नवरदेवाची मराठी कॉमेडी उखाणे

माहिती लेक मध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे, हि पोस्ट वाचताय म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनसंगणीचे प्रेम इथवर खेचून आणलेले आहे.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि, तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात. या आर्टिकल मध्ये आम्ही १०० पेक्षा जास्त मराठी उखाणे यांचा समावेश केलेला आहे. आशा करतो कि, तुम्हाला हे ukhane in marathi for male हे नक्कीच आवडेल. खाली दिलेल्या उखाण्यांमध्ये आम्ही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. फक्त तेथे तुमच्या सौभाग्यवती चे नाव टाकायचे बास. आहे ना सोप्प चला तर मग….. Marathi Ukhane

Comedy Marathi Ukhane for Male

उखाणे मराठी कॉमेडी

Marathi ukhane for male। उखाणे मराठी

  • जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने !
  • सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, ..…..मला मिळाली आहे अनुरूप !
  • संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ….…चे नाव घेतो सर्वजण ऐका !
  • दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !
  • मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, …….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा !
  • पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, ….…च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार !
  • मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदा, …….चे बरोबर बांधली जीवन गाठ !
  • पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे, .……चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे !
  • नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, …..झाली आज माझी गृहमंत्री !
  • श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी, ..…..च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी !
  • सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात, …….चे नाव घेतो….च्या घरात !
  • टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा, …….चे नाव घेतो. सर्व जयहिंद म्हणा !
  • चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ……चे नाव घेऊन सोडतो कंकण !
  • ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ……चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल !
  • निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी, .……चे नावं घेतो….च्या घरी !
  • रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन, ……च्या साथीने आदर्श संसार करीन !
  • अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर, .…..माझी सर्वांपेक्षा सुंदर !
  • एक होती चिऊ, एक होता काऊ, ……..चे नाव घेतो डोक नका खाऊ !
  • निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, ……चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान !
  • उगवला सुर्य मावळली रजनी, ……चे नाव सदैव माझ्या मनी !
  • कोरा कागज काळी शाई, ..….ला रोज देवळात जाण्याची घाई !
  • हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी …..नाजुक जसे गुलाबाचे फुल !
  • सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करु सुखाचा, …..तु, मी आणि एक मुल !
  • कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास, ……देतो मी लाडवाचा घास !
  • जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध, ……च्या सहवासात झालो मी धुंद !
  • उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, नवनांचा हार ……च्या गळ्यात !
  • तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल, ……चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल !

ukhane / ukhane in marathi for male


  • प्रसन्न वदनाने आले रविराज, ……ने चढविला संसाराला स्नेहाचा साज !
  • मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, …..बरोबर बांधली जीवनगाठ !
  • जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार रथावर…..सारथी !
  • हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी, ……च्या जीवनात मला आहे गोडी !
  • चंद्रला पाहून भरती येते सागराला, ……ची जोड मिळाली माझ्या जीवनाला !
  • निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान, …..चे नावघेऊन राखतो सर्वाचा मान !
  • नंदनवनात अमृताचे कलश, …..आहे माझी खुप सालस !
  • देवाला भक्त करतो मनोभारे वंदन, ……मुळे झाले संसाराचे नंदन !
  • भाजीत भाती मेथीची, …..माझी प्रितीची !
  • दही चक्का तुप, …..आवडते मला खुप !
  • हिरळीवर चरती सुवर्ण हरिणी, ……झाली आता माझी सहचारिणी !
  • आंथरली सतरंजी त्यावर पांघरली शाल, ……रावांच्या जीवनात… राहील खुशाल !
  • आंब्याच्या झाडावर बसुन कोकीळा करी कुजन, माझ्या नावाचे…..करी पुजन !
  • श्रीकृष्णाने केला पण रुक्मीणीलाच वरीन, …..च्या सोबत आदर्श संसार करीन !
  • चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या फौजा, ……रावाच्या जीवावर … मारते मौजा !
  • सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली, …..राणी माझी घरकामाता गुंतली !
  • श्रावण महीन्यात प्रत्येक वारी सण, …..ला सुखात ठेवीन हा माझी पण !
  • नंदनवनीच्या कोकिळा बोलती गोड, …..राणी माझा तळहाताचा फोड !
  • स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाणे वाढविली शान, …..चे नाव घेतो ठेऊन सर्वाचा मान !
  • काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध, …..सोबत जीवनात मला आहे आनंद !
  • अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा, .….ला घास घालतो वरण-भात-तुपाचा !
  • देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले, …..शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले !
  • बहरली फुलांनी निशीगंधाची पाती, …..चे नाव घेतो लग्नाच्या राती !
  • आपल्या देशात करावा हिन्दी भाषेचा मान, ..…चे नाव घेतो ऐका सर्व देऊन कान !
  • देवळाला खरी शोभा कळसाने येते,…..मुळे माझे गृहसौख्य दुनावते !
  • मातीच्या चुली घालतात घरोघर, …..झालीस माझी आता चल बरोबर !
  • देवा जवळ करतो मी दत्ताची आरती, …..माझ्या जीवनाची सारथी !
  • पुढे जाते वासरु, मागुन चालली गाय, …..ला आवडते नेहमी दुधावरची साय !
  • संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी,…..मुळे लागली मला संसाराची गोडी !
  • नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व, …..आहे माझे जीवन-सर्वस्व !
  • रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे, …..ला पाहून चंद्र-सुर्य हसे !
  • पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, …..चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले !
  • ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, …..चे नाव घेतो तुमच्या साठी स्पेशल !

marathi ukhane for male romantic / उखाणे मराठी


  • हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात, …..च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात !
  • श्रीगणेशाच्या भेटीसाठी गौरी येतील नटून,……माझ्या संसारात आल्याने मी गेलो फुलून !
  • शंकरा सारखा पिता अन् पार्वती सारखी माता, …..राणी मिळाली स्वर्ग आला होता.
  • नभांगणी दिसे शरदाचे चांदणे, …..चे रुप आहे अत्यंत देखणे.
  • भारत देश स्वतंत्र झाला, इंग्रज गेले पळून, …..चे नाव घेतो जरा पहा मागे वळून !
  • नाशिकची द्राक्षे नागपूर ची संत्री, …..आज पासुन माझी गृहमंत्री.
  • दारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी…..व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.
  • आंबागोड, उस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड, ……चंनाव आहे अमृतापेक्षा ही गोड.
  • श्रावण मारती भुदेवीने पांघरली हिरवी शाल, …..गेली माहेरी की होतात माझे हाल.
  • … माझे पिता … माझी माता, शुभमुहूर्तावर घरी आणली … ही कान्ता.
  • मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा,…..चे नाव घेतो निट लक्ष ठेवा.
  • आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर, …..च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.
  • चांदीच्या ताटात, रुपया वाजतो खणखण, …..चे नव घेऊन सोडतो आता कंकण.
  • सीतेसारखे चारीत्र्य, रंभेसारखे रुप, …..मिळाली आहे मला अनुरुप.
  • काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात, प्रथम दर्शनीच भरली… माझ्या मनात,
  • रुप्याचा लोटा सोन्याची झारी, असली काळीसावळी तर …..माझी प्यारी.
  • आंबा खोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, ……नाव आहे अमृतापेक्षाही गोड.
  • चंद्र आहे रोहिणीचा सोबती,……माझी जीवन साथी.
  • सत्यनारायणाची पूजा जोडीने केली, …..नाव घ्यायला घाई-घाई झाली.
  • सायंकाळच्या आकाशाच्या निळसर रंग, पण, .…आहे घरकामात दंग.
  • आंबेवनात कोकीळा गाते गोड, ….आहे माझ्या तळहाताचा फोड.
  • शंकरासारखा पिता गिरजेसारखी माता, ……राणी मिळाली स्वर्ग आला हाता.

marathi ukhane for navardev / ukhane for men


  • श्रावण महिन्यात असतात खूप सण, ……सुखात ठेवीन हा माझा पण.
  • निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान, …..च नाव घेऊन राखतो सर्वांचा मान.
  • मायामय नगरी, प्रेममय संसार, ……च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.
  • संसाराच्या सागरात पती-पत्नी नावाडी, ……. ने लावली मला संसाराची गोडी.
  • मुखी असावे प्रेम हातामध्ये दया, ……वर जडली माझी माया.
  • ससाळ पाहिजे वाणी, स्त्री पाहिजे निर्मला, ……च्या नावाचा लागला मला जिव्हाळा.
  • काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध, ……जीवनात मला आहे आनंद.
  • संसाररुपी सुहागरात पती पत्नी नौका, ……..नाव घेतो सर्वजण ऐका.
  • बशीत बशी कप बशी, ……. सोडून बाकी सगळ्या म्हशी.
  • कमळाच्या फुलांचा हार लक्ष्मी च्या गळ्यात, …… नाव घेतो स्त्री-पुरुषांच्या मेळ्यात.
  • वेरुळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर, …..आहे माझी सर्वात सुंदर.
  • रुक्मिनीने पण केला कृष्णाला वरीन, ……च्या साथीने आदर्श संसार करीन.
  • कृष्णाच्या बासरीचा राधेला लागे ध्यास, ……..देतो मी………चा घास.
  • पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने-फुले, ………च नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले.
  • दूधापासून बनते दही, चक्का, तूप, …….. आवडते मला खूप खूप.
  • नंदनवनात अमृताचे कलश,…….. आहे माझी खूप सालस.
  • जुन्या पद्धतीच्या विवाहात, शृंगाराची अनोखी फल,……..चा घास देतो माझ्या प्रिय…….. ला.
  • ………माझे पिता………माझी माता, शुभमुहूर्तावर आणली ………ही कांता,
  • चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ……ना घेऊन सोडतो कंकण,
  • इंद्राची इंद्रायणी दुष्यतांची शकुंतला, ………नाव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला.
  • पाऊस नाही पाणी नाही छपरी कशी गळती, हाण नाही मार नाही, ………कशी रडते.
  • देवळाला खरी शोभा कळसाने येते, ……मुळे माझे गृहसौख्य खुलते / दुणावणे.
  • कळी हसेल फुल उमलले, मोहरून येईल सुगंध, ……..च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद.
  • कश्मिरच्या नंदनवनात गुलाबाचा गंध, …..च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद
  • नीलवर्णी आकाशातून पडती पावसाच्या सरी, ………चं नाव घेतो………च्या घरी.
  • जिजाऊसारखी माता, शिवाजीसारखा पुत्र, ………च्या गळ्यात बांधले मी मंगळसूत्र.
  • उगवला रवी मावळली रजनी, ………चे नाव सदैव वसे माझ्या मनी.
  • जाई जुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध, …..ला म्हटलं चल पिक्चरला स्टँड अप.
  • मुंबई-पुण्याच्या मध्ये आहे शहर लोणावळा, …..ला विचारतो मी आती क्या खंडाळा?
  • रोज….. म्हणून सारखी नावाने हाक मारतेस, ….. काय ग उखाणे घेताना कशाला खोटे लाजतेस !
  • मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, ……बरोबर बांधली जीवनगाठ !
  • विज्ञान युगात माणूस करतो निसर्गावर मात, …… अर्धागिनी म्हणून घेतला हातात हात !

