‘नातू-नातू’ गाण्याने सर्वोत्कृष्ट गाण्याचा ऑस्कर 2023 पुरस्कार जिंकला.!

हॉलिवूडच्या सर्वात मोठ्या अवॉर्ड शोमध्ये भारताचे नाव उंचावले आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट ‘RRR’ मधील ‘नातू-नातू’ या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा ऑस्कर 2023 पुरस्कार जिंकून परदेशात भारताचा गौरव केला आहे. ‘नातू-नातू’ला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याने देशभरात तसेच वाराणसीत आनंदाची लाट उसळली आहे.

RRR चे नातू नातू हे गाणे सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. नातू नातूने 15 गाण्यांवर बाजी मारत ha पुरस्कार जिंकला आहे. पुरस्कार जिंकल्यानंतर निर्मात्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी RRR च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून RRR आणि ‘द एलिफंट व्हिस्पर्स’च्या निर्मात्यांचे अभिनंदन केले. ‘विलक्षण! ‘नातू नातू’ची लोकप्रियता जागतिक आहे. हे असे एक गाणे आहे, जे पुढील अनेक वर्षे स्मरणात राहील. या प्रतिष्ठित सन्मानासाठी एमएम कीरवानी आणि चंद्रबोस यांच्यासह संपूर्ण टीमचे अभिनंदन केले व म्हणाले कि, यामुळे भारत आनंदी आणि अभिमानास्पद आहे.

आरआरआर गाण्यासाठी ऑस्कर अवॉर्ड मिळणे ही मोठी गोष्ट

या चित्रपटात ट्विंकल शर्माने बालकलाकार म्हणून काम केले आहे. ट्विंकल शर्मा म्हणाली की, एका भारतीय चित्रपटाने काही वर्षांनंतर ऑस्कर पुरस्कार पटकावला ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

आपली मुलगी ऑस्कर जिंकणाऱ्या चित्रपटात काम करणार आहे, याची कल्पनाही त्यांच्या वडिलांनी केली नव्हती. त्याच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आरआरआर या भारतीय चित्रपटातील गाण्यासाठी ऑस्कर पुरस्कार मिळणे, ही मोठी गोष्ट आहे. या चित्रपटात मुलीचे छोटे पात्र असले, तरी संपूर्ण चित्रपटाची कथा याच आधारे लिहिली गेली आहे. ट्विंकलने या चित्रपटात उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला असून देशभरातील लोकांनी ट्विंकलच्या कामाचे कौतुक केले आहे.

Share