाफेड मधून सुद्धा कांदा खरेदी करत आहोत.
कांद्याला अनुदान हे 2016 मध्ये 100 रुपये अनुदान सरकार देत होते. 2017 मध्ये हा आकडा वाढवून 200 रुपये करण्यात आला. आता या वर्षी शेतकऱ्याच्या अडचणी व पुढील इलेक्शन पाहून 350 करण्यात आले आहे.
भेट दिल्याबद्दल आभारी आहोत. अश्याच महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्याकरिता आमच्या ग्रूप ला जॉईन करा.
हे वाचलंत का ? –