marathi lagnachi ukhane / lagnachi ukhane


  • सत्कर्याची करावी नेहमीच पूजा, ……ला म्हटलं लवकर करूया लग्न आता मीच वाजवतो बॅण्ड बाजा !
  • ऑस्कर पारितोषिकासाठी पिक्चर निवडला श्वास, ….. झाली माझी लाडकी राणी खास !
  • नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व, …… आहे माझे जीवन सर्वस्व !
  • घर असावं नेहमी क्लीन अँड नेट, …… आहे माझी सिम्पल अँड स्वीट !
  • पुण्याहून धडक आली डेक्कन क्वीन, ……झाली माझी साताजन्माची क्वीन !
  • वाट चुकलेल्या वासराला नसतो कोणी धनी, …..चे रूप सदैव असते माझ्या ध्यानीमनी !
  • काळोखी रात्र संपली, धावत आली उषा, ….. च्या सहवासात प्रीतीची चढली नशा !
  • पाऊस पाणी झाले भरपूर, धान्य झाले स्वस्त, ….. आज भेटली नाही जाऊन विचारतो वास्तपुस्त !
  • राजकारणी लोक आणतात खरेपणाचा आव, …..च नाव घेतल्याशिवाय जायचं नाही मित्रांनी केला मज्जाव !
  • पौर्णिमेची रात्र, मंद मंद वाहतो वारा, …..चा स्वभाव मला आज तरी दिसतोय बरा !
  • सातारला गेलो होतो आणला स्पेशल खवा, …..चा सहवास मला नेहमीच हवा !
  • स्वतंत्र भारताची राजधानी झाली दिल्ली, ….. म्हणजे माझ्या रुदय कुलपाची किल्ली !
  • असावी नेहमी हसतमुख, बोलणे असावे गोड, …..च्या प्रीतीसाठी मन घेते ओढ !
  • अंगणामध्ये चिमण्या चिवचिवाट करतात, …..चे हट्ट पुरवताना माझ्या नाकी नऊ येतात !
  • इंग्रजी भाषेमध्ये झोपलेला शब्द आहे हट, …..च्या नावासाठी करू नका कटकट !
  • सोन्याचा कप आणि चांदीची बशी, …..माझी आहे जणू काही उर्वशी !
  • पिवळ्याधमक हापूस आंबा फळांचा राजा, …..च्या प्रीती मध्ये जीव अडकला माझा !
  • भक्ती तेथे भाव, भाव तेथे कविता, …..च्या नावाचा जप करतो येता-जाता !
  • लोकलचा प्रवास करतो फर्स्टक्लास मध्ये बसून, …..ला नेतो हनीमून साठी विमानामध्ये बसवून !
  • असं म्हणतात प्रेम दिल्याने प्रेम वाढते, ….. सारखी पत्नी मिळायला मोठे भाग्य लागते !
  • काळोख्या रात्री आकाशात फुलल्या चांदण्या, ….. शी लग्न करण्यासाठी केल्या दाताच्या कण्या !
  • मोबाईल घेतला नवीन सारखे करतो एस एम एस, ….. आज झाली माझी मिसेस !
  • दारातल्या मोगर्‍याचा चढवला मांडवावर वेल, ……च्या साथीने संसारात आहे ऑल वेल !
  • नक्षीदार बाऊलमध्ये ठेवल्या आंब्याच्या फोडी, …..च्या सहवासात रात्र झाली थोडी !
  • अहो, वाट पहात होतो कितीतरी दिवस, दाद देईना कसली, पण आज मात्र….. माझ्या जाळ्यात फसली !
  • नेहरुंच्या शर्टवर लाल गुलाबाचे फुल, ….. च्या सौंदर्याचे पडली मला भूल !
  • एरवी सारखा बडबडतो, उडतो जसा फुटाना, ….. च नाव घ्यायला आठवत नाही उखाणा !
  • नाव घ्या, नाव घ्या, नावात काय?, …..ला म्हटलं तू तर माझी ऐश्वर्या राय !
  • श्री कृष्णाचे नाव घेतले की आठवते त्याची बासरी, ….. रानी माझी आहे अगदी हसरी !
  • नाव घे, नाव घे, आग्रह करू नका, …..च नाव घेण्याचा प्रसंग आलाय बाका !
  • भाजीत भाजी मेथीची, ……….. माझ्या प्रीतीची !
  • घटका गेली पळे गेली राम का हो म्हणाना, ………..चे नाव घेतो, थांबवा आता ठणाणा !
  • विड्या तोडल्या, मुठी सोडल्या, चुळा टाकल्या भरून, नाव घेण्याची भुणभुण उरली टाकतो …….. म्हणून हुंडा नाही, करणी नाही, नाही पोषाख दिला, माझ्या …………माहेरच्यांनी मला ‘मामा’ च केला !
  • चंद्राला पाहून भरती येते सागराला, …..ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला !
  • नावामध्ये आहे काय? नका हट्ट धरू , माझा उखाणा जुळत नाही……..काय ग करू !
  • जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा, सुखी संसारात सौ…..चा अर्धा वाटा !
  • वर मथळा खाली बातमी, वर्तमानपत्री रीती, ………चे नाव घेतो, अजोड आमची प्रीती !
  • नंदनवनीच्या कोकिळा बोलती गोड, ……..राणी माझा तळहाताचा फोड !
  • लाखात दिसते देखणी चेहरा सदा हसरा, …….. च्या रूपापुढे अप्सरेचा ढळेल तोरा !
  • जाईजुईच्या फुलांचा दरवळला सुगंध, ……च्या सहवासात झालो मी धुंद !
  • फुलात फूल मदनबाण, ……. माझी जीव की प्राण !

