ओट्स (Oats) हे तृणधान्य गटातील पीक आहे. ओट्स ओटमील आणि रोल्ड ओट्स म्हणून मानवी वापरासाठी योग्य आहे, तसेच पशुखाद्य म्हणूनही ओट्स चा वापर होतो. ओट्स समशीतोष्ण ठिकाणी उगवले जातात. ओट्स प्रथिने, जीवनसत्व ब, तंतुमय पदार्थाचे उत्तम स्रोत आहे.
या लेखात, आपण ओट्स चा वापर, फायदे आणि नुकसान बघणार आहोत. चला तर बघूया ओट्स म्हणजे काय आणि दैनंदिन आहारामध्ये आपण ओट्स चा वापर कसा करू शकतो.
ओट्स म्हणजे काय? (Oats marathi)
oats meaning in marathi
आपल्याकडे जसं गहू, ज्वारी, बाजरी अशी धान्यं पिकतात, तसं ओट्स हे युरोपमध्ये पिकणारं एक धान्य आहे आणि ते कमी तापमान असलेल्या ठिकाणी वाढतं. हे वार्षिक पीक आहे. ओट्स मध्ये गहू, राई सारख्या इतर धान्यांपेक्षा पावसात जास्त टिकून राहायची क्षमता असते.
हे वाचलंत का? – * पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहार तक्ता * पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय |
ओट्स चा परिचय
ओट्सचा समावेश हेल्दी पदार्थांमध्ये होतो. कारण यात तंतुमय पदार्थ असतात. जे रक्तातील कोलेस्ट्रोल कमी करण्यास मदत करतात. तसेच ओट्समध्ये ग्लूटेनचे प्रमाण आढळत नाही. ओट्सचे अन्नामध्ये अनेक उपयोग आहेत. ओटमील, लापशी, उपमा/उपीट म्हणून ओट्स खाल्ले जातात.
तसेच ओटकेक्स, ओटमील कुकीज, ओटब्रेड, मुसली आणि ग्रॅनोला मध्ये देखील वापरले जातात. जेव्हा अतिरिक्त कार्बोहायड्रेट्स आणि उर्जेमध्ये वाढ आवश्यक असते, तेव्हा ओट्सचा वापर सामान्यतः घोड्यांसाठी खाद्य म्हणून केला जातो.
ओट्सच्या उत्पादनाची सुरवात स्कॉटलंडला झाली असली तरी वाढती मागणी बघून आता हे पीक जवळपास सर्वत्र होत. कॅनडा, पोलंड, चीन, रशिया, ऑस्ट्रेलिया, यूएसए, फ्रान्स आणि भारतामध्येही पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि ओरिसा राज्यात हे पीक घेतल्या जाते.
ओट्स चे प्रकार
ओट्सचे बारीक तुकडे विविध प्रकारचे ओट्स तयार केले जातात. ओट्स त्याच्या वापराच्या आधारावर 6 भागांमध्ये विभागले गेले आहेत.
१. ओट ब्रॅन (Oat bran) :
ह्या प्रकारचे ओट्स तांदुळाच्या दाण्याप्रमाणे आवरणात असतात.
२. ओट ग्रोट्स (Oat Groats) :
ह्या प्रकारचे ओट्स आवरणातुन काढून भातासारखे शिजवले जातात.
३. स्टील कट (Steel-Cut) :
या प्रकारच्या ओट्स धान्याचे २-३ भाग करून बनवले जाते.
४. स्कॉटिश ओट्स (Scottish Oats) :
हे ओट्स स्टील कट प्रमाणेच कापले जातात, परंतु यावेळी अतिशय बारीक, लहान तुकड्यांमध्ये कापले जातात.
५. रोल्ड (Rolled) :
यामध्ये आवरणात असलेले ओट्स वाफेवर शिजवले जातात.
