महाशिवरात्री शुभेच्छा 2023| Mahashivratri wishes in marathi

महाशिवरात्रीचे महत्व

शिवरात्री दर महिन्याला येते, परंतु महाशिवरात्री वर्षातून एकदा येते. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. या वेळी 2023 मध्ये, हा उत्सव शनिवार, 18 फेब्रुवारी रोजी आहे.

सर्वात जास्त महाशिवरात्रीचे महत्त्व यामुळे आहे कारण ती शिव आणि शक्तीच्या मिलनाची रात्र आहे. अध्यात्मिकदृष्ट्या ही निसर्ग आणि मनुष्य यांच्या मिलनाची रात्र आहे असे म्हटले जाते. या दिवशी शिवभक्त उपवास ठेवतात आणि आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद घेतात. मंदिरांमध्ये जलाभिषेकाचा कार्यक्रम दिवसभर सुरू असतो. पण तुम्हाला माहित आहे का महाशिवरात्री का साजरी केली जाते, त्यामागची घटना काय आहे. त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया..!

पौराणिक कथेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव प्रथमच प्रकट झाले. शिवाचे प्रकटीकरण ज्योतिर्लिंगाच्या म्हणजेच अग्नीच्या शिवलिंगाच्या रूपात होते. असे शिवलिंग ज्याचा ना आरंभ होता ना अंत. असे म्हणतात की शिवलिंग शोधण्यासाठी राजहंसाच्या रूपात ब्रह्माजी शिवलिंगाचा सर्वात वरचा भाग पाहण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांना यश आले नाही. शिवलिंगाच्या सर्वोच्च भागापर्यंतही ते पोहोचूच शकले नाही. दुसरीकडे भगवान विष्णूनेही वराहचे रूप धारण केले आणि शिवलिंगाचा आधार शोधत होते परंतु ते ही अपयशी ठरले.

आणखी एक पौराणिक कथेनुसार की महाशिवरात्रीच्या दिवशी 64 वेगवेगळ्या ठिकाणी शिवलिंग प्रगत झाले. त्यापैकी आपल्याला फक्त 12 ठिकाणांची नावे माहित आहेत. आपण त्यांना 12 ज्योतिर्लिंगांच्या नावाने ओळखतो. महाशिवरात्रीच्या दिवशी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात लोक दिवा लावतात. लोकांना भगवान शंकराच्या अखंड अग्नि लिंगाचा अनुभव घेता यावा यासाठी दिवे लावले जातात. या मूर्तीचे नाव लिंगोभव, म्हणजेच लिंगातून प्रकटलेली. असे लिंग ज्याची ना आरंभ होती ना अंत.

शिव आणि शक्ती यांची भेट झाली

महाशिवरात्रीला शिवभक्त रात्रभर जागरण करतात. शिवभक्त या दिवशी भगवान शिवाचा विवाह साजरा करतात. असे मानले जाते की महाशिवरात्रीला शक्तीचा विवाह भगवान शिवाशी झाला होता. या दिवशी भगवान शिव एकांतवासाचा त्याग करून गृहस्थ जीवनात प्रवेश केला. म्हणजेच एकांती असलेला शिव गृहस्थ झाला. शिवरात्रीच्या १५ दिवसांनी होळीचा सण साजरा करण्यामागे हे देखील एक कारण असल्याचे मानले जाते.

12 ज्योतिर्लिंग

1. सोमनाथ ज्योतिर्लिंग (गुजरात)
2. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग (आंध्र प्रदेश)
3. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग (मध्य प्रदेश)
4. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग (मध्य प्रदेश)
5. केदारनाथ ज्योतिर्लिंग (उत्तराखंड)
6. भीमाशंकर ज्योतिर्लिंग (महाराष्ट्र)
7. विश्वनाथ ज्योतिर्लिंग (उत्तर प्रदेश)
8. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग (महाराष्ट्र)
9. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग (झारखंड)
10. नागेश्वर ज्योतिर्लिंग (गुजरात)
11. रामेश्वरम ज्योतिर्लिंग (तामिळनाडू)
12. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग (महाराष्ट्र)

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

शिवाच्या ज्योतीने वाढेल प्रकाश..!
जो येईल शिवाच्या द्वारी..!
शिव सर्व संकटातून मुक्तता करी..!
हर हर महादेव
महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा


शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे,
!महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!