ukhane for groom / नवरदेवासाठी उखाणे


  • पाण्याच्या हंड्यावर, रुप्याचे झांकण, ……….च्या हातात हि्याचे कंकण !
  • चंद्र आहे चांदणीच्या संगती, आणि….. आहे माझी जीवनसाथी !
  • हिऱ्याचा कंठा मोत्याचा घाट, ……..च्या हौशीसाठी केला सगळा थाट !
  • खडीसाखरेचा खड़ा खावा तेव्हा गोड, ………च्या रूपात नाही कुठेच खोड !
  • गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ, सौ …… ने दिला मला प्रेमाचा हात !
  • चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा, सौ…..चा आणि माझा जन्मोजन्माचा जोडा !
  • जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, ……. च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने !
  • जाईजुईचा वेल पसरला दाट, ….बरोबर बांधली जिवनाची गाठ !
  • हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे, ……मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे !
  • माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप, ……ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप !
  • जाईच्या वेलीला आलाय बहार, …..ला घालतो २५ मे ला हार !
  • एक होती चिऊ आणि एक होता काऊ, …..च नाव घेतो, डोकं नका खाऊ !
  • निळ्या निळ्या आकाशात, चमचमतात तारे, ……च नाव घेतो, लक्ष द्या सारे !
  • आकाशाच्या पोटात, चंद्र, सूर्य, तारांगणे, …..च नाव घेतो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे !
  • आकाशात उडतोय, पक्ष्यांचा थवा, …..च नाव घ्यायला, उखाणा कशाला हवा !
  • प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल, …..च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल !
  • प्रेमाच्या चौकात, किती पण फिरा, शोधून नाही सापडणार,…….सारखा हिरा !
  • एका वर्षात, महिने असतात बारा, ……मुळे वाढलाय, आनंद सारा !
  • ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा, ……मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा !
  • गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा, ……च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा !
  • लहानसहान गोष्टींनीही, आधी व्हायचो त्रस्त, ……आल्यापासून झालंय, आयुष्य खूपच मस्त !
  • माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल, तुमच्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल !
  • मैदानात, खेळत होतो क्रिकेट, …..ला पाहून, पडली माझी विकेट !
  • फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान, ……च्या रूपाने, झालो मी बेभान !
  • तुरीच्या डाळीला, जिऱ्याची फोडणी, बघताक्षणी प्रेमात पडलो,………ची लाल ओढणी !
  • ताजमहाल बनवायला, कारागीर होते कुशल, …..च नाव घेतो, तुमच्यासाठी स्पेशल !
  • दवबिंदूंनी चमकतो, फुलांचा रंग, सुखी आहे संसारात,……..च्या संग !
  • हिरव्या हिरव्या जंगलात, उंच उंच बांबू, मी आहे लंबू आणि ……..किती टिंगू !
  • झुळूझुळू पाण्यात, हळू हळू चाले होडी, शोभून दिसते सर्वांमध्ये, …….व माझी जोडी !
  • मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं, माझं मन रोज नव्याने, …….च्याच प्रेमात पडतं !
  • डोळ्यावरची बट, दिसते एकदम भारी, …….माझी झाल्यापासून, जळतात बघा सारी !
  • सोन्याच्या कपावर, चांदीची बशी, ……समोर फिक्या पडतील, रंभा आणि उर्वशी !
  • एक दोन तीन चार, ……वर आहे, माझे प्रेम फार !
  • मधाची गोडी आणि फुलांचा सुगंध, ……मुळे कळला मला, जीवनाचा आनंद !
  • प्रेमाच्या ओलाव्याने, दुःखं कोरडी झाली, माझ्या जीवनी, चांदणे शिंपीत आली !
  • पाहताक्षणी चढली, प्रेमाची धुंदी, ……मुळे झाले, जीवन सुगंधी !
  • चांदीच्या पैठणीला, सोन्याचा काठ, ……चं नाव घेतो, पुढचं नाही पाठ !

उखाणे मराठी / marathi ukhane


  • चांदीच्या पैठणीला, सोन्याचा काठ, ……चं नाव घेतो, पुढचं नाही पाठ !