६. इन्स्टंट (Instant) :
यामध्ये आवरणात असलेले ओट्स वाफेवर जास्त वेळ शिजवले जातात.
ओट्स मधील पोषकतत्व
१०० ग्रॅम ओट्स मध्ये खालील प्रमाणात पोषकतत्व असतात.
प्रथिने (protein) | 16.89 ग्रॅ |
चरबी (Fat) | 6.90 ग्रॅ |
कर्बोदक (Carbohydrate) | 66.27 ग्रॅ |
फायबर (fiber) | 10.6 ग्रॅ |
विटामिन- बी6 (vitamin B6) | 0.119 मिग्रॅ |
थायामिन (Thiamine) | 0.763 मिग्रॅ |
रिबोफ्लेविन (Riboflavin) | 0.139 मिग्रॅ |
नियासिन | 0.961 मिग्रॅ |
कॅल्शियम (calcium) | 54 ग्रॅ |
फास्फोरस (Phosphorus) | 523 मिग्रॅ |
पोटॅशियम (potassium) | 429 मिग्रॅ |
लोह (Iron) | 4.72 मिग्रॅ |
मॅग्नेशियम (magnesium) | 77 मिग्रॅ |
सोडियम (sodium) | 2 मिग्रॅ |
जस्त (zinc) | 3.97 मिग्रॅ |
oats in marathi
oats meaning in marathi
ओट्स खाण्याचे फायदे
१. हृदय रोग
ओट्समध्ये बीटा-ग्लूकेन फायबर असतो जो कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतो. यामुळे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.आणि हृदय निरोगी राहते. ओट्समध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट (Antioxidant), व्हिटॅमिन सी (Vitamin C ), व्हिटॅमिन ई (Vitamin E ), हृदय निरोगी ठेवण्यास फायदेशीर आहे.
२. मधुमेह
फायबर युक्त अन्न पचायला वेळ लागतो, ज्यामुळे रक्तातील साखर आणि टाइप -२ मधुमेहाचा धोका कमी होतो. त्यामुळे मधुमेहाने ग्रस्त लोकांनी ओट्सचे नियमित सेवन करावे. ओट्सचे सेवन या रुग्णांमध्ये ग्लुकोज आणि लिपिड प्रोफाइल नियंत्रित करते. त्यात आढळणारे बीटा ग्लुकेन रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यासही मदत करते.
3. कॅन्सर
ओट्समध्ये अँटीऑक्सिडेंट (Antioxidant) भरपूर असतात. हे अँटीऑक्सिडंट्स (Antioxidant) कर्करोगाशी लढण्यास मदत करतात. ओट्समध्ये असलेले विशेष तंतू (fiber) रेक्टल आणि कोलन कर्करोग रोखण्यात मदत करतात. ओट्सच्या नियमित सेवनाने आतड्यांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
४. वजन कमी करण्यास उपयुक्त
यात तंतुमय पदार्थ जसं, की सोल्युबल फायबर किंवा विरघळणारे तंतुमय पदार्थ असतात. तंतुमय पदार्थ पोटात खूप वेळ राहत असल्यानं लवकर भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करताना याचा उपयोग होतो.
५. बद्धकोष्ठता
ओट्स आणि ओटमील फायबरने भरलेले आहे, जे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते. ओट्स हे अघुलनशील फायबरचे चांगले स्त्रोत आहेत. जे शरीरातील अतिरिक्त पाणी शोषण्यास मदत करते जे मल आतड्यांमध्ये हलण्यास मदत करते. हे सूज, गॅस आणि अतिसार देखील प्रतिबंधित करते.
६. रक्तदाब नियंत्रित करण्यास उपयुक्त
ओटमील उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते. ओट्सच्या नियमित सेवनाने, रक्तदाब देखील सामान्य पातळीवर नियंत्रित केला जाऊ शकतो. काही संशोधनानुसार, ओट्सचा दररोज वापर केल्याने सिस्टोलिक रक्तदाब सुमारे 7.5 गुणांनी कमी होतो आणि डायस्टोलिक रक्तदाब सुमारे 5.5 गुणांनी कमी होतो.
