tea quotes in marathi
Tea quotes in marathi

तुम्ही कधी विचार केला की, जगामध्ये चहा नसता तर सकाळची कशी सुरू झाली असती? तुम्ही म्हणाल, चहा च्या जागी अजून काही असते. परंतु चहा नसती.

बरेचसे लोक सकाळची सुरुवात चहाने करतात. त्याशिवाय सकाळ आणि संपूर्ण दिवस काहीसा अपूर्ण वाटतो. असे म्हणतात की, “एकत्र चहा प्यायल्याने इच्छा वाढते.” असे काही क्षण असतात. जेव्हा चहाची चव खूप छान लागते. जसे कि पावसाळ्यामध्ये चहा सोबत भजी. तसेच मित्रांसोबत कानाकोपऱ्यात जाऊन चहा पिणे किंवा मैत्रिणीच्या हाताने बनवलेला चहा पिणे.

चहाचा उगम चीनमधून झाला. नंतर ते जपानमध्ये पोहोचले आणि हळूहळू जगभर पसरले. भारतात चहाचा १९ व्या शतकापासून सुरू झाला. इंग्रज भारतात आले तेव्हा. सध्या चीननंतर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा चहा निर्यात करणारा देश आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत चहाचे मोठे योगदान आहे.

भारतात पंचतारांकित हॉटेल्सपासून अगदी रस्त्याच्या कोपऱ्यातल्या छोट्याशा दुकानापर्यंत चहा मिळतो. चहा हे असे पेय आहे जे 99% पेक्षा जास्त लोकांना आवडते. मुलासमोर दूध आणि चहा ठेवल्यास तो दुधाऐवजी चहा पिण्यास प्राधान्य देईल. चहामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी लोकांना त्याकडे आकर्षित करते. हे सांगणे फार कठीण आहे.

हे वाचलंत का? –
* चहा पिण्याचे फायदे आणि नुकसान
* लाजाळू का लाजतो?

Tea Quotes in marathi

तिळगुळ खाताना
तो खूप गोड बोलायचा
पण चहा पिताना
फक्त मान डोलायचा
चहा सारखं प्रेम केलं होतं तुझ्यावर
सकाळ-संध्याकाळ नाही भेटलो तर डोकं दुखायचं


मिळाली असेल प्रत्येकाला डेट
त्या स्टारबक्स सीसीडी च्या कॉफी मध्ये
पण मला माझं प्रेम सापडलं
त्या रस्त्यापल्याड टपरीवरचा चहा मध्ये


वेळेला सिगारेट तिघात एक चालेल
पण चहा मात्र 3 कपच लागतो
खूप चटके सोसलेल्या वरच कडकपणा येतो
मग तो चहा असो की आयुष्य


किती व्यसन करावे एकाच वेळी
ती पाउस आणि चहा


वेळेला एक कप चहा सुद्धा
खूप सुख देऊन जातो.


ती म्हणाली
Tell Me Three Magical Words
मी म्हणालो
‘चल चहा पाजतो’


चहा एवढं Hot
कोण नाय आपल्या Life मध्ये


राहणारा चहा तो पेल्यात अर्धा
गोडवा आठवणींचा घेऊन येतो सदा


सकाळचा चहा म्हणजे आनंद पर्वणी
घोट घेत घेत त्याची चव अनुभवावी
बाहेर असावा रिमझिम हळवा पाऊस
जुन्या आठवणींची मनात गर्दी व्हावी
दिवसेंदिवस चहाच्या टपरी वरील
कप एवढे लहान होत चाललेत
की कळतच नाही चहा पितोय
की पोलिओचा डोस


आल्याचा तो स्वाद वाफाळणारा सुगंध
चहाचा तो प्याला करतो मन बेधुंद


घरापासून दूर असलेले हे रस्ते मला अंधारात घाबरवतात,
पण या रस्त्याच्या कोपऱ्यातील चहा आणि मित्र
मला शांती देतात


कसली नशा आहे या चहात
प्रत्येक वेळी पिऊन तुझ्या आठवणीत हरवून जातो.