  • कावळा करतो काव काव, चिमणी करते चिव चिव, ……चे नाव घेतो, बंद करा टिव टिव !
  • गुलाबी प्रेमाने बनला, प्रेमाचा गुलकंद, ……च्या नावातच, सामावलाय माझा आनंद !
  • चंद्रामुळे येते, विशाल सागराला भरती, …..च्या नुसत्या हसण्याने, सारे श्रम माझे हरती !
  • गालावर खळी, डोळ्यात धुंदी, …..मुळे झाले, आयुष्य सुगंधी !
  • बाहेरच्या जेवणाने पोट बिघडून, व्हायचे आधी जागरण, आता मी खुश, पोटही खुश, …..निघाली सुगरण !
  • केशर-दुधात टाकले, काजू, बदाम, जायफळ, ……चं नाव घेतो, पिडू नका वायफळ !
  • द्राक्षाच्या वेलीला, त्रिकोणी पान, ……चे नाव घेतो, ऐका देऊन कान !
  • डाळीत डाळ, तुरीची डाळ, …….च्या मांडीवर खेळवीन, एक वर्षात बाळ !
  • जुईच्या वेलीवर लागली, सुगंधी नाजूक फुले, …….ने दिली मला, दोन गोड मुले !
  • ती आली की, पैंजण छुम-छुम वाजते, …..माझी, कित्ती गोड लाजते !
  • हत्तीच्या अंबारीला, मखमली झूल…..माझी नाजूक, जसे गुलाबाचे फूल
  • जाई च्या वेणीला, चांदीची तार,……माझी म्हणजे, लाखात एक नार
  • आंब्याला आहे, फळांच्या राजाचा मान,..…चे नाव घेतो, ऐका देऊन कान !
  • नभांगणी दिसे, शरदाचे चांदणे……चे रूप, आहे खूपच देखणे !
  • चांदीच्या ताटावर, सोन्याचे ठसे……ला पाहून, चंद्र-सूर्यही आनंदाने हसे
  • नंदनवनात आहेत, अमृताचे कलश ……माझी आहे, खूपच सालस
  • चांदीच्या कढईत, सोन्याचा झारा……चा स्वभाव, मला खूपच प्यारा
  • संध्याकाळच्या आकाशाचा, पिवळा-केशरी रंग…….माझी नेहमी, घरकामात असते दंग
  • दोन शिंपल्यांच्या कुशीत, वाढतो टपोरा मोती,…….ची व माझी, अशीच राहो अखंड प्रीती
  • उंदीर राहतो, ती जागा असते बीळ , घायाळ करतो ……..च्या, गालावरचा तीळ !
  • ……. आणि माझं नातं, आंबा कैरीची फोड ……आंबट वाटलं आधी जरी, पिकल्यावर मात्र गोड !
  • पौर्णिमेचा चंद्र, आकाशात दिसतो साजिरा……वर शोभून दिसतो, सुगंधी मोगऱ्याचा गजरा !
  • चंद्राला पाहून, भरती येते सागराला……ची उत्तम साथ, मिळाली माझ्या जीवनाला !
  • सनई आणि चौघडा, वाजतो सप्तसुरांत…..च नाव घेतो,……च्या घरात !
  • मस्त लागते आंबटगोड, संत्र्याची फोड, माझ्या…… च बोलणं, मधापेक्षाही गोड !
  • भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी,………ची आणि माझी, लाखात एक जोडी !
  • कृष्णाचे नाव, सारखे माझ्या मुखी,……….ला ठेविन, आयुष्यभर सुखी !
  • माझ्याशी लग्न करायला………झाली राजी, केल मी लग्न,……….झाली माझी !
  • खिशात माझ्या प्रेमाची लेखणी,……….माझी, सगळ्यात देखणी !
  • प्रेमाच्या पाण्याचा घेतला मी घोट,……..च नाव घेतील माझे हे ओठ !
  • सुर्याच्या किरणांचा प्रकाश पडला लख्ख, माझ्या वर ………..चा, पुर्णपणे हक्क !
  • प्रेमाच्या राणात नाचतो मोर,………शी केल लग्न, नशीब माझ थोर !
  • कृष्णाला बघून राधा हसली,……….माझ्या ह्रदयात बसली !
  • गोड मधुर आवाज करी कृष्णाची बासरी,………..ला घेऊन जातो मी तीच्या सासरी !
  • प्रेमाची कविता, प्रेमाचे लेक…….माझी लाखात एक !
  • ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड,………समोर माझ्या, सोण पण लोखंड !
  • छोटीशी तुळस, घराच्या दारी, तूमची …………., माझी जबाबदारी !
  • सुर्योदयाचे सुंदर आहे दृश्य,……….. आली जिवनात, सुंदर झाले आयुष्य !
  • 2 अधिक 2 होतात चार,…….. बरोबर करीन सुखी संसार !
  • रूप तिच गोड, नजर तिची पारखी, शोधूनही सापडणार नाही …….. सारखी !
  • शोभून दिसतो झेंडा, डोंगरा वरती, मी आहे शंकर, ………….. माझी पार्वती !
  • सुंदर झाडावर, कोकीळा गाणी गाती, …….. च्या सुख दुखात मी तीचा साती !
  • सुंदरात सुंदर, प्रेमाचे गाव,……….. समोर लागणार, आता माझे आडनाव !
  • मुलगा झाला मित्राला, नाव ठेवल बालाजी, सुखी ठेवतो………… ला, करू नका काळजी !
  • सुंदर समुद्राच्या, सुंदर लाटा, माझ्या आयुष्यात, ………. चा ही वाटा !
  • कृष्ण भरवतो राधेला, प्रेमाचा घास, ………… च माझ ह्रदय, आणि ……… च माझा श्वास !