७.रोग प्रतिकार क्षमता वाढ
ओट्समध्ये आढळणारे बीटा-ग्लुकेन शरीराच्या प्रतिकारशक्तीच्या पातळीला अशा प्रकारे वाढवते की पांढऱ्या रक्तपेशींची क्रिया वाढते आणि रोगांपासून बचाव होतो. ओट्समध्ये सेलेनियम आणि जस्त असतात जे संक्रमणाशी लढण्यात महत्वाची भूमिका बजावतात. या व्यतिरिक्त, जखमा जलद भरणे, प्रतिजैविकांचा प्रभाव वाढवणे इत्यादींमध्ये बीटा ग्लुकेनची उपस्थिती देखील महत्त्वपूर्ण आहे.
८. इतर उपयोग
ओट अर्क त्वचेविकारांवर उपचार म्हणून औषधामध्ये वापरले जाऊ शकतो आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये त्यांच्या सौम्य गुणधर्मांसाठी लोकप्रिय आहेत. ओट गवत पारंपारिक औषधीमध्ये वापरल जाते.ओट्समध्ये फायबर आणि मॅग्नेशियम आढळतात ज्यामुळे मेंदूमध्ये सेरोटोनिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे मेंदू शांत राहतो.
तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी हे उपयुक्त आहे. एमिनो ऍसिड आणि इतर पोषक मेलाटोनिन नावाचे रसायन तयार करण्यास मदत करतात, जे चांगली झोप घेण्यास मदत करते.
ओट्स खाल्याने होणारे नुकसान
ओट्स खाण्यात फारसे नुकसान नाही, ते योग्य प्रमाणात खाल्यास फायदेशीर आहे.
- ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी ओट्स चा कमी वापर करावा किंवा करूच नये कारण हे पोटभरीचं असल्यामुळे परत लवकर भूक लागत नाही.
- जर तुम्हाला पचनासंबंधी समस्या असतील तर ओट्सचे सेवन टाळा, अन्यथा गॅस आणि पोटात ढेकर येण्याच्या तक्रारी असू शकतात.
- बाजारात उपलब्ध असलेल्या ओट्समध्ये कृत्रिम साखर असू शकते जी मधुमेही रुग्णांसाठी हानिकारक आहे.
- ओट्समध्ये ग्लूटेन नसते, परंतु जर ते गहू आणि बार्लीसह शेतात होत असतील तर त्यात ग्लूटेन असण्याची काही शक्यता आहे. ग्लूटेन युक्त ओट्स खाल्ल्याने डायरिया, पाठदुखी सारख्या समस्या होऊ शकतात.
- कमी पोषक घटक असलेले अधिक ओट्स खाल्ल्याने अशक्तपणा, नखांची कमी वाढ, झोपेच्या समस्या उद्भवू शकतात.
ओट्स बद्दल विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)
Q.1 ओट्स कधी खावेत?
Ans – शक्यतोवर नाश्त्याला ओट्स खावेत. यामध्ये तंतुमय पदार्थ असतात. तंतुमय पदार्थ पोटात खूप वेळ राहत असल्याने लवकर भूक लागत नाही.
Q.2 लहान मुलांना ओट्स देणे योग्य कि अयोग्य
Ans – मुलांना ओट्स देणं चांगलं असलंतरी ते खूप पोटभरीचं असल्यामुळे त्यांना इतर पदार्थ खायला भूक राहणार नाही म्हणून पूर्णपणे ओट्सचा नाश्ता न देता त्यांच्या आहारात थोड्या प्रमाणात विविध रेसिपींत ओट्सचा समावेश करू शकतो.
Q.3 ओट्स समावेश आहारात कसा केला जाऊ शकतो ?