चहा म्हणजे काय हे मी सांगू शकत नाही,
पण त्याबद्दलची भावना आपोआप प्रकट होते.


स्वयंपाकघरात चक्कर मारून सोफ्यावर आरामात
बसून चहा-पाणी मागणाऱ्याला
भाऊ म्हणतात.


मृत्यूनंतर मी चहा पिऊ शकणार नाही,
फक्त यासाठी मी आत्महत्या करत नाही.


साखरेशिवाय चहा आणि
शिव्याशिवाय मैत्री निरुपयोगी वाटते.


चहा प्यायला बसलो की जुने दिवस आठवतात,
मित्रांसोबत घालवलेले ते दिवस आठवतात.


माझ्या घशाची प्रत्येक वाट मला माहीत आहे,
चहासाठी ओळखला जाणारा हा परिसर आहे.


जगात चहाचा तुटवडा निर्माण झाला तर
अर्धी लोकसंख्या डोकेदुखीने संपेल.


चहा पिणे ही कला असेल तर
होय मी कलाकार आहे.


अवकाळी पाऊस येतोय,
चहासाठी भेटायला तुझा बहाणा,
मला खूप आवडतो


तू बार मध्ये आणि मी चहाच्या टपरीवर
We are Not Same Bro


फसवणूक झाल्यावर
डोळे उघडणारी एकमेव गोष्ट म्हणजे चहा


चहातल्या बिस्किटांसारखं
मला तुझ्यात विरघळायचं आहे


अनेकदा काही इच्छा चहाच्या टेबलावर राहते,
कप त्याला स्पर्श करतो,
परंतु किटली तिथेच राहते.


ती सकाळ खूप मस्त असेल
जेव्हा आपण एकत्र असू आणि हातात चहा असेल


मी ऐकले आहे की चंद्रावर पाणी आहे,
आता फक्त दूध, साखर आणि चहापत्ती न्यावी लागेल


चहा असो किंवा महाकाल
दोघांमध्ये सुख आहे


ज्या मनामध्ये
चहाचा विचारच येत नाही त्याचा उपयोग काय?


चहाला वेळ नसते
पान वेळेला चहा हवाच


दूध तर फक्त हाडे मजबूत करते
चहाने मैत्री आणि प्रेम मजबूत होते


माझ्या नादी लागू नकोस
सकाळीच दोन बिस्किटे चहात बुडवून मारलीत


कॉफी म्हणजे मोठ्या लोकांचे शौक,
आम्ही आणि आमचे मित्र फक्त चहाचे वेडे


माझा चहा माझ्यासाठी फक्त चहा नाही
तर माझा Mood ठीक करणारं औषध आहे


माझ्याकडे प्रत्येक आजारावर एकच उपचार आहे
औषधाच्या नावावर फक्त चहा आहे


चहाची चव सर्वात स्वादिष्ट असते
ती अशी असते
की त्याच्यासमोर सर्व काही फिके पडते


प्रवासात चांगला चहा मिळाला
की प्रवासाची खरी मजा कळते


चहात उकळी आणि आयुष्यात अडचणी नसतील
तर जगण्यात मजा नाही


आयुष्याचा चहा चांगला बनवायचा असेल,
तर मेहनतीच्या ज्योतीवर थोडा वेळ उकळू द्या.


कधीतरी स्वतःसाठी जगा,
थोडा वेळ काढा
आणि कधीतरी माझ्यासोबत चहाला चला


कॉफी म्हणजे प्रेम
चहा म्हणजे आयुष्य


माझ्या आयुष्यात तिला सुद्धा तितकंच महत्त्व आहे
जितकं Tea ला आहे


Tea आहे म्हणून मी आहे
जिथे Tea तिथे मी


मजबूत नातं आणि कडक चहा बनायला वेळ लागतो
पण एकदा तयार झालं की काम फिट


जोडी तुझी माझी जशी चहा खारी
जोडी तुझी माझी जशी गझल अन शायरी


तू चहा सारखं माझ्यावर प्रेम तर कर
बिस्किट सारखं तुझ्यात बुडालो नाही तर सांग


दररोज सकाळी आयता चहा करून
देणारी हवी आता आयुष्यात
गोडवा तिच्या स्मितहास्याचा भरभरून असायचा
विना साखरेचा चहा पण तिच्या हातून गोड व्हायचा