Smart Marathi Ukhane Male / Marathi Ukhane for Griha Pravesh


  • सिते साठी रामाणे, रावणाला मारले, …………च नाव, मी ह्रदयात कोरले !
  • श्री रामांसाठी, श्री हनुमान धावले, ……….च्या आयुष्यात टाकतो मंगलमयी पावले !
  • उंच आकाशात, पाखरांचे थवे,…….. चे नाव, कायम ओठी यावे !
  • सुर्योदयाचे, सुंदर ते दृश्य,………शिवाय अधुर माझ आयुष्य !
  • सोण्याचा मुकुट, जरीचा तुरा…….. माझी, कोहिनूर हिरा !
  • दूधाची शाई, शाईच दही……. आली आयुष्यात, आयुष्य झाल मंगलमयी !
  • पक्षांचा थवा, दिसतो छान…… आली जीवनात, वाढला माझा मान !
  • एक दिवा, दोन वाती………. माझी, जीवन साथी !
  • पावसाचे पाणी, नदि मध्ये साठले, माझ्या नावाचे, काळे मणी…… ने घातले !
  • खुपच सुंदर, दत्तांचे मुख, आज पासून, ……..च माझ सुख !
  • एक दिवा, दोन वाती, ……. च्या सुख दुःखात, मी तिचा साती !
  • राधेचा चेहरा, थोडासा हासरा,……. समोर, पैसा पण कचरा !
  • एक दिवा, दोन वात,……… बरोबर करतो, संसारची सुरूवात !
  • स्वरांचा सुर, सुरांची गायिकी,…….. समोर माझ्या, चंद्राची काय लायकी !
  • पोर्णिमेचा चंद्र, असतो गोल,……….समोर माझ्या, पैशाला पण नाही मोल !
  • आकाशात आहे, चंद्राची कोर,…….शी झाले लग्न, नशीब माझे थोर !
  • गर गर गोल, फिरतो भवरा,……..च नाव घेतो, मी तिचा नवरा !
  • लोकांनी आनला, प्रेमाचा आहेर, माझ्या प्रेमात …….., विसरेल तिच माहेर !
  • पुल बांधला, सितेसाठी रामाने, ठेविन मी …….ला मानाने !
  • जंगलात पसरला, चंदनाचा सुगंध,………मुळे आयुष्यात, पसरला आनंद !
  • राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ,……… शिवाय माझ, जीवनच व्यर्थ !
  • पुल बांधला, सितेसाठी रामाने, ठेविन मी……. ला, प्रेमाने !
  • स्वरांचा सुर, सुरांची गायिकी,……..समोर माझ्या, पैशांची काय लायकी !
  • राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ, माझ अपूर्ण आयुष्य, ……. मुळे पूर्ण !
  • राम भरवतो सितेला, प्रेमाचा घास…..च माझ जीवन, आणि…….च माझा श्वास !
  • उसाचा पेर, लागतो गोड, माझ्या आयुष्याला मिळाली, …….. ची जोड !
  • कृष्णाला आहे, राधेची जोड,…………माझी, साखरे पेक्षा गोड !
  • कृष्णाची बासरी, बासरी ची धून, माझ्यासाठी चांगला, ……….. चा पाय गून !
  • सोण्याची बरणी, भरली तूपाने, सूख आल घरात, ……………च्या रूपाने !
  • सोण्याची बरणी, भरली तूपाने, लक्ष्मी आली घरात, ……..च्या रूपाने !
  • जंगलात पसरला, मोगर्याचा सुहास ……..बरोबर करेन, प्रेमाचा प्रवास !

marathi ukhane for male romantic / marathi ukhane


  • जय घोश होऊदे , श्री रामाच्या नावाचा,…….. समोर माझ्या, स्वर्ग काय कामाचा !
  • कृष्ण भरवतो राधेला, प्रेमाचा घास,…………..च नाव घेतो ,तूमच्यासाठी खास !
  • सोण्याचा दिवा, कापसाची वात, आयुष्य भर देईन, ……… ची सात !
  • फुलांच्या बागेत, वेल जुई चा,………च नाव घेतो, मान ठेवून आई चा !
  • सोण्याची वाटी, सोण्याच ताट,…….येण्याने आली, सूखाची लाट !
  • सितेसाठी रामाने , रावनाला मारले,………च्या येण्याने, जीवनच बहारले !
  • पाण्या शिवाय झाड, जगणार नाही,………….. शिवाय मला, जमणार नाही !
  • आंब्याच्या वनात , मोर नाचतो छान, आता……च माझा जीव, आणि …… च माझा प्राण !
  • आंब्याच्या वनात, मोर नाचतो छान, नाव घेतो ………च,ठेवून आई बाबांचा मान !
  • सोण्याचा कप, सोण्याची बशी,……. माझ्या, ह्रदया पशी !
  • हिरव्या राणात, गोड ऊस,……….मुळे पडला, प्रेमाचा पाऊस !
  • ऊन पसरले कोवळे, समुद्राच्या लाटेवर, सात देईन…………… ची, आयुष्याच्या वाटेवर !
  • महिना होता श्रावण, पाऊस आला जोरदार,……. च्या सुख दुःखात, मी तीचा जोडीदार !
  • घर होत खुष, बाळाच्या चाहूलांनी, सुख आल घरी,…………… च्या पावलांनी !
  • पिवळ सोण, पांढरी शुभ्र चांदी,…………..ने काढली, माझ्या नावाची मेहंदी !
  • कृष्ण मारतो राधेला, हाक गंमतीने, येऊन पुढचा प्रवास,…………च्या संगतीने !
  • सुंदर प्रेमाचे, सुंदर गाव,………..च्या मेहंदीत, माझे नाव !
  • अतूट असते मैत्री, नात असत घड्ड, पूर्ण करीन सगळे,………….चे हट्ट !
  • सोण्याची बरणी, भरली तूपाने, सून आली घरात, ………. रूपाने !
  • निर्मळ मंदिर, पवित्र मूर्ती, प्रेम माझ फक्त,…………वरती !
  • विठोबा माझा, विटेवर उभा,………..ने वाढवली, घराची शोभा !
  • रूप गोड, नजर पारखी,………..माझी, मोत्या सारखी !
  • निळ आभाळ, कळी माती,………. माझी, जीवन साती !
  • सुंदर समुद्राची, सुंदर लाट,…………शी बांधली, लग्नाची गाट !
  • शेतातले धाण्य, धाण्याचे दळण,……….मुळे आले, सुखाचे वळण !
  • सोण्याचा कप,चांदीची बशी, जोडल नात , ………शी !
  • हिरव गार सोण, पिकवल मातीने, सुखाचा प्रवास करीन,…………. च्या साथीने !
  • मातीच्या चूली, असतात घरोघर, मरणसुध्दा आता, ………… बरोबर !
  • जोतिबा आहे, महाराष्ट्रची शान,………… ने अणली, सुखाची खान !
  • राधे शिवाय, कृष्णला गमेना,……… माझी,सोण्याचा दागिना !
  • पाऊस पडला शेतात, वास येतो मातीला, आयुष्यभर साथ देईन, वचन देतो ………..ला !
  • रूसतो श्री कृष्ण, राधेच्या जाण्याने, सुख आल घरी,…………च्या येण्याने !
  • हिरव्या गार निसर्गाची, ताजी तवानी हवा, सुखी ठेविन ……….. ला, तूम्ही निश्चिंत राहा !
  • हिमालय पर्वतावर, बर्फाचे खडे,……. चे नाव घेतो, आई बाबांपुढे !
  • पवित्र नदीचा, संत प्रवाह, आवडली……….., केला विवाह !
  • अर्जूनाची युक्ती, अर्जूनाचा नेम, सदैव करेन , …………..वर प्रेम !
  • दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,..………चे नाव घेतो, तुमच्या साठी !
  • मैत्रि आणी नात्यात, नसावा स्वार्थ,……….मुळेच माझ्या, जीवनाला अर्थ !
  • द्राक्षाच्या वेलीला, त्रिकोणी पान,………..चे नाव घेतो, राखतो तुमचा मान !
  • जेजुरीचा खन्डोबा, तुळ्जापुरची भवानी,………च नाव घेतो, ती माझी अर्धांगिनी !
  • हरीश्रंद्र राजा, रोहिदास पुत्र, माझ्या नावाचे ……….ने, घालते मंगळसूत्र !
  • जोतिबाच नाव, सदैव माझ्या मुखी,………….. आली घरात, घर झाल सुखी !
  • जंगलात पसरला, चंदनाचा सुगंध,………… आली घरात, झाला आनंद !
  • सुराविना कळला, साज संगीताचा, …….. नावात गवसला, अर्थ जीवनाचा !
  • साजूक तुपात, नाजूक चमचा,……. च नाव घेतो, आशीर्वाद असु दे तुमचा !
  • जाईजुईचा वेल, पसरला दाट,……. बरोबर बांधली, जीवनाची गाठ !
  • पिवळा पितांबर, श्रीकृष्णाच्या अंगावर घातला,……. च्या जीवनासाठी, पुरूष जन्म घेतला !
  • फुलाफळांना बहर आला, गोळा जाहले पक्षी,…….ची माझी जोडी, परमेश्वर साक्षी !
  • देवाजवळ करतो, मी देवाची आरती, ……माझ्या जीवनातील, महत्त्वाची व्यक्ती !
  • काळी माती, हिरवे रान, हृदयात माझ्या,……….स्तान !
  • कोल्हापुरला आहे, महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला, जलेबी चा घास !
  • जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,…….च्या गळ्यात, मंगळसूत्र बांधतो प्रेमाने !
  • दुर्वाची जुडी, वाहतो गणपतीला,……सारखी पत्नी मिळाली, आनंद झाला मला !
  • भाजीत भाजी, मेथीची, ……माझ्या, प्रितीची !
  • आकाशात उडतोय, पक्ष्यांचा थवा, ………..चे नाव घ्यायला, उखाणा कशाला हवा !
  • एका वर्षात, महिने असतात बारा, ………या नावात, सामावलाय आनंद सारा !
  • हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी, सौ…..चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी !
  • संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता, साथ आहे माझ्याबरोबर ……कांता !
  • इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी, सौ….चे नाव घेण्यास लागते डबल फी !
  • चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा, सौ…..चा आणि माझा जान्मोजन्माचा जोडा !
  • चांदीच्या वाटीत दहीभाताचा काला, सौ….चे नाव घेता पहिला आरंभ केला !
  • अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश, सौ….चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !
  • सासूबाई आहेत प्रेमळ, मेहुणी आहे हौशी, सौ…..चे नाव घेताना मला होते ख़ुशी !
  • गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ, सौ….ने दिला मला प्रेमाचा साथ !
  • दवबिन्दुच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग, सुखी आहे संसारात सौ….. च्या संग !
  • आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुजन, सौ…..सोबत करतो मी लक्ष्मीपुजन !
  • बकूळ फुलांचा सदा पडे अंगणी, सौ….. आहे माझी अर्धांगिनी !
  • देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान, सौ…..ने दिला मला पतिराजांचा मान !
  • जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा, सुखी संसारात सौ….. चा अर्धा वाटा !
  • दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती, माझी आणि सौ…..ची अखंड राहो प्रीती !
  • वसंतात दरवळतो फुलांचा सुवास, सौ…..सोबत सुरु केला जीवनाचा प्रवास !
  • दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला, सौ…..सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !
  • सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप, …..मिळाली आहे मला अनुरूप !
  • संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, …..चे नाव घेतो सर्वजण ऐका !
  • रंभा मेनका स्वर्गलोकीच्या अप्सरा,…..चा पायगुण शकुनी खरा !
  • दासांचा दासबोध अनुभवाचा साठा, ….चे नाव घेतो तुमचा मान मोठा !
  • संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता, साथ आहे माझ्याबरोबर ……कांता !
  • चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ………चे नाव घेऊन सोडतो कंकण.
  • निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, …..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान !
  • सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, ………. चे नाव घेतो……..च्या घरात !