Ans – आपण ओट्स चे धीरडे, उपीट किंवा उपमा बनवू शकतो. तसेच हिरव्या पालेभाज्या टाकूनसुध्दा ओट्स बनवू शकतो. बाजारात इन्स्टंट ओट्स मिळतात जे इतर काहीही न टाकता फक्त शिजवून घेऊ शकतो.
Q.4 भारतात ओट्स चे पीक कुठे होत ?
Ans – भारतात पंजाब, हरियाणा, ओरिसा पश्चिम बंगाल या राज्यात ओट्स चे पीक होत ?
Q.5 ओट्स बाजारात कसे मिळतात ?
Ans – ज्याप्रमाणे आपण गहू किंवा इतर धान्यं किलोवर दुकानातून घेत असतो, तसे ओट्स मिळत नाहीत. ते वेगवेगळ्या ब्रँडच्या नावाखाली मिळतात. विविध कंपन्या वेगवेगळ्या जसं, की तिखट, गोड, मसाला अशा स्वरुपात ओट्स देतात. साधे ओट्सही मिळतात. ते आपण विविध रेसिपीत वापरू शकतो.
Q.6 ओट्स कोणते धान्य आहे?
Ans – ओट्स हे ओटच्या धान्यापासून म्हणजेच एव्हेना सॅटिवापासून बनवले जाते आणि दलिया गव्हापासून बनवला जातो. दोन्ही एकाच प्रक्रियेने शिजवले जातात. दोन्हीमध्ये मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी-6 चांगल्या प्रमाणात आढळतात. दोन्हीमध्ये कमी उष्मांक असल्यामुळे, लोक शरीर बारीक आणि निरोगी ठेवण्यासाठी ते दोन्ही खातात.
Q.7 चेहऱ्यावर ओट्स लावल्यास काय होते?
Ans – खरं तर, ओट्समध्ये अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे कोरड्या आणि इरिटेटिड त्वचेमुळे होणारी खाज कमी करण्यास मदत करतात.
Q.8 मी दररोज चेहऱ्यावर ओट्स लावू शकतो का?
Ans – होय, दररोज आपल्या चेहऱ्यावर ओटचे जाडे भरडे पीठ लावू शकता. ओटचे जाडे भरडे पीठ एक नैसर्गिक घटक आहे आणि त्यात कोणतेही रासायनिक प्रक्रिया केलेले किंवा कृत्रिम घटक नसतात. तुम्ही कोणत्याही व्यावसायिक उत्पादनाचा वापर करण्यापेक्षा हा एक चांगला आणि अधिक प्रभावी उपाय आहे.
Q.9 ओटमील (Oatmeal) पावडर म्हणजे काय?
Ans – ओट्स हे धान्याचा एक प्रकार आहे. या ओट्सपासून तयार होणाऱ्या अन्नाला ओटमील (Oatmeal) म्हणतात.
Q.10 ओट्सचा फेस पॅक कसा बनवायचा?
Ans – ओटमील फेस पॅक बनवण्यासाठी काही कच्चे ओट्स बारीक करून घ्या. एका भांड्यात एक चमचा ओट्स पावडर घ्या आणि त्यात काही ताजे कोरफडीचे जेल घाला. ते एकत्र मिक्स करा आणि इथे तुमचा कोरफडी आणि ओट्सचा फेस पॅक वापरण्यासाठी तयार आहे. ते संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे तसेच राहू द्या.
ओट्स म्हणजे काय? हे आर्टिकल तुम्हाला कसे वाटले. आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. अश्याच छान छान माहितीसाठी माहिती लेक ला अवश्य भेट देत राहा..!
- मृणाली आकोलकर
महत्वाची सूचना – हे आर्टिकल तुम्हाला ओट्स बद्दल माहिती देणे असल्याकारणाने ओट्स चा वापर आरोग्यासाठी करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा आहे. इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल. धन्यवाद…
माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.