“सोमवार हा महादेवाचा वार,
शिव शंभो सर्वांचे तारणहार
करितो व्रत महाशिवरात्रीला
नमन माझे, चित्त माझे, मन माझे
देऊळातील शंकराच्या चरणी
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा”


सर्व जग ज्याच्या शरणी आहे.
त्या भगवान शंकराला नमन आहे,
भगवान शंकराच्या चरणांची होऊया धूळ!
चला देवाला वाहूया श्रद्धेचं फूल!
हर हर महादेव


जागोजागी आहे, शंकराची छाया
वर्तमान आहे शिव, भविष्य आहे शिव
तुम्हा सर्वांना महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा!


“ज्या अडचणीवर नसतो कुठला उपाय
त्यावेळी फक्त नामस्मरण हाच एक तोडगा
म्हणा
ऊॅं नम: शिवाय
“महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा”


शिवाची राहो तुमच्यावर कृपा
तुमच्या नशिबाचा होवा कायापालट
तुम्हाला मिळो आयुष्यात सर्वकाही
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


“शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी
आनंदच आनंद देवो…
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!”


भगवान शंकर आले, तुमच्या द्वारी
आता येईल बहार, तुमच्या द्वारी
ना राहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख


“बेलाचे पान वाहतो महादेवाला
करतो वंदन दैवताला
सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला.”


असं म्हणतात की, श्वास घेतल्याने येतो प्राण
श्वास न घेतल्यास जातो प्राण
कसं सांगू श्वासाच्या साहाय्याने आहे जीवंत
कारण माझा श्वास येतो महादेवाच्या नावाने
ॐ नमः शिवाय, सर्व भक्तांना महाशिवरात्रिच्या शुभेच्छा


महाकालचा लावा नारा
शत्रू पण म्हणेल पाहा
महाकाळचा भक्त आला
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


कैलासराणा शिव चंद्रामौळी
फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी
कारुण्यसिंधु भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी
महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


मला माहीत नाही, मी कोण आहे आणि मला कुठे जायचं आहे.
महादेवचं माझी ध्येय आहे आणि महाकालच माझा ठिकाणा आहे.


जसं हनुमानाच्या हृदयात श्रीराम आहेत
तसंच माझ्या हृदयात बाबा महाकाल आहेत
जय श्री महाकाल


खूप सुंदर आहे माझ्या विचारांचं जग
महाकालपासून सुरू आणि महाकालवर समाप्त
महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


हे हृदय तुमच्यामुळे
हे जीवन तुमच्यामुळे
तुम्हाला मी कसं विसरू
महाकाल माझं जग
जय श्री महाकाल


आकाशात आहे महाकाल
सगळीकडे आहे त्रिकाल
तेच आहेत माझे महाकाल


पोहायचं असेल तर समुद्रात उतरा
नदी-नाल्यात काय आहे
प्रेम करायचं असेल शंकरावर करा
बाकीच्या गोष्टीत काय आहे
जय श्री महाकाल


मी झुकणार नाही मी शौर्याचा अखंड भाग आहे
जो जाळेल अधर्माला तो मी, महाकाल भक्त आहे
जय शंभो


मायेच्या मोहातला व्यक्ती विखुरला जातो तर
महादेवाच्या प्रेमातला व्यक्ती मात्र उजळून जातो
हर हर महादेव


ज्याने घेतलं मनापासून शंकराचं नाव
त्यावर शंकराने केला सुखांचा वर्षाव
हर हर महादेव


आयुष्य एक लढाई आहे
भोलेनाथ तुमच्या सोबत आहे
महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


दैवताला सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला


शिवशंकराच्या आशीर्वादाने
तुमचे जीवन मंगलमय होवो
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!


एक पुष्प
एक बेलपत्र
एक तांब्या पाण्याची धार
करेल सर्वांचा उद्धार
जय भोले बम-बम भोले


भक्तीत आहे शक्ती बंधू
शक्तीमध्ये संसार आहे
त्रिलोकात ज्याची चर्चा आहे
तो आज शंकराचा सण आहे
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


बाबाकडे प्रार्थना करत आहे
तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो
बाबांचा आशिर्वाद तुमच्यावर कायम राहो
शिवरात्रीच्या शुभेच्छा.


माझ्यात कोणताही छळ नाही, तुझं कोणतंही भविष्य नाही
मृत्यूच्या गर्भातही मी आयुष्याच्या जवळ आहे
अंधकाराचा आकार आहे, प्रकाशाचा प्रकार आहे
मी शंकर आहे मी शंकर आहे.


महाशिवरात्रीच्या शिवमय शुभेच्छा!
महाशिवरात्रीच्या शिवमय शुभेच्छा!
वादळाला जे घाबरतात, त्यांच्या मनात प्राण असतात
मृत्यूला बघून जे हसतात त्यांच्या मनात महाकाल असतात


हे कलियुग आहे इथे चांगल्याला नाही वाईटपणाला मान मिळतो
पण आम्ही आहोत महाकालचे भक्त, आम्ही मानाचे नाही
आम्ही रूद्राक्षाचे भक्त आहोत
जय महाकाल


काल पण तूच
महाकाल पण तूच
लोक ही तूच
त्रिलोकही तूच
शिव पण तूच
आणि सत्यही तूच
जय श्री महाकाल
हर हर महादेव


जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहे
क्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे
जय महाकाल हर हर महादेव


अद्भूत आहे तुझी माया
अमरनाथमध्ये केला वास
नीळकंठाची तुझी छाया
तूच आमच्या मनात वसलास
हर हर महादेव


शिवाच्या शक्तीने,
शिवाच्या भक्तीने,
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार,
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना,
महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!


हर हर महादेवचा होऊ दे गजर
महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा


दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
!Happy Mahashivratri!


शिव भोळा चक्रवर्ती।
त्याचे पाय माझे चित्ती॥
वाचे वदता शिवनाम।
तया न बाधी क्रोधकाम॥
धर्म अर्थ काम मोक्ष।
शिवा देखता प्रत्यक्ष।
एका जनार्दनी शिव।
निवारी कळिकाळाचा भेव॥
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


मी तर स्वतःला शंकराच्या चरणी ठेवले
आता मी समजलो माझं मला
जेव्हा झाली हर हर महादेवाची कृपा


महाकाल महाकाल नावाची किल्ली
उघडेल प्रत्येक कुलूप
होतील सर्व कामं,
बोला फक्त जय श्री महाकाल


हर हर महादेव
जय जय शिवशंकर
महाशिवरात्रीच्या सर्वाना शिवमय शुभेच्छा
जय भोलेनाथ


ॐ मध्ये आहे आस्था..!
ॐ मध्ये आहे विश्वास..!
ॐ मध्ये आहे शक्ती..!
ॐ मध्ये आहे सर्व संसार..!
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..!
जय शिव शंकर..!
महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा


शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात
नेहमी आनंदच आनंद देवो
ओम नमः शिवाय
महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा


बम भोले
डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड,
भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं नाव आहे गोड,
शंकराची ज्याने पूजा केली मनोभावे,
भगवान शंकराने नक्कीच आयुष्य त्याचे सुधारले


पिऊन भांग रंग जमेल..
आयुष्य भरेल आनंदाने..
घेऊन शंकराचे नाव..
येऊ दे नसानसात उत्साह..
तुम्हा सर्वांना
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


शंकराच्या ज्योतीने येईल तेज,
भक्तांच्या हृद्याला मिळेल शांतता,
शिवाच्या द्वारी जो येईल,
त्याच्यावर नक्कीच होईल देवाची कृपा…
शुभ महाशिवरात्री..
Mahashivratri chya hardik Shubhechha


हे वाचलंत का? –

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