marathi ukhane for male / उखाणे मराठी


  • एक होती चिऊ, एक होता काऊ, ……..चे नाव घेतो डोक नका खाऊ !
  • काही शब्द येतात ओठातून, …… चं नाव येतं मात्र हृदयातून !
  • भाजीत भाजी शेपूची,……माझ्या प्रितीची !
  • पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या फार नाजुक !
  • लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,..…ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम !
  • सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप,………..मला मिळाली आहे अनुरूप !
  • गाडीत गाडी डेक्कन क्वीन, ……. आहे माझी ब्युटी क्वीन !
  • संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ……चे नाव घेतो सर्वजण ऐका !
  • दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !
  • मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा !
  • मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,…….चे बरोबर बांधली जीवन गाठ !
  • जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,…….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने !
  • ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल,…..चं नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल !
  • पुरणपोळीत तूप असावे साजूक, ….आहेत आमच्या नाजूक !
  • काही शब्द येतात ओठातून,….चं नाव मात्र येतं हृदयातून !
  • रुप्याचे ताट, त्यावर सोन्याचे ठसे,…चे रूप पाहून चंद्र सूर्य हासे !
  • सीतेसारखे चरित्र, लक्ष्मीसारखे रूप, मला मिळाली आहे…..अनुरूप !
  • संसाररूपी सागरात पतीपत्नीची नौका….चं नाव घेतो सर्वांनी ऐका !
  • आंबा गोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड, …..चं नाव आहे अमृतापेक्षाही गोड !
  • दुर्वांची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !
  • जाई जुईच्या फुलांचा दरवळला सुगंध,…..च्या सहवासात झालो मी धुंद !
  • मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा…..चं नाव घेतो जरा लक्ष ठेवा !
  • नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, …..झाली आज माझी गृहमंत्री !
  • कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास….ला भरवितो श्रीखंडाचा घास !
  • जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …..च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने !
  • सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, ….चे नाव घेतो…च्या घरात !
  • चांदीच्या ताटात रूपया वाजतो खणखण, …..चं नाव घेऊन बांधतो कंकण !
  • रुक्मिणीने केला पण कृष्णालाच वरेन, ….च्या साथीने आदर्श संसार करेन !
  • हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी….नाजूक जसे गुलाबाचे फूल !
  • गुलाबाचे फूल मोहक आणि ताजे,…च्या येण्याने भाग्य उजळले माझे !
  • प्रसन्न वदनाने आले रविराज,…..ने चढविला संसाराला स्नेहाचा साज !
  • काय जादू केली, जिंकलं मला क्षणात, प्रथम दर्शनीच भरली…..माझ्या मनात !
  • मायामय नगरी, प्रेममय संसार, ….च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार !
  • जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी,..….म्हणजे लाखात सुंदर नार !
  • फुलांच्या तोरणात आंब्याचे पान, …च्या रूपाने झालो मी बेभान !
  • …..माझे पिता,….माझी पाता, सुमुहूर्तावर…..आणली माझी कांता !
  • तुरीच्या डाळीला जिऱ्याची फोडणी, बघता क्षणी प्रेमात पडलो ….ची लाल ओढणी !
  • दवबिंदूनी चमकतो फुलांचा रंग, सुखी आहे संसारात…च्या संग !
  • हिरव्या हिरव्या जंगलात, उंच उंच बांबू, मी आहे लंबू आणि….किती टिंगू !
  • मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं, माझं मन रोज नव्याने…च्या प्रेमात पडतं !
  • स्टुलावर स्टूल बत्तीस स्टूल,….एकदम ब्युटीफूल !
  • डोळ्यावरची बट, दिसते एकदम भारी,….माझी झाल्यापासून जळतात सारी !
  • सोन्याच्या कपावर चांदीची बशी…समोर फिक्या पडतील रंभा, उर्वशी !
  • चंद्रामुळे येते विशाल सागराला भरती, …मुळे माझे सारे श्रम हरती !
  • मधाची गोडी, फुलाचा सुगंध,…मुळे कळला मला जीवनाचा आनंद !
  • प्रेमाच्या ओलाव्याने, दुःख झाली कोरडी, …माझ्या जीवनी, चांदणे शिंपीत आली !
  • पाहताक्षणी चढली, प्रेमाची धुंदी, …मुळे झाले जीवन सुगंधी !
  • चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ, …चं नाव घेतो पुढचं नाही पाठ !
  • झुळूझुळू पाण्यात चाले हळूहळू होडी, शोभून दिसते ….आणि माझी जोडी !
  • गोड गोड पुरणपोळीवर घ्यावे भरपूर तूप, ….वर आहे माझं प्रेम खूप खूप खूप !
  • गुलाबी प्रेमाने बनला प्रेमाचा गुलकंद, ….च्या नावातच आहे सारा माझा आनंद !
  • अस्सल सोने चोवीस कॅरेट, …..ची झाले आज माझे मॅरेज !
  • उगवला सूर्य, मावळली रजनी, …..चे नाव सदैव माझ्या मनी !
  • चांदीच्या ताटात जिलबीचे तुकडे, घास भरवतो मरतुकडे तोंड कर इकडे !
  • गुलाबाचे फूल वाऱ्यावर लागते डोलू, दिवसभर सुरू असते….चे गुलूगुलू !
  • नव्या कोऱ्या रूळांवर ट्रेन धावते फास्ट, चल पिक्चरला सीट पकडू लास्ट !
  • अत्रावळ पत्रावळ, पत्रावळीवर होती वांग्याची फोड, हसते गोड पण डोळे वटारायची भारीच तिला खोड !
  • जीवन आहे एक अनमोल ठेवा, ….आणते नेहमी सुकामेवा !
  • चांदीच्या ताटाला चंदनाचा वेढा, आमची ही म्हैस तर मी आहे रेडा !
  • …बिल्डिंग, घराला लावली घंटी, ….माझी बबली आणि मी तिचा बंटी !
  • गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची, ….माझी बायको आहे मोठी लुच्ची !
  • झेंडूचे फूल हलते डुलूडूलू, आमची ही मात्र दिसते डुकराचे पिलू !
  • वड्यात वडा बटाटावडा, …..ला मारला खडा म्हणूनच जमला जोडा !
  • माधुरीच्या अदा, कतरिनाचा रूप, ….ची प्रत्येक गोष्ट भावते मला खूप !
  • …..च्या मैदानात खेळत होतो क्रिकेट, …..ला पाहून पडली माझी विकेट !
  • आकाशाच्या पोटात चंद्र, सूर्य, तारे, .….चं नाव घेतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे !
  • आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, …..चं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा !
  • मातीच्या चुली घालतात घरोघर, …..झालीस माझी आता चल बरोबर !
  • काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध, ….बरोबरच मिळतो सर्व आनंद !
  • श्रावणात पडतो पारिजातकांंचा सडा, ….ला आवडतो बटाटावडा !
  • साखरेचे पोते सुईने उसवले, ….मला पावडर लावून फसवले !
  • वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा !
  • गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट, एकमेकांचे नाव घेतो सोडा आमची वाट !
  • गुढीपाडव्याला केलाय ….ने बदामाचा हलवा, खायला आता सगळ्यांना बोलवा !
  • रांगोळी काढली आहे दारी, दिवा देवापाशी, .….चं नाव घेतो गुढीपाडव्याच्या दिवशी !
  • आजच्या मंगलदिनी राम, सीता, लक्ष्मण परतले अयोघ्यापुरी, ….चे नाव घेऊन उभारतो गुढी !
  • नूतनवर्षाची चाहूल घेऊन आला गुढीपाडवा, तुझ्या आणि माझ्या संसारातला आनंद सदैव वाढावा !
  • गुढीसाठी रेशमी साडी, दारात सुंदर रांगोळी, ….ने केली चविष्ट पुरणपोळी !
  • मांगल्याच्या गुढीला घातल्या साखरेच्या गाठी, ….चे नाव घेतो खास तुमच्यासाठी !
  • मांगल्याचं तोरण, यशाची गुढी, ….सोबत जोडल्या पूर्वीच्या परंपरागत रूढी !
  • राम, लक्ष्मण, सीता त्रिमूर्ती साक्षात, गुढीपाडव्याला, ….चं नाव घेतो, ठेवा लक्षात !
  • देवळाला खरी शोभा कळसाने येते, …..मुळे माझे सौख्य दुणावते !
  • आपल्याकडे सर्वांनी राखावा मराठी भाषेचा मान, ….चं नाव घेतो ऐका लक्ष देऊन कान !
  • नभांगणी दिसे शरदाचे चांदणे, …..चे रूप आहे अत्यंत देखणे !
  • पाण्याने भरला कलश, त्यावर आंब्याची पाने फुले, ….चं नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले !
  • नवग्रह मंडळात शनिचं आहे वर्चस्व,….आहे माझे जीवन सर्वस्व !
  • पुढे जाते वासरू, मागून चालली गाय, …..ला आवडते नेहमी दुधावरची साय !
  • अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा, …..घास भरवतो वरण – भात – तुपाचा !
  • श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण, ….ला सुखात ठेवेन हाच केला आहे पण !

हे वाचलंत का? –

Share