माझ्या दिवसाची सुरुवात तू
माझ्या दिवसाचा शेवट सुद्धा तूच


चहाला वेळ नसते
पण वेळेला चहा हवाच


टेन्शन सोडा
मस्तपैकी चहा प्या


प्रेमाचं मिश्रण आठवणींच्या मंद आचेवर ठेवले की
झाला आपला दोन कप मैत्रीचा चहा
अमृत म्हणा विष म्हणा
काही फरक पडत नाही
वेळेवरती चहा हवा
बाकी काही म्हणणं नाही


रात्री तुझी आठवण आणि सकाळी चहा
आवडत आपल्याला


आता चहा तू बनवला म्हटलं
की साखरेची गरज काय


चहा प्यायला बोलावलं तर
वातावरण घरच्यासारखं बनत
आणि तुझं कॉफीला बोलणं
ऑफिस सारखं वाटतं


एकवेळ ती नसली तरी चालेल
पण Tea पाहिजेच
चहा आणि बिस्कीट
तसं तू आणि मी


एक साधा प्रश्न विचारला मी त्याला
की प्रेम म्हणजे काय आहे तुझ्यासाठी
त्याने एक शब्द बोलून मला गप्प केलं
‘चहा’


इच्छा तेथे मार्ग
चहा तिथे स्वर्ग


काचेच्या ग्लासमध्ये चहा पिण्याची जी मजा आहे
ती पेपरच्या कप मध्ये कुठे
मस्त पडलीये गारठवणारी थंडी
सोबतीला गरमा गरम चहा
रुसव्या फुगव्यांना बाजूला सारून
थोडा एकमेकात संवाद होतो का पहा


चहा हा एक जीवनातील महत्त्वाचा भाग आहे
संवादातली वादळे शांत करण्याचा
मनातलं काहूर मिटवण्याचा
मोठ्या चर्चा करण्याचा


जर सुरुवातीला, तुम्ही यशस्वी झाला नाही,
तर एक कप चहा घ्या


चहा ही त्या तिजोरीची चावी आहे
जिथे माझा मेंदू ठेवला आहे


चहाच्या स्वभावात काहीतरी आहे
जे आपल्याला जीवनाच्या शांत चिंतनाच्या जगात घेऊन जाते.


चहाची चव जिभेवर आली,
मला तुझे नाव आठवते
जे हरवले त्यासाठी रडत बसण्यापेक्षा चहाचा
एक घोट समाधान देते


मजबूत नाती आणि कडक चहा,
यासाठी थोडा वेळ द्यावाच लागतो


हा ऋतू आणि हा मस्त किनारा,
दोन कप चहा आणि तुझी वाट पाहण्याचा
नजारा


प्रेम हे चहासारखे असावे
‘अमृततुल्य’


नातं हे कपबशीसारखं असावं
एकानं सांडल तरी दुसऱ्याने
सांभाळून घेणारं असावं


आठवता तुझे गुलाबी ओठ
कडक होतो चहाचा प्रत्येक घोट


दररोज सकाळी आयता चहा
करुन देणारी असावी
तिच्या गोडव्याने बिनसाखरेचा
चहाही गोड लागावा
अशी मुलगी आयुष्यात हवी


चहा घेताना पाळल्या जात नाही जाती-पाती
तिथेच तर जुळून येतात प्रेमाच्या अनोख्य नाती


कडकडत्या थंडीत एक चहा
हवा, सोबत तुझा सहवास हवा


चहा आणि प्रेम एकच आहे,
यामध्ये दूध, चहापत्ती, आलं मिसळून येते,
तर प्रेमात दोन विभिन्न व्यक्ती एकत्र येतात
त्यालाच प्रेम म्हणतात.


हे वाचलंत का? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Wishes

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *