आकाशातून वीज अंगावर पडू नये, यासाठी काय काळजी घ्यायला हवी?

वीज कशी पडते?

Lightning

वीज कशी पडते? विजा कश्या होतात.? (Lightning)

पाऊस म्हटलं कि त्याच्या संगतीला विजांचा कडकडाट हा असतोच. एका ढगास दुसऱ्या ढंगाचे झालेल्या घर्षणाने वीज तयार होते. हे आपण लहान असल्या पासून ऐकतोय, पण त्यामागचं शास्त्रीय कारण मोजक्याच लोकांना माहित असेल.

पण ज्यांना माहित नसेल त्यांना मी सरळ व सोप्या भाषेत सांगण्याच्या प्रयत्न करेल. आणि मला खात्री आहे, कि तुम्हाला ते नक्कीच समजेल. तर चला मग आपल्या मुद्यांवर येऊ….

विजांच्या कडकडाटाला इंग्रजीमध्ये लायटनिंग (Lightning) असे म्हणतात.

हे वाचलंत का? –
* चंद्र ग्रहाचे सर्वात मोठे रहस्य
* कारमन रेषा नक्की काय आहे?

तर वीज तयार कशी होते व ती कशी जमिनीवर कोसळते? ढगांमध्ये काही प्रमाणात बर्फाचे छोटे छोटे तुकडे असतात. तसेच हवामानात आद्रतेचे प्रमाण असतच आणि ती हवा सारखी फिरत असल्या कारणाने….

त्यामध्ये चार्जे तयार होतो. एक असतो धन भार (पॉसिटीव्ह चार्जे किव्हा प्रोटॉन) आणि दुसरा असतो ऋण (नेगेटिव्ह चार्जे किव्हा इलेक्ट्रॉन)

flash

ढगांच्या वरच्या बाजूला असतो पॉसिटीव्ह चार्जे तर त्याच ढगांच्या खालच्या बाजूला असतो. नेगेटिव्ह चार्जे आणि जमीन,झाड व मनुष्य याचा चार्जे पॉसिटीव्ह मिळाला तर तुम्हाला माहित आहे वेगवेगळ्या चार्जे मध्ये आकर्षण असतो.

तर त्या निगेटिव्ह आणि पॉसिटीव्ह मध्ये आकर्षण झाले कि वीज जमिनीवर किव्हा मनुष्यावर कोसळते, शास्त्रज्ञा नुसार वीज हि अंदाजे 54,000 डिग्री फॅरेनहाइट इतकी गरम असते.

आपल्याला आधी प्रकाश दिसतो. नंतर गडगडाट ऐकलं येते त्याच कारण असं कि आवाजापेक्षा प्रकाशाची गती जास्त असते.

जेव्हा विजेचा बोल्ट ढगातून जमिनीवर प्रवास करतो, तेव्हा तो हवेत एक लहान छिद्र उघडतो, ज्याला चॅनेल म्हणतात. एकदा प्रकाश गेल्यानंतर हवा परत खाली कोसळते आणि ध्वनीलहरी तयार होते. जी आपण गडगडाट म्हणून ऐकतो.

गडगडाट ऐकू येण्यापूर्वी आपल्याला विजेचा प्रकाश दिसण्याचे कारण म्हणजे ध्वनीपेक्षा प्रकाश वेगाने प्रवास करतो. वीज पासून स्वतःचे रक्षण कशे करावे त्याबद्दल थोडं माहिती करून घेऊया…

जर आपल्याला गडद ढग दिसले तर समजून घ्या तेथे विजा होऊ शकते. परंतु गर्जना ऐकणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे.

जर आपल्याला गडगडाटाचा आवाज ऐकू आला तर आपल्याला घराच्या आत जाणे किंवा कारमध्ये जाणे आवश्यक आहे. बाहेर जाऊ नका, जर आपले केस वर जात असतील किंवा आपल्या त्वचेला मुंग्या येणे सुरू झाले असेल तर कदाचित आपल्याला विजेचा झटका बसू शकतो.

lightning in marathi

आपण किती दूरवरून वीज पाहू आणि गडगडाट ऐकू शकतो? त्या दूरच्या वादळात, बोल्टची उंची, हवेचे स्पष्टीकरण आणि आपली उंची यावर अवलंबून असते. तरी पण आपल्यापासून 100 मैलांच्या अंतरावर विजेचे बोल्ट आपण पाहू शकतो.

तर वरील पोस्टमुळे तुम्हाला विजे बद्दलची बरीचशी माहिती मिळाली असेलच.
अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.

धन्यवाद…

  • सागर राऊत

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.